राखणीला

Submitted by devendra gadekar on 13 October, 2013 - 07:50

रोज मी समजावतो या पापणीला .
विसर ना आतातरी तू साजणीला .

तू मला येतेस आई याद तेंव्हा
पाहतो जेंव्हा नभी मी चांदणीला.

सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला .

एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .

तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.

नि:शब्द(देव)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखणीला मस्त
अख्खी गझल छानच देवा
असेच काफिये घेवून आलेली माझीही एक गझल आहे ती आठवली
तिच्यातही आईवरचा शेर होता तो आठवला.... Sad

कसा जाऊ पुण्याला नि शोधू नूकरी मी
कुणी नसणार आई तुझ्या वेणीफणीला

छानच

आवडली गझल.
ऐकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .

तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.

व्वा !

एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .

तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.<<<

वा व्वा

सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला .

एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .
व्वा !
छान गझल .

सारखे जोडू नको तू हात ऐसे,
देव ही कंटाळतो रे मागणीला .

एकले मी झोप ही चोरीस जाते,
चंद्र आहे ठेवला मी राखणीला .

तू कशाचे बीज होते रोवलेले,
काढल्या जखमा अता मी कापणीला.

व्वा…

सुंदर गझल.