Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 21 October, 2013 - 14:25
उरावा विठ्ठल | मनाच्या शून्यात
देहाच्या ऋणात | बुडालेला ||१||
विझुनिया दिवा | जाणीवेचा काळा |
भरावा सावळा | लख्ख चित्ता ||२||
पहावे नाटक | चालले जगाचे |
धरुनी तयाचे |बोट घट्ट ||३||
जग चुकवून | अंग झटकून |
कुणा न कळून | त्याचे व्हावे ||४||
विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त .... खूप छान लिहिता...
मस्त .... खूप छान लिहिता...
पहावे नाटक | चालले जगाचे
पहावे नाटक | चालले जगाचे |
धरुनी तयाचे |बोट घट्ट ||३|| >>> क्या बात है...
बाकी सारी रचना सुरेखच ....
धन्यवाद जयदिप ,शशांक..
धन्यवाद जयदिप ,शशांक..