विवाह (सप्तमस्थान )

Submitted by Anvita on 20 October, 2013 - 13:12

विवाह (सप्तमस्थान )

पत्रिकेचा विषय मुख्यत्वे मुलगी/मुलगा लग्नाचा झाला व स्थळे बघण्याची वेळ आली कि निघतो .मग बरेच वेळा
विवाहयोग कधी आहे हे विचारले जाते. स्थळ कसे मिळेल?
परदेशातले मिळेल कि भारतातले ? असे अनेक प्रश्न विचारले जातात .

पारंपारिक पद्धत :
सर्वसाधारणपणे पारंपारिक पद्धतीने विवाहाचा विचार करताना सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाहाचा कारक ग्रह म्हणून शुक्र तसेच मुलीची पत्रिका असेल तर रवि इ. गोष्टीचा विचार केला जातो .
विवाह योग लवकर आहे कि उशिरा ह्याचा अंदाज साधारण सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाह विलंब किंवा लवकर घडवून आणणारे योग ह्यावरून येतो. महादशा , गुरु भ्रमण इ. चा विचार करून मग साधारण काळ काढता येतो.
विवाहास विलंब करणारे योग :
बहुतेक वेळेस शनि-शुक्र युती , चंद्र- शनि युती, पंचमात शनि, सप्तमेश निर्बली, सप्तमात पापग्रह ( मंगळ, .शनि, हर्षल), शुक्र निर्बली , मुलीच्या पत्रिकेत रवि- शनि युती यापेकी काही ग्रहयोग असतील तर बहुतेक वेळा उशिरा विवाह होतो किंवा काही वेळेस विवाह योग येताच नाही.
विवाह लवकर होण्याचे योग:
शुभ ग्रहाचे एकमेकाशी शुभ संबंध असतील उदा. शुक्र , बुध, चंद्र,गुरु यापेकि ग्रह युतीत असणे , लग्नेश - सप्तमेश युती असणे.
वरीलपेकी एक किवा त्याहून जास्त योग विवाह लवकर/उशिरा होण्यास कारणीभूत ठरतात.
व .दा भट ह्यांनी 'सप्तमस्थान' ह्या पुस्तकात खूप छान विवाहाबाबत सर्वप्रकारची माहिती दिली आहे .

कृष्णमुर्ती पद्धत :
कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे विवाह संबंधीचे प्रश्न बघताना सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात .
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी जर २( कुटुंब स्थान ) , ७( जोडीदाराचे स्थान), ११(लाभ स्थान) यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर त्या स्थानाच्या दशेत -अंतर्दशेत विवाह होतो.
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी वरून जोडीदाराच्या बाबतीत अंदाज बांधता येतात . जर सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी शनि असेल तर मुलीस जोडीदार वयात जास्त अंतर असलेला मिळतो .(मुलाच्या बाबतीत समवयस्क किंवा वयाने जास्त मोठी वधु मिळते ) जर चंद्र, शुक्र, बुध असेल तर वयात कमी अंतर असलेला मिळतो. रवि , मंगळ असेल तर वयात मध्यम अंतर असते .
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानाचा बलवान कार्येश आहे त्यावरून लग्न कसे ठरेल हे ठरवता येते. उदा.तृतीयाचा कार्येश असेल तर विवाह संस्था , आत्ये- मामे भावंडे , जवळ राहणार इ. , बाराव्या स्थानाचा कार्येश असेल तर परदेशातील ,पंचमाचा कार्येश असेल तर प्रेमविवाहाची शक्यता असते ( अर्थात त्या करता पत्रिकेत शुक्र, मंगळ, हर्षल ह्याचे योग लागतात . शुक्र-मंगळ युती किंवा नवपंचम योग तसेच शुक्र-हर्युती अथवा नवपंचम इ.)

वरील सर्व योगाचा , महादशा,अंतर्दशाचा तारतम्याने विचार करून मग विवाह योग कधी आहे ते ठरवावे .

ह्या विषयाची व्याप्ती बरीच आहे पण ह्या लेखात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .
तरी मंगळ दोष , घटस्पोट,वैधव्य योग ,पुनर्विवाह योग राहून गेले आहे. जमले तर पुन्हा लिहीन .

(संदर्भांकरता व.दा भट , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण कोणी तसे विचारायला येत नाही. >> स्वतः बद्दल नाही हो विचारू हा प्रश्न पण ज्याच्याशी आपण लग्न करणार तो नवरा पुढे जाऊन कोणाशी लिव्ह-इन केल मग? त्याच्या पत्रिकेत हा योग आहे का हे आई-वडिलांनी नको तपासायला मुलीच्या? निदान ज्योतिष लोकांनी सांगायला नको का?

अपर्णा,

तुमच्या शंकेचे निरसन करण्याचा हा प्रयत्न.

खाली दिलेल्या आकृतीत कुंडलीच्या घरांमध्ये जे आकडे दिले आहेत, ते आकडे त्या स्थानांचा क्रमांक दर्शवतात. क्र. १ चे घर म्हणजे प्रथम स्थान वगैरे.

Basic_Kundali.png

सर्वसाधारण कुंडल्यांमध्येही असे आकडे टाकलेले असतात, जे त्या त्या स्थानांतील राशीचा क्रमांक दाखवतात.

मेष लग्न(राशी नं १) च्या पत्रिकेतील क्रमांक वर दिलेल्या पत्रिकेनुसार असतील, किंबहुना वर दिलेली पत्रिका मेष लग्नाची आहे असे म्हणू शकाल.

प्रत्येक राशीचा एक ग्रह स्वामी असतो. ती राशी ज्या घरात, त्या स्थानाचा तो ग्रह अधिपती मानला जातो.

या मेष लग्नाच्या पत्रिकेत सप्तम स्थानात ७ वी रास म्हणजे तुळ रास येते, तुळेचा स्वामी शुक्र म्हणजे इथे सप्तमेश शुक्र.

मकर लग्नाच्या पत्रिकेत, सप्तम स्थानात ४ हा आकडा असेल, म्हणजेच कर्क रास असेल. तिचा स्वामी चंद्र म्हणून मकर लग्नाच्या पत्रिकेत सप्तमेश चंद्र

^^^
मकर लग्नाच्या पत्रिकेत सप्तमात कर्क रास येते. सिंह नव्हे.
मकर लग्नाला सप्तमेश चंद्र आहे.

लेख अजिबात समजला नाही, इतकेच लिहायचे साहस केले याबद्दल क्षमस्व! तुमच्या ज्ञानाला मात्र मनापासून सलाम!

पण कोणी तसे विचारायला येत नाही. >> स्वतः बद्दल नाही हो विचारू हा प्रश्न पण ज्याच्याशी आपण लग्न करणार तो नवरा पुढे जाऊन कोणाशी लिव्ह-इन केल मग? त्याच्या पत्रिकेत हा योग आहे का हे आई-वडिलांनी नको तपासायला मुलीच्या? निदान ज्योतिष लोकांनी सांगायला नको का?>>>>

ह्यालाच तर पत्रिका "जुळवणे" म्हणतात. एखाद्या मुलाची पत्रिका मुलीशी जुळत नाही ह्याचाच अर्थ त्या पत्रिकेत काहीतर गोम असते. प्रत्येक ज्योतिषाने जर खरं उत्तर दिलं तर अनेक प्रश्न सुटतिल.

माझ्या कडे लग्न जमवायला ज्या पत्रिका येतात, त्यांचा मी पूर्ण अभ्यास करते. नुसते गुण जुळवुन थांबत नाही किंवा पत्रिका मेलन पण करत नाही तर पुर्ण पत्रिकेचा अभ्यास करते. एक उदाहरण

मुलीच्या अष्टमात किंवा सप्तमात मंगळ होता. बर्‍याच ज्योतिषांनी ही पत्रिका रिजेक्ट केली. कारण अष्टमातला मंगळ म्हणजे वैधव्य, पती अकाली जाणे. पण नुसते असे करुन भागत नाही. मुलगा जर दिर्घायुषी असेल तर काहीही फरक पडत नाही. तिचे लग्न जुळवताना दिर्घायुषी मुलगा पहाणे आवष्यक. असा मुलगा मिळाला. लग्न झाले. ४० वर्षांच्या वैवाहिक जीवना नंतर तो नवरा वयाच्या ७०व्या वर्षी मेला. म्हणजे वैधव्य योग होता पण त्या मुळे नवरा अकाली वा स्वतःचं आयुष्य भोगल्याशिवाय मेला नाही. तो त्याचं आयुष्य भोगुन्/जगुनच मेला. त्याच बरोबर तिच्या नशीबातलं वैधव्य गेलं नाही. वयाच्या ६८ व्या वर्षी का होइना तीला ती अनुभुती आलीच...

(हे उदाहरण अगदी जवळच्या नातेवाईकांचं आहे. मी अभ्यास केल्यावर मला उलगडा झाला)

असे अनेक पदर लग्न करताना तपासावे लागतात. मुलीच्या पत्रिकेत मुल होताना प्रचंड त्रास होता किंवा मूल न होण्याचेही चान्सेस होते. पण नवर्‍याची पत्रिका अशी आहे की १००% मुल होणारच. त्याच प्रमाणे लग्ना नंतर त्य मुलीला ४ वर्षांनी मुलगी झाली खुप त्रास होवुन. पण झाली. नवर्‍याच्या पत्रिकेत सुध्धा जर मुलाचे चान्सेस कमी असते तर मात्र संतती योग खडतर होता.

ह्यालाच पत्रिका मेलन म्हणतात....

अन्विता, मोकिमी आणि गमभन छान माहिती देत आहात.

प्रथम स्थानातील ग्रहांची दृष्टी सप्तम स्थानावर पडते व कशी याची माहिती देऊ शकाल काय?

प्रत्येक ग्रहाला त्याची स्वतःची द्रुष्टी असते. प्रत्येकाला ७वी द्रुष्टी असतेच.... जो ग्रह प्रथमात असेल त्याची नॅचरली ७व्या स्थाना वर द्रुष्टी असणारच....

शुक्र आणि चंद्र हे शुभ ग्रह मानले जातात. गुरु बुध हे सम म्हणजेच शुभ नाही की अशुभ नाही. या शिवाय शनी आणि मंगळ हे अशुभ मानले जातात. शुभ ग्रहांची द्रुष्टी शुभ मानली जाते तसेच अशुभ ग्रहांची अशुभ मानली जाते. तसे राहु आणि केतु हे देखील अशुभ ग्रह मानले जातात पण त्यांना द्रुष्टी असते की नसते यावर खास अनुभव नाही म्हणुन उल्लेख केला नाही. गुरु, शनी, मंगळ यांना काही विशेष द्रुष्टी असतात.

मोहन कि मीरा , मी अगदी हेच लिहायला आले होते. पण तुमची post पहिली . तुम्ही छान explain केले आहे.

इंद्रधनुष्य , प्रत्येक ग्रहाला सप्तम दृष्टी असते.तसेच शनि , मंगल , गुरु ह्या ग्रहांना एकाहून जास्त.
प्रथमात शनि, मंगल सारखे पापग्रह असतील त्यांची सप्तम स्थानावर दृष्टी आहे असे म्हणतात .

माझा भगवंतावर अढळ विश्वास आहे त्यामुळे कुंडली वगैरेंच्या वाटेला कधी जातच नाही आणि जायची शक्यताही नाही. तरी एकंदरीतच कुंडली सिरीज मध्ये जे विश्लेषण अन्विता, मोकिमी आणि गमभन देत आहेत ते खूप चांगल्या प्रकारचं, अगदी ह्या विषयात 'ढ' (माझ्यासारखं) असलेल्यालाही काहीतरी अंदाज येईल असं आहे.

वरचं वाचून सहजच मनात आलं ते विचारतेय. जास्त विचारणार नाही Happy

१) प्रत्येक ग्रह त्याच्या पुढे सात घरं असलेल्या स्थानाकडे बघतो का?

२) शनि, मंगळ, गुरु ह्यांना एकाहून जास्त दृष्टी असते म्हणजे ते एकाच वेळेला त्यांच्यापासून सातव्या (बाय डिफॉल्ट) आणि अजूनही जास्त ठिकाणी बघतात का? मला हे वाचून बुद्धीबळातली प्यादी, उंट, घोडे, हत्ती वगैरे जसं विशिष्ट प्रकारे चालतात तेच आठवतंय.

३) ज्योतिष ह्या विषयात अत्यंत सखोल अभ्यास आणि गाढा अनुभव असल्याशिवाय केलेले तर्क चुकीचे ठरल्यास नवल नाही. कारण नुकतेच आलेले बाफ बघून, पाठ्यपुस्तक वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावीत एवढे सरळ अनुमान काढता येत नसावे असे वाटते.

४) ही ग्रहांची नावं म्हणजे आकाशातल्या भौतिक ग्रहांची असली तरी ते तेच ग्रह नसावेत. हा प्रत्येक ग्रह (मग रवी हा प्रत्यक्षात तारा असला, राहू केतू ह्या फक्त संज्ञा असल्या तरी...) म्हणजे इंटर्नेटवर जश्या साईट्स असतात, त्यांचा काहीतरी पत्ता असतो, त्यात काहीतरी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन असते तसं काहितरी वाटतंय. म्हणजे कुंडलीचा आराखडा आणि त्यात प्लेस केले गेलेले ग्रह हे त्या व्यक्तीने ह्या जन्मात येताना काय पुंजी सोबत आणली आहे त्याचा आराखडा असावा. सर्वबाजूंनी आणि सखोल अभ्यास केलेल्या व्यक्तीकडून ह्या आराखड्याचा अंदाज (केवळ अंदाजच) घेऊन त्यानुसार माणूस स्वतःची बुद्धी, परिश्रम, अनुभव आणि श्रद्धावानांच्या बाबतीत श्रद्धा घेऊन पुढे जायचा प्रयास करत असावा. अर्धवट अभ्यास आणि अत्यल्प अनुभव असलेल्या व्यक्तींनी काही तर्क केले तर त्यावरच अवलंबून राहणार्‍या व्यक्तींनी पुढे घ्यायच्या स्टेप्सही चुकीच्या ठरु शकतात.

तुम्ही खूप मनापासून आणि सोप्या भाषेत (लेख कळला नाही, पण प्रतिसादांमध्ये लिहिलेलं जरा कळतंय) ह्या विषयावर लिहिताय.... शुभेच्छा Happy

अश्विनी के ,
प्रत्येक ग्रह हा त्याच्या सातव्या घरावर बघतो .
तसेच शनीला ३,७,१० मंगळाला ४,७,८ व गुरूला ५,७,९
ह्या दृष्टी असतात. शुभग्रह म्हणजे चंद्र , बुध , शुक्र, गुरु ह्याची दृष्टी शुभ धरतात . पापग्रह म्हणजे शनि , मंगळ ह्यांची दृष्टी अशुभ धरतात.
आपण जे मागील जन्मी कर्म केलेले असते त्याप्रमाणेच माणसाच्या पत्रिकेतील ग्रह असतात. चांगले कर्म असेल तर पत्रिका चांगली असते वाईट असतील तर मग पत्रिकेत वाईट योग असतात. त्यामुळे ह्या जन्मही चांगली कामे करून काही प्रमाणात आपले प्राक्तन बदलता येते .
उदा . जर पत्रिकेतला मंगळ बिघडलेला असेल तर ह्याचा
अर्थ मागच्या जन्मी तुम्ही भाऊ बहिणींशी चांगले वागले नाही आहात . ह्या जन्मात भाव बहिणीशी चांगले वागणे त्यांना मदत करणे इ. गोष्टी करा. ह्याला karmic Healing असेही म्हणतात.

बेफिकीरजी, ह्या विषयाची basic माहिती असून तुम्हाला लेख कळला नसेल तर बहुतेक माझ्या लिखाणात काहीतरी त्रुटी असेल. मला जी थोडीफार माहिती आहे ती share करण्याचा हा प्रयत्न होता .

'इच्छित व्यक्तीशी विवाह होईल का? '
हा माझा नवीन लेख माझ्या ब्लोग वर वाचू शकता .
anaghabhade.blogspot.in
तुमच्या प्रतिसादांचे / सूचनांचे स्वागत आहे .

अर्पणा , कदाचित माझ्या ब्लोग वरचे पत्रिका अभ्यास १,२,३ ,४ तुम्हाला पत्रिका कळण्याच्या दृष्टीने उपयोगी पडतील . ज्यांना पत्रीकेविषयी फारशी माहिती नाही पण उत्सुकता आहे अशांसाठीच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.

Pages