कधी कधी फार वाटते .....

Submitted by वैवकु रीटर्न्स on 16 October, 2013 - 14:54

कधी कधी फार वाटते लगेच हाराकिरी करू
सुमारशी जिंदगी जगू सुमारशी शायरी करू

तिलाच राधा म्हणेन मी.. मिळेल ना बायको मला ?
मदत करा यारहो जरा मला अता श्रीहरी करू

खुशाल हे ढाळुनी पदर जनात फिरणे बरे नव्हे
निलाजरी वेदना तुझी तिला जरा लाजरी करू

पिऊन आता वियोग हा करेन इच्छा पुरी तुझी
हजार रातीस जागुया हजार कोजागिरी करू

नकोच हा खेळ खेळणे मला असूदेत वाखरी
मला कुठे राज्य पाहिजे नका मला पंढरी करू

महाग झाले जिणे किती पगार कोणा पुरेच ना
चला पुन्हा शेत नांगरू चला पुन्हा बाजरी करू

कुणी म्हणे तू जुना हबा कुणी म्हणे तू नवा मभा
म्हणायचे तर म्हणोत की उगाच का खातरी करू

नकोस ना हट्ट विठ्ठला धरूस असला पुन्हा कधी
तुझ्या तळातील वीट मी कसा मला पायरी करू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वैभव कुलकर्णी, रचना बरी आहे, पण मस्त बाजरीच्या भाकरीत मध्येच कचकच लागावी तसे वाटते अधेमधे.

आपण काही रचना/प्रतिसाद नएको या आयडी ने आणि काही वैवकु या आयडी ने का करतात्/देतात हा प्रश्न पडलाय (उत्तर द्यावेच असे नाही... हा प्रश्न मला पडलेला आहे, विचारलेला नाही)

मस्त जमलीय ही गझल !

खुशाल हे ढाळुनी पदर जनात फिरणे बरे नव्हे
निलाजरी वेदना तुझी तिला जरा लाजरी करू.....वा वा !

पिऊन आता वियोग हा करेन इच्छा पुरी तुझी
हजार रातीस जागुया हजार कोजागिरी करू.......क्या बात !

महाग झाले जिणे किती पगार कोणा पुरेच ना
चला पुन्हा शेत नांगरू चला पुन्हा बाजरी करू.......आ हा मस्त मस्त !

मतला जबरीच !

आवडली गझल...

नकोच हा खेळ खेळणे मला असूदेत वाखरी
मला कुठे राज्य पाहिजे नका मला पंढरी करू

महाग झाले जिणे किती पगार कोणा पुरेच ना
चला पुन्हा शेत नांगरू चला पुन्हा बाजरी करू

नकोस ना हट्ट विठ्ठला धरूस असला पुन्हा कधी
तुझ्या तळातील वीट मी कसा मला पायरी करू --->>

या शेरांना विशेष पसंती...

महाग झाले जिणे किती पगार कोणा पुरेच ना
चला पुन्हा शेत नांगरू चला पुन्हा बाजरी करू---> या शेरावरून माझा आठवलेला शेर

उगीच इथल्या लाचारीने झिजले मणके
चला दोस्तहो नांगर हाती परत धरू या

कुणी म्हणे तू जुना हबा कुणी म्हणे तू नवा मभा
म्हणायचे तर म्हणोत की उगाच का खातरी करू

या संदर्भात कालच डॉ. कैलास गायकवाड सरांबरोबर बराच वेळ चर्चा झाली होती.... ह.बा. ची आठवण झाली होती म्हणून आणि बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या.. त्यापैकी वरील शेराचा आशय ही एक.... आणि आज हा शेर समोर म्हणजे निव्वळ योगायोग...

महत्वाचे : न.ए.कु. हा वैभव आहे हे समजल्याने आनंद झाला... नवाच नसून जुनाच एक कुणीतरी असल्याची भावना झाली.. Happy

नकोच हा खेळ खेळणे मला असूदेत वाखरी
मला कुठे राज्य पाहिजे नका मला पंढरी करू

व्वा.
बाकी, बहुतेक शेर अपरिपक्व.
राग नसावा.

नकोच हा खेळ खेळणे मला असूदेत वाखरी
मला कुठे राज्य पाहिजे नका मला पंढरी करू

महाग झाले जिणे किती पगार कोणा पुरेच ना
चला पुन्हा शेत नांगरू चला पुन्हा बाजरी करू

विशेष !

कधी कधी फार वाटते लगेच हाराकिरी करू
सुमारशी जिंदगी जगू सुमारशी शायरी करू<<< वा वा

बाजरी हा शेरही मस्त!

मतला आवडला .

कधी कधी फार वाटते लगेच हाराकिरी करू <<विशेष !

खुशाल हे ढाळुनी पदर जनात फिरणे बरे नव्हे
निलाजरी वेदना तुझी तिला जरा लाजरी करू

नकोस ना हट्ट विठ्ठला धरूस असला पुन्हा कधी
तुझ्या तळातील वीट मी कसा मला पायरी करू

छान !
काहीकाही शेरांमधली मनस्थिती मला अगदीच वेगळी वाटली
.

वा...मजा आली वाच्ताना...छान
अरे पण हबा आहे कुठे सध्या? त्याला राम राम सान्गा रे माझा कुणीतरी