दसर्‍या निमीत्ताने झालेले मिनी डोंबिवली मायबोलीकर भेट.....

Submitted by jayant.phatak on 14 October, 2013 - 11:18

गेले २/३ दिवस होणार होणार म्हणून मायबोली वर गाजणारा "डोंबिवलीत राहणारे मायबोली कर" काल दसर्‍यानिमीत्ताने भेटले.

खरे तर गणपती उत्सवापासूनच एकमेकांना भेटायची ओढ होतीच पण मुहुर्त लागत न्हवता.तो काल लागला. अंजू आणि मी एकमेकांना ओळखत होतोच.पण आता अजुन इतर जणांना पण एकमेकांना भेटायची ओढ होतीच.

एकमेकांना व्यक्तिगत निरोप दिल्या गेले आणि वेळ / ठिकाण नक्की करण्यात आले.४/५ जणच असल्याने श्री.एस.आर.डी. ह्यांनी सांगीतलेले बालभवन ठिकाण लगेच मंजूर पण झाले.संध्याकाळी साडे पाच ते सहा पर्यंत जमायचे असेही ठरले.

ठरल्या वेळेप्रमाणे ठीक साडे पाच वाजता श्री.एस.आर.डी. आले. ६ वाजता सौ.अंजू आली. मी आणि आमची अर्धांगिनी अंमळ थोड्या उशीरा म्हणजे ६ वाजून ५ मिनिटांनी पोहोचलो.

थोडा वेळ गप्पा टपा आणि ओळखी होत आहेच तोच अंजू आणि हिला त्यांची बाल-मैत्रीण दिसली. प्रथे प्रमाणे हिने लगेच बायकोपण निभावले आणि मला सोडून मैत्रीणींच्या गप्पात सामील झाली.मी आणि श्री.एस.आर.डी. ह्यांनी वेळेचा फायदा उठवला आणि एकमेकांना आपापली (खरे तर श्री.एस.आर.डी. ह्यांनीच जास्त) माहिती दिली. माझ्या पेक्षा श्री.एस.आर.डी.ह्यांना बर्‍याच विषयांत जास्त गती असल्याने मी मौन व्रत धारण केले.(आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? आणि हात दाखवून अवलक्षण करण्यापेक्षा मी झाकली मूठ सव्वा करोडची (आज काल सव्वा लाखांत काय येत हो?) ठेवण्याचा शहाणपणा केला. )

इथे आमचे बोलणे चालू असतांनाच आमची ही एकदम ओरडली "ओ बाई" मी आपला इकडे-तिकडे बघायला लागलो बघितले तर "काळे बाई". (हिच्या शाळेतल्या शिक्षकांना मी कसा काय ओळखतो, ते विचारू नका.योग्य वेळ येताच खूलासा करण्यात येईल.) त्यांना बघितल्या मुळे हिचा कंठ दाटून आला होतो तर अंजूला त्यांना एकदम कसे काय बोलवायचे? असा प्रश्र्न पडला होता.

मी लगेच हाक मारली, "ओ काळे बाई."

पुलंनी सांगीतल्या प्रमाणे आम्ही सगळे पुरुष चार चौघात वापरायचे अधिकार आणि त्यावेळी लागणारा आवाज राखून आहोत.त्यांनी पटकन माझ्याकडे बघीतले.मला तो पुलंचा "असामी असामी" मधला किस्सा आठवला अणि जास्त वेळ वाया न घालवता मी सरळ बायकोकडे बोट दाखवले. (बघीतलेत वाचनाचा होकरात्मक परीणाम होतो तो असा.)

काळे बाईंनी त्यांच्या विद्यार्थींना ओळखले आणि मग समस्त शिक्षक आणि विद्यार्थीनी वर्ग जुन्या आठवणीत रमला.रस्त्याने येणारे-जाणारे विविध नजरेने ह्यांच्या चर्चेमुळे होणार्‍या हालचालींकडे नजर ठेवून होता.

मी आणि श्री.एस.आर.डी. परत मूळ विषयाकडे वळलो.माझे थोडे ऐकणे होत आहे तोच हेमांगी पुरोहित ह्यांचा फोन आला.नीट पत्ता वगैरे विचारून त्या पण आल्या.त्या आल्या आणि तो पर्यंत काळे बाई निघायच्या तयारीला लागल्या.

हेमांगी पुरोहित आणि त्यांच्या मुलीशी आम्हा सगळ्यंची ओळख झाली.२/४ मिनीटातच कविन आणि तिचे यजमान त्यांच्या मुलीसह आले.ते पण माबोकर आहेत असे समजले.हळू हळू एक एक विषय निघत गेला आणि थोड्या वेळासाठीच एकत्र जमायला येणारे आम्ही तब्बल १ ते १.५ तास गप्पा मारत बसलो.मध्येच कुणाला तरी हॉटेलमध्ये जाण्याची तल्लफ आली पण रंगलेल्या गप्पा सोडून हॉटेलात जायची कुणालाच इच्छा झाली नाही.

एकमेकांना आपट्याची पाने देवून झाली आणि श्री.एस.आर.डी. ह्यांनी एक विशेष गोष्ट केली.त्यांनी आपट्याच्या पानांच्या ऐवजी प्रत्येकाला एक एक छोटे रोप दिले.

नंतर प्रथे प्रमाणे फोटो काढण्यात आले.मागच्या अनुभवामुळे मी कॅमेरा हातात घेतला नाही.

फोटो काढून झाले म्हणजे आता घरी जायला हरकत नाही असेच सगळ्यांना वाटले आणि मग विषय सुरु झाला की, आता परत कधी भेटायचे? देणे-घेणे असलेलाच सण जास्त चांगला असे ठरले आणि मग संक्रातीला नक्की भेटायचे असे ठरवून प्रत्येक जण आपापल्या घरी निघालो.

तर बंधूंनो आणि भगिनिंनो , ह्या संक्रांतीला समोरासमोर परत भेटू या.....

जय हिंद
जय महाराष्ट्र
जय मायबोली

फोटो १

https://lh5.googleusercontent.com/-wX1NIsQoVc8/UlwJWoes_XI/AAAAAAAAAJI/G...

फोटो २

https://lh5.googleusercontent.com/-R03AyCWvjD4/UlwJdD8oILI/AAAAAAAAAJM/9...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> श्री.एस.आर.डी. ह्यांनी एक विशेष गोष्ट केली.त्यांनी आपट्याच्या पानांच्या ऐवजी प्रत्येकाला एक एक छोटे रोप दिले. >=+१

मायबोलीवर मी नवीनच असल्याने आणि मुरबाडच्या वर्षाविहारला न गेल्याने मला देखिल नवीन आयडींना भेटून आनंद झाला .ज्या आयडींना आपण त्यांच्या लिखाणातून ओळखतो त्यांना प्रत्यक्ष भेटण्यात गम्मत वाटते .विशेष म्हणजे आयडींच्या मुलांनीही एकमेकांशी ओळख करून घेतली .ते आमच्या पुढे जाणार .हॉटेलिंग नसल्याने सर्व लक्ष गप्पांमध्येच राहिले .त्याऐवजी एक दिवस माथेरानला जाऊ असा विचार मी विवनकडे ,जयंतरावांकडे मांडला .एकंदर बालभवनच्या साक्षीने डोंबिवलीकर मायबोलीकरांनी दषऱ्याची श्री लिहिली .

वा छान वृत्तांत,

मी डोंबिवलिला यायला हव होतं Sad

श्री.एस.आर.डी. ह्यांनी एक विशेष गोष्ट केली.त्यांनी आपट्याच्या पानांच्या ऐवजी प्रत्येकाला एक एक छोटे रोप दिले. >>> सुंदर कल्पना