विवाह (सप्तमस्थान )

Submitted by Anvita on 20 October, 2013 - 13:12

विवाह (सप्तमस्थान )

पत्रिकेचा विषय मुख्यत्वे मुलगी/मुलगा लग्नाचा झाला व स्थळे बघण्याची वेळ आली कि निघतो .मग बरेच वेळा
विवाहयोग कधी आहे हे विचारले जाते. स्थळ कसे मिळेल?
परदेशातले मिळेल कि भारतातले ? असे अनेक प्रश्न विचारले जातात .

पारंपारिक पद्धत :
सर्वसाधारणपणे पारंपारिक पद्धतीने विवाहाचा विचार करताना सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाहाचा कारक ग्रह म्हणून शुक्र तसेच मुलीची पत्रिका असेल तर रवि इ. गोष्टीचा विचार केला जातो .
विवाह योग लवकर आहे कि उशिरा ह्याचा अंदाज साधारण सप्तमेश , सप्तमातील ग्रह तसेच विवाह विलंब किंवा लवकर घडवून आणणारे योग ह्यावरून येतो. महादशा , गुरु भ्रमण इ. चा विचार करून मग साधारण काळ काढता येतो.
विवाहास विलंब करणारे योग :
बहुतेक वेळेस शनि-शुक्र युती , चंद्र- शनि युती, पंचमात शनि, सप्तमेश निर्बली, सप्तमात पापग्रह ( मंगळ, .शनि, हर्षल), शुक्र निर्बली , मुलीच्या पत्रिकेत रवि- शनि युती यापेकी काही ग्रहयोग असतील तर बहुतेक वेळा उशिरा विवाह होतो किंवा काही वेळेस विवाह योग येताच नाही.
विवाह लवकर होण्याचे योग:
शुभ ग्रहाचे एकमेकाशी शुभ संबंध असतील उदा. शुक्र , बुध, चंद्र,गुरु यापेकि ग्रह युतीत असणे , लग्नेश - सप्तमेश युती असणे.
वरीलपेकी एक किवा त्याहून जास्त योग विवाह लवकर/उशिरा होण्यास कारणीभूत ठरतात.
व .दा भट ह्यांनी 'सप्तमस्थान' ह्या पुस्तकात खूप छान विवाहाबाबत सर्वप्रकारची माहिती दिली आहे .

कृष्णमुर्ती पद्धत :
कृष्णमुर्ती पद्धती प्रमाणे विवाह संबंधीचे प्रश्न बघताना सप्तमस्थानाचा उपनक्षत्र स्वामी बघतात .
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी जर २( कुटुंब स्थान ) , ७( जोडीदाराचे स्थान), ११(लाभ स्थान) यापेकी एकाचा जरी कार्येश असेल व षष्ठ स्थानाचा एकमेव कार्येश नसेल तर त्या स्थानाच्या दशेत -अंतर्दशेत विवाह होतो.
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी वरून जोडीदाराच्या बाबतीत अंदाज बांधता येतात . जर सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी शनि असेल तर मुलीस जोडीदार वयात जास्त अंतर असलेला मिळतो .(मुलाच्या बाबतीत समवयस्क किंवा वयाने जास्त मोठी वधु मिळते ) जर चंद्र, शुक्र, बुध असेल तर वयात कमी अंतर असलेला मिळतो. रवि , मंगळ असेल तर वयात मध्यम अंतर असते .
सप्तमाचा उपनक्षत्र स्वामी कोणत्या स्थानाचा बलवान कार्येश आहे त्यावरून लग्न कसे ठरेल हे ठरवता येते. उदा.तृतीयाचा कार्येश असेल तर विवाह संस्था , आत्ये- मामे भावंडे , जवळ राहणार इ. , बाराव्या स्थानाचा कार्येश असेल तर परदेशातील ,पंचमाचा कार्येश असेल तर प्रेमविवाहाची शक्यता असते ( अर्थात त्या करता पत्रिकेत शुक्र, मंगळ, हर्षल ह्याचे योग लागतात . शुक्र-मंगळ युती किंवा नवपंचम योग तसेच शुक्र-हर्युती अथवा नवपंचम इ.)

वरील सर्व योगाचा , महादशा,अंतर्दशाचा तारतम्याने विचार करून मग विवाह योग कधी आहे ते ठरवावे .

ह्या विषयाची व्याप्ती बरीच आहे पण ह्या लेखात थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे .
तरी मंगळ दोष , घटस्पोट,वैधव्य योग ,पुनर्विवाह योग राहून गेले आहे. जमले तर पुन्हा लिहीन .

(संदर्भांकरता व.दा भट , सुरेश शहासने, ज्योतिन्द्र हसबे ह्याची पुस्तके वापरली आहेत . )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुद्ध देसी रोमान्स योग उर्फ लिव्ह-इन योग आहे अस नाही विचारत कुणी? ते परमेश्वराने/ग्रह-तारे न जुळवता आपोआप घडते काय??

दोन्ही पद्धतींची ओळख फार छान!
पण लेख प्रक्षिप्त झाला आहे.
अजून विस्ताराने येऊ द्या. या स्थानाची महती मोठी आहे.

////शुद्ध देसी रोमान्स योग उर्फ लिव्ह-इन योग आहे अस नाही विचारत कुणी? ते परमेश्वराने/ग्रह-तारे न जुळवता आपोआप घडते काय??//
मला तरी अजून कोणी विचारले नाही. इतरांना विचारात असतीलही कदाचित .
ह्या लेखाचा विषय 'विवाह(सप्तमस्थान) असा आहे. सप्तमस्थानावरून कायदेशीर जोडीदाराचा विचार करतात त्यामुळे 'लिव्ह-इन' बद्दल काही लिहिले नाही.

मंगळ दोषावर लिहिणे मुद्दामूनच टाळले आहे . एक तर त्यात बरेच प्रकार आहेत म्हणजे सोम्य मंगळ , कडक मंगळ इ.

आणि खरेच मंगळ दोष असला तर काही त्रास होतो का हे पाहण्यासाठी माझ्याकडे मंगळ असलेल्या लोकांच्या फारशा

पत्रिका नाहीत. कोणाला काही या बाबत अनुभव असल्यास जरूर लिहा .

छान लिहीलय. (अन जितके लिहिलय तितकेच पुरे असे वाटते)
लग्न/विवाह/वैवाहिक जोडीदार याकरता सप्तमस्थानावरील ग्रहयोग जसे बघु तसेच "व्यक्तिची (जातकाची) आत्मिक" ताकद किती ते देखिल कोणत्याही कृतिमागे बघावे लागते, सबब लग्नेश व चंद्रराशिकडून प्रथमेशाची स्थिती देखिल बघावी असे माझे मत.
(म्हणजे असे की ताट पुढे वाढले जाणार की नाही हा एक विषय, काय प्रकारचे ताट कितीवेळा पुढे येईल हा वेगळाच भाग, पण जे काही वाढुन सामोरे आले त्या ताटातील घास मुखी स्वतःच घेणार की नाही / घेऊ शकणार की नाही - हा भलताच दुसरा विषय) असो.

मंगळ दोषावर लिहिणे मुद्दामूनच टाळले आहे . एक तर त्यात बरेच प्रकार आहेत म्हणजे सोम्य मंगळ , कडक मंगळ इ.

>> मी शरद उपाध्येंच्या बर्‍याच कार्यक्रमात ऐकले आहे की मंगळ म्हणजे त्या व्यक्तीत असलेल्या वासनेची तिव्रता (लिबिडो)..

जास्त तीव्रता असलेल्या मुलीला कमी तीव्रतेचा नवरा मिळून या बाबतीत तिची उपासमार होऊ नये यासाठी पत्रिकेतल्या मंगळाचा इतका उदोउदो केला गेला आहे.

limbutimbu , तुम्ही जे म्हणताय ते एखादे उदाहरण देऊन सांगता का म्हणजे नीट समजेल .

पियुपरी, बरोबर आहे मी पण ते कारण ( तीव्र वासना ) वाचले आहे मंगळाबाबत.पण मग मांगलिक वधु/ वरास
शुक्र-मंगळ युती असणारा जोडीदार पण चालायला हरकत नाही.
तसेच अष्टमस्थान सोडल्यास बाकी १,४,७,१२ ह्या स्थानातील मंगळाची सप्तमावर दृष्टी पडते .
दक्षिणेत द्वितीय स्थानातील मंगळ पण मांगलिक म्हणूनच धरतात .

> मी शरद उपाध्येंच्या बर्‍याच कार्यक्रमात ऐकले आहे की मंगळ म्हणजे त्या व्यक्तीत असलेल्या वासनेची तिव्रता (लिबिडो)..
त्याचा कारक शुक्र न? (Venus)

की Men are from mars वरून mars = libido असे ठरले?
सौम्य आणि कडक मंगळ असे डिजीटल विभाजन असते, की ते एक कंटीन्युअस व्हॅरीएबल आहे? एखाद्या पुस्तकात त्या व्हॅरीएबल चा आणि मंगळाच्या उपद्रवाचा ग्राफ पाह्यला मिळतो का?

लवकरच लोक परग्रहयोग बद्दल वगैरे विचारू लागतील. त्याबद्दलची पुस्तकं कशी नाही आली अजुन?
(मी हे सिरिअसली विचारतो आहे)

अन्विता, सप्तमस्थानामधे /वा त्यावर नजर ठेऊन असणारे ग्रह/सप्तमेश यांच्या स्थितीवरुन जातकास "जोडिदार" (पार्टनर) या अर्थाने कोण किती मिळेल हे बघता येते, याच स्थानावरुन "प्रतिस्पर्धी" (शत्रू नव्हे) देखिल बघता येतात. मात्र, या मिळू शकणार्‍या जोडीदार्/प्रतिस्पर्धी बाबत जातक स्वतः कशाप्रकारे वागेल्/रिअ‍ॅक्ट होईल, ते मात्र जातकाचे प्रथम/पंचम भावावरुन (अर्थातच त्यावर नजर ठेऊन असणारे ग्रह/प्रथमेश यांच्या स्थितीवरून) ठरवावे लागेल. किंबहुना, सामोर्‍या येणार्‍या व्यक्तिस जातक जोडीदार म्हणून समजुन घेईल, वा प्रतिस्पर्धी ठरवेल ते देखिल जातकाचे लग्नस्थानावरुन (चंद्रकुंडलीत प्रथमस्थानावरुन) समजुन येईल. इथे जर खोट असेल तर लग्नाचा जोडीदार सोडाच, साधे येताजाता रोजच्या व्यवहारात तोन्डासमोर येणार्‍यांशी देखिल जातकाचे पटणार नाही. मात्र इथे खोट नसेल तर समोर येणारी व्यक्ती कशीही असली तरि जातक ती वेळ त्याचे व समोरच्याचे हितास बाधा न येऊ देता सांभाळून नेईल. अतिशय संक्षिप्त म्हणायचे तर "टीम वर्क" मधे सहभागी होणे वा सहभागी होण्याची वृत्तीच नसणे असा तो फरक आहे, मग टीम दोघांची असेल वा अनेकांची. प्रथम-सप्तम स्थानातील संबंध आधी या प्रकारे तपासून, मगच जातक सप्तमस्थानाने निर्देश केलेल्या प्रकारच्या वैवाहिक जोडीदाराबरोबर कसे वागू शकेल ते आजमावता येते.
कित्येक वेळेस बघण्यात आले आहे की, सप्तमस्थान शुभ संबंधित आहे, पण व्यक्तिची उदासीनता इतकी तीव्र आहे, की सामोर्‍या येणार्‍या "व्यक्तिस" योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे व्यक्तिस जमत नाही. पुन्हा, याबाबत शनीप्रमाणेच, काही विशिष्टस्थितीत "गुरु"ग्रहाची देखिल दखल घ्यावी लागते.

(लिखित स्वरुपात इतके विवेचन देणे खूप अवघड जाते आहे - कधीकाळी आमनेसामने बोलता आल्यास जास्त विश्लेषण देता येईल.)

///त्याचा कारक शुक्र न? (Venus)///
मला वाटते शुक्र आणि मंगळ दोन्हीचा याबाबत विचार करायला हवा.शुक्र-मंगळ युती , शुक्राच्या राशीतील मंगळ किंवा मंगळाच्या राशीतील शुक्र ह्याबाबत जास्त प्रभावी वाटतो.

///सौम्य आणि कडक मंगळ असे डिजीटल विभाजन असते, की ते एक कंटीन्युअस व्हॅरीएबल आहे? एखाद्या पुस्तकात त्या व्हॅरीएबल चा आणि मंगळाच्या उपद्रवाचा ग्राफ पाह्यला मिळतो का?///
आपल्याला होणाऱ्या शाररीक किंवा मानसिक त्रासाचे असे विभाजन करता येते का ? तर तो प्रत्येकाच्या सहन शक्ती प्रमाणे कमी- जास्त वाटेल . त्याचप्रमाणे हे असावे . अर्थात ते मंगळ असणाऱ्या लोकांनाच विचारायला हवे . मला मंगळ नसल्यामुळे मी नेमके उत्तर देऊ शकत नाही.

///लवकरच लोक परग्रहयोग बद्दल वगैरे विचारू लागतील///
///त्याबद्दलची पुस्तकं कशी नाही आली अजुन?
(मी हे सिरिअसली विचारतो आहे)///
आलीही असतील कदाचित शोधा म्हणजे मिळतील .
( मी पण सिरिअसली सांगते आहे.)

limbutimbu , धन्यवाद!
हा माझ्यासाठी एक नवीनच विचार आहे. हा मुद्दा कळण्यासाठी एखाद्या पत्रिकेचे विश्लेषण देता आले तर कळेल . तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा जरूर ह्यावर अजून लिहा.

पुण्यामध्ये पद्मावती देवीची ओटी भरली तर लग्न लवकर ठरते असा काही जणांना अनुभव आहे. ज्याची लग्न ठरत नाहीयेत त्यांनी हे करून बघायला हरकत नाही .

सीमंतिनी : लिव इन रिलेशनशिप पण के .पी पद्धितीत पाहता येते. पण कुणी विचारत नाही. उघड पणे विचारायचे
दिवस यायचे असतील ..............

सप्तमेश वक्री ग्रहाच्या नक्षत्रात नाहीना हे जरुर पहावे. उत्तम ज्योतिषी व क्लासेस चालवणारे सुध्दा ही विद्या आपल्या विद्यार्थ्यांना हातची राखुन देतात. परिणामी नव्याने शिकलेल्यांचे विवाह कधी होईल हे भविष्य हमखास चुकते.

अश्या पत्रीकेत विवाह योग हा उत्तम दर्जाचा नसतो. विवाह विलंबाने होते. झाला तरी टिकत नाही इ फळे अनुभवास येतात.

मला काही प्रश्न आहेत.
१. सप्तमेश अष्टमात असेल तर त्याचा काय अर्थ लागतो?
२. सप्तमात राहू असेल तर काय परिणाम असतो?

नितीनचंद्र ,
पहिल्यांदा पत्रिकेवरून लग्नाचा योग लवकर आहे कि उशिरा हे बघावे नंतर मग महादशा आणि गोचर इ. वरून योग सांगावा .
कृष्णमुर्ती पद्धती नुसार एकदा साधारण योग कळला कि मग महिना वगेरे काढता येऊ शकतो अर्थात हे जेवढ्या पत्रिका बघू तेवढे अनुभव असतात . अनुभवांमुळे भविष्य अचूक येण्यास मदत होते . शेवटी ज्योतिष हे तर्कशास्त्र आहे.

नुसता सप्तमेश अष्टमात असल्याने तो काही वाईट फळ देणार नाही . पण त्याचा कोणत्या ग्रहाशी कुयोग असेल किंवा पत्रिकेतला शुक्र बिघडला असेल किंवा सप्तमात व द्वितीयात पापग्रह असतील तर मग वैवाहिक सौख्यात बाधा येऊ शकते .
तसेच सप्तमात नुसता एकता राहू नुकसान करणार नाही. त्याचे कोणाशी कुयोग किंवा सप्तमेश ,शुक्र वगेरे बिघडला असेल तर मग राहू परिस्थिती अजून बिघडवेल.

सप्तम स्थानाची महती फार आहे. कारण हे स्थान विवाहाचे म्हणजेच कायदेशीर/ कायमच्या जोडीदाराचे.

शुद्ध देसी रोमान्स योग उर्फ लिव्ह-इन योग आहे अस नाही विचारत कुणी? ते परमेश्वराने/ग्रह-तारे न जुळवता आपोआप घडते काय??>>>>

ह्या साठी पंचम स्थान जे प्रेमप्रकरणाचे आहे व अष्टम स्थान जे सेक्स चे आहे ते पहावे लागेल. मी अश्या २-३ पत्रिका पाहिल्या आहेत की काही विशीष्ठ ग्रह स्थिती असेल तर पुरुष एक किंवा दोन स्त्रियांबरोबर एकाच वेळी रहातात. लन करत नाहीत. एका मुलीच्या पत्रिके वरुन ही असा योग दिसत होता. तिनेही मान्य केले की ती एका विवाहित पुरुषा बरोबर लिव्ह इन रीलेशन मधे रहात होती. आणि आता तिला लग्न करायचे होते. पण जमत नाही म्हणुन पत्रिका दाखवायला आली होती.

लग्न जुळवता ना २,७ व ११ स्थानातिल स्थानाधीपतींचे एक एकातिल संबंध तपासावेत. त्यांच्यात किमान २ चांगले योग/ दृष्टी यो होत असतिल तर खुशाल लग्न होइल असे सांगावे.

मोहन कि मीरा , अगदी बरोबर .
सप्तम स्थानावरून कायदेशीर जोडीदार बघतात . माझ्यामते अशा पत्रिकांमध्ये शुक्र सुद्धा बिघडलेला असतो .
बहुतेक वेळा शुक्राचा हर्शल किंवा राहू शी कुयोग असतो . तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पंचम आणि अष्टमाचे सबंध असतात . पण कोणी तसे विचारायला येत नाही.

वैवाहिक सौख्य पहाताना - लौकिक अर्थाने विवाह - ( गांधर्व विवाह नाही ) ज्याला सामाजिक मान्यता आहे याच बरोबर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारी पुरुषार्थ ( फक्त पुरुषांसाठी नाही ). पहाणे आवश्यक ठरते.

यात सप्तमस्थानातील ग्रह, सप्तमेश आणि शुक्र यासर्वांच्या अभ्यासाने फल वर्तवणे योग्य ठरते.

नेमका आहे हो लेख!!!!

मायला सद्ध्या आमचे योग विक आहेत बहुदा!!! आम्ही कदाचित "ब्रह्मचारी" "बुच्चेच" मरणार!!!

बेसिक प्रश्न :

जेंव्हा तुम्ही ज्योतिषी दुसरं, स्प्तम इ. स्थान म्ह्णता तेंव्हा प्रत्रिकेत नेमकं कोणतं स्थान पहायच? ज्या घरांत २ / ७ इ. आकडे लिहिले आहेत ते स्थान का स्टँटर्ड पत्रिकेतलं दुसरं / सातवं घर..माझा याबाबतीत फार घोळ होतो.

जेंव्हा तुम्ही सप्तमेश म्हणता ते जरा एक्स्प्लेन कराल का? म्हण्जे सात हा आकडा लिहिलेल्या घरात असणारा ग्रह का?

आकृती काढून दाखवता येइल का?

अपर्णा,

मला वाटते हा धागा ज्यांना थोडेसे ज्योतिष समजते त्यांच्या साठी असावा. आपल्या नेमक्या प्रश्नांच्या उत्तराने सुध्दा आपले औत्सुक्य संपणार नाही. आपण विचाराल की सातवेच स्थान का ? इ. यासाठी श्री धुंडिराज पाठक लिखीत पुस्तक वाचुन आपले बेसीक पक्के करा मग पहा नवीन नवीन वाचायला कशी मजा येते.

अपर्णा दिलेली लिंक बघा त्यात धोंडोपंतांनी एक पत्रिका दिलीय. त्यात ९ आकडा जिथे आहे, ते पत्रिकेचे पहिले स्थान आहे, त्याला लग्न स्थान असेही म्हणतात. त्यावरुन व त्यातल्या राशी, ग्रहांमुळे माणसाचा स्वभाव वगैरे कळते. जिथे १० आकडा आहे, ते दुसरे धन स्थान आहे.

११ आकडा- तिसरे स्थान अशी पत्रिकेत एकुण १२ स्थाने आहेत.

http://dhondopant.blogspot.in/

पत्रिकेतला ९ आकडा म्हणजे त्या मुलीचे/ मुलाचे धनु लग्न आहे. कारण धनु राशीचा ९ नंबर आहे.

अर्पणा , तुम्हाला बेसिक पासून शिकायचे असेल तर राशीचक्र हे शरद उपाध्ये ह्यांचे पुस्तक चांगले आहे.
रश्मी ह्यांच्या post वरून पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.

नितीनचंद्र, रश्मी, अन्विता : धन्यवाद.

मी धोंडोपंताच्या ब्लॉग वर पत्रिका पाहून आहे. मी ज्योतिष शिकत नाहीये सध्या पण इंटरेस्ट आहे. पण मला त्यातली टर्मिनॉलॉजी कंफ्युज करते.

उदा. जी धनु लग्नाची पत्रिका आहे त्या पत्रिकेला बेस धरून मला त्यातला सप्तमेश , लग्नेश म्हणजे कोणता ग्रह ते सांगता का?

Pages