चष्म्याचा नंबर कमी करणे / घालवणे

Submitted by rakhee_siji on 11 October, 2013 - 13:40

माझ्या ६ आणि ११ वयाच्या मुलीना चष्मा लागला आहे . ६ वर्ष्याच्या मुलीला astigmatism २. ७५ आहे . हा नंबर जाण्यासाठी काही औषधे / आयुर्वेदीक उपाय आहे का ? किंवा डोळ्याचे व्यायाम आहेत का ?
धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबईला डॉ विराम आगरवाल आहेत.ते डोळ्यचे व्यायाम शिकवतात. १५ दिवसाचा कोर्स असतो.माझ्या मुलीचा नंबर थोडा ़ कमी झाला.

मला ९ वर्ष झाले चष्मा आहे.
आणि तो नेहमी वाढतच असायचा... मागच्या वर्षी माझा नंबर २ आणि २.३० होता.
मग चांगला दिसत नाही म्हणुन मी चष्मा घालणं कायमच बंद केलं. फक्त परिक्षेपुर्ता वापरते आणि कसा ते माहीत नाही पण माझा चष्मा कमी झालाय.
आता ऑगस्ट मध्ये नवा चष्मा बनवला तेंव्हा तपासलं तर आता तो १ आणि दिड आहे.
जीने माझे डोळे तपासले तिच्या मते हे असं होणं अशक्य आहे. पुर्वी ज्याने माझा चष्मा बनवला त्याने चुकीचा नंबर टाकला असेल.
तसही असेल तर मग माझा नंबर मागच्या एका वर्षापासुन अजिबात वाढलेला नाही.
या मागचं कारण मला माहीत नाही पण माझ्या ज्या ज्या मैत्रिणी चष्मा असुन वापरत नाहीत त्या त्या मैत्रिणींचा नंबर स्थीर राहिलाय किंवा कमी झालाय. आणि जे जे कायम स्परुपी चष्मा वापरतायेत त्यांचे त्यांचे नंबर वाढतायेत.

याला काहीच आधार नाही. हे अनुभवातुन सांगतेय. कदाचित बोलाफुलाची गाठ पडली असेल किंवा इतरही काही झालं असेल. मला ते माहित नाही. डॉक्टर्सच्या म्हणण्यानुसार सतत चष्मा वापरावा तेंव्हा हे ऐकुन काही निर्णय घेऊ नका.

रिया.
प्लस नंबर असेल तर कमी होतो.मायनस नंबर असेल तर कमी होत नाही. माझ्या एकाच डोळ्याला कित्येक वर्षे मायनस नंबर होता.पण वर्षभर चष्मा न लावल्याने दुसर्‍या डोळ्यालाही नंबर आला आहे.
सिलेंड्रिकल नंबर ( तोही एका डोळ्याला) व दोन नंबरामधे भरपूर फरक आहे.

चष्मा चांगला दिसत नसेल तर कॉन्टॅक्ट लेन्स वापरा अथवा लेजर सर्जरी करून घ्या. चष्मा नंबर असतानादेखील न वापरणे हे डोळ्यांसाठी घातक आहे. चाळीशीनंतर जास्त प्रॉब्लेम येऊ शकतो.

कॉन्टॅक्ट लेन्स वापरा अथवा लेजर सर्जरी करून घ्या. >>>
सहमत.माझ्या ओळखीच्या ३ जणींनी लेझर सर्जरी करून घेतली आहे.त्यातली १ डॉक्टर आहे.त्यांचा नंबर गेला असून चाळीशीचा चष्मा खूप नंतर लागेल असे सांगितले.

मी प्रथम लेझर सर्जरीच्याविरोधात होते. कारण डोळ्यांचे डॉक्टर स्वतः चष्मा वापरतात.ते लेझर सर्जरी करून घेत नाहीत.पण ओळखीच्या ३ जणींनी करून घेतली .त्यामुळेही असेल ,शिवाय सिलेंड्रिकल नंबरमुळे डोळे + डोकं दोन्ही दुखायचे.त्यामुळे लेझर सर्जरी करायची ठरवली होती.पण काही वै.प्रॉब्लेममुळे व मा.बो.वरील इब्लिस यांच्या पोस्टमुळे टाळली.

rakheesiji
६ वर्ष्याच्या मुलीला astigmatism २. ७५ आहे>>>> याबाबतीत डॉक्टरना विचारा.'ए' व्हिटमिनचे ड्रॉप्स देतात.बाकी आहारातून 'ए' व्हिटमिन जाईल असे पहा.

पालेभाज्या खात जा,,,,,,,

मी कंम्पुटर वर १४ तासापेक्षा जास्त वेळ काम करतो,, गेली 9 वर्ष,,,

लहानपणी नखरे न करता पालेभाज्या खात होतो,,, Wink

arjun1988
धन्यवाद! एक विनंती करू का? तुम्ही कोणते व्यायाम केलेत, ते सांगाल का? कारण ३० लिंक्स वाचायच्या म्हणजे
परत डोळ्यांना त्रास.

रीयासारखा माझाही अनुभव आहे, मला मी ६वीत असताना चष्मा लागला. तेव्हा no होता ०. ५,
डॉक्टर म्हणाले होते कायम वापरलं तर no कमी होईल, तव्हापासून मी नेहमी चष्मा वापरते आज माझा no ३ पेक्षाही जास्त अहे. माझ्या भावालाही ०. ५ no चा चष्मा होता , कधीही लावला नाही, आणि खरोखरच त्याचा no पूर्णपणे गेला,

माझ्या काकू ४० वर्ष चष्मा वापरताहेत आणि आता वयाच्या ८० व्या वर्षी त्यांच्या चष्मा पूर्णपणे गेला, कसा काय काळत नाही, पण लांबच जवळच सगळ स्पष्ट दिसायला लागलं. असो.

rakheesiji,

त्रिफळा चूर्ण घेतल्याने नं. कमी होतो असा वचलय. तसेच ज्योती त्राटक व्यायामाने फरक पडतो, मी शिकले होते , परंतु सातत्य राखता आलं नाही, झोपताना तळपायांना तेल लावल्याने डोळ्यांच तान कमी होतो. एरण्डेल तेलाचा हात पापण्यांना लावल्यानेही फरक पडतो , हे उपाय मी स्वत नेहमी करते.

तसे माझ्या पाहणीत आजकाल लहान वयात च्ष्मा लाग्ण्याचे प्रमाण जास्त आहे असे वाटते! तेही सिलेंड्रिकल नंबर चे!

उंची वाढ्ण्याचे प्रमाणही जास्त आहे असे वाटते.

ह्या 'उंची वाढ्ण्याच्या' पेयांचे 'दुष्परिणाम' तर नव्हेत?

जलनेती ने थोडा फायदा होतो आसे ऐकले आहे. मला त्यात तथ्य वाटते.

माझा नंबर मायनस मध्येच होता Happy

नंदिनी मला लेन्सेसची भिती वाटते.
च्ष्मा न वापरणं घातकं आहे याची पुर्ण जाणीव आहे. पण आता खरचं कंटाळा आला
नंबर इतका कमी झालाय तर विचार करतेय अजुन थोडे दिवस मी हा प्रयोग करुन बघावा. नाही तर वापरेनच कायम स्वरुपी

व्यायामाने नंबर कमी होतो हा चुकीचा समज आहे...हे (किमान) माझ्या बाबतीतले अनुभवसिद्ध मत आहे.
मी लहानपणापासून..म्हणजे साधारण सहावी सातवीत होतो तेव्हापासून चष्मा वापरायला सुरुवात केली होती आणि तो नियमितपणे वापरत असे...माझा नंबर सतत वाढतच होता....मी डोळ्यांचे व्यायाम नियमित करत होतो...अ जीवनसत्वाच्या गोळ्या, तसेच आहारातही गाजर वगैरेसारख्या तत्सम अ जीवनसत्व भरपूर असणार्‍या गोष्टी खात होतो...पण कशाचाही फायदा (मला तरी) झाला नाही.....वयाच्या पंचविशीत डोळ्यांचा नंबर (-९) झालेला होता...त्यानंतर मी १९७२ साली नेत्रस्पर्षी भिंगं(कॉन्टॅक्ट लेन्सेस) वापरायला लागलो....पुढे बरीच वर्ष माझा नंबर स्थिर राहिला....त्यानंतर पुन्हा तो वाढायला लागला तो साधारण (-१३) पर्यंत वाढला....वयाच्या पन्नाशीत दोन्ही डोळ्यांवर मोतिबिंदू शस्त्रक्रिया झाली...डोळ्यातच भिंगं बसवली गेली...आणि मग माझा दूरचा नंबर, चष्म्यासाठीचा (-१.५) वर स्थिर झाला....मला जवळचं वाचण्यासाठी कधीही चष्मा लागला नाही...आजही, ६१सष्टाव्या वर्षीही लागत नाही. Happy

@ रीया ,

हा माझ्या वडीलांबद्दलचा अनुभव आहे ..त्यांचा नंबर कमी झाला असे जाणवले ..तेव्हा नेत्र तज्ज्ञांकडे चेक केले..
तेव्हा त्यांनी हे निदान आणि लक्षण सांगितले ..तेव्हा नंबर कमी होत असेल तरीही चांगल्या डॉक्टर कडे चेक करणे श्रेयस्कर ..

उप्स ! सहा वर्षांच्या मुलीली चष्मा म्हणजे त्रासच तिला. आणि आईलाही काळजी. ( प्लीज प्लास्टीक लेन्सचाच चष्मा वापरा. लाइट वेट म्हणुन आणि खेळताना पडला, फुटला, जखम झाली असं होत नाही).
तुझ्या मुली लेसर सर्जरीसाठी लहान आहेत, पण मी स्वानुभवामुळे लेन्सपेक्षा सर्जरी नक्कीच रेकमेंड करेन (सर्जरी मात्र १८ नंतरच करतात.)
मला प्रथेप्रमाणे १०वीमधे चष्मा लागला आणि नंबर तुफानी वाढत गेला. मी कायमच लेन्सेस वापरल्या, पण अती लेन्स वापरामुळे माझे droopy eyes झाले होते, म्हणुन डॉ. ने नंबर जाण्यासाठी लेसर सर्जरी करायला सांगितली. मी २००५ मधे सर्जरी केली, आणि अजुनतरी काहीही साइड इफेक्ट जाणवत नाही. नंबर पुर्ण गेला आहे. फक्त समरमधे, आय मेकअप केला तर आणि अति लॅपटॉपच्या कामानंतर डोळे ड्राय होतात. पण टिअर ड्रॉप्सने किंवा रोझ वॉटरच्या पट्टीमुळे त्रास होत नाही.

बाकी गाजर ज्युस, डोळ्याचे व्यायाम आणि बाकी बाह्यउपचार कितपत फायदेशीर आहेत कोणास ठावुक.

इब्लिसदादा, माझा वाढला की
लागला तेंव्हा -०.२५ , ०.० होता
मग वाढत वाढत
-०.५, -०.२५
-१.०,-०.५
-१.५,-१.०
-२.०,-१.५
-२.५,-२.०
असा वाढला

पण आता स्टेबल झाला असेल ना रिया? तुफानी वाढणं म्हणजे ७-८ पेक्षा जास्त नंबर असतो ना ते. २ - २.५ म्हणजे काही जास्त नाही नंबर.

माझा चश्मा ६-७ वीत कधीतरी लागला. बहूतेक एकोणीस-विसाव्या वर्स्।ई नंबर २.५ वर येवून स्टेबल झाला. नेहेमी वापरायला सांगितले होतेच डॉ नी. कदाचीत कमी होईल म्हणाले होते, पण नंतर मात्र, जोपर्यंत तुमची शारिरीक वाढ होते तोपर्यंत आणि त्यानंतरची २-३ वर्षे लागतात नंबर स्टेबल व्हायला असं सांगितलं होतं. (बहूतेक म्हणूनच १८ वर्षे होईपर्यंत सर्जरी करत नाहीत. )

१-२ वर्ष मी लेन्सेस पण वापरल्या. पण त्या खूप अनकंफर्टेबल वाटायच्या.नंबर स्टेबल झाल्यावर जवळपास १०-१२ वर्ष सर्जरी हो-नाही चाललं होतं माझं. शेवटी ३ वर्षांपूर्वि सर्जरी केली. आता अजूनतरी काही त्रास नाही. पणसर्जरी नसती केली तरी चाललं असतं असं बर्‍याचदा वाटतं मला.

आता वयाच्या पाचव्या वर्षी मुलाला चश्मा लागला आहे. त्यालाही पूर्णवेळ वापर सांगितलाय. डोळ्यांचे व्यायाम पण सांगितलेत. तो चश्मा वापरतो बर्‍यापै़की पूर्णवेळ. एक्सरसाइझेस मात्र नाही करत. सहा महिन्यांनी परत तपासणी करेनच. डॉ. चं मत होतं सहा महिन्यांनी बहूतेक चश्म्याची गरज लागणार नाही. Happy

हो. मला ३०००० खर्च आला होता सर्जरीचा. म्हणून तर खूपदा वाटतं नसती केली तरी कही जास्त फरक पडला नसता. मला खरं तर चश्म्याचा तसा काहीही त्रास नव्हता. (डोळ्यांच्या जवळ नाकावर खुणा होणे आणि गॉगल घालता न येण्र याव्यतिरिक्त Proud )

रिया,
सर्जरी खरी "महाग" पडते, जेव्हा कॉम्प्लिकेशन होते.
पैसे हा हिशोबच्च नाही.
जर ही सर्जरी 'फेल' झाली तर सरळ नेत्रदानाचा डोळा शोधत फिरावे लागते.
http://www.lasikcomplications.com/
हे वाचा, ऐका, पहा.
चष्म्याचा नंबर हा काही क्याण्सर वा एड्स नव्हे, की ज्याला तुम्ही आम्ही इतका वाईट समजतो.
ही डोळ्याची चप्पल आहे असा विचार करून पहा.
व्हिजुअल एड. 'आरामशीर' पहाण्यासाठी मदत.
लोक विना चपलेने चालतात.
लोक चप्पल्/बूट घालून ५* बेडमधे झोपूही शकतात.

आजाराने डोळा बंद पडणार, म्हणून ऑपरेशन करून घेणे, उदा. मोतिबिंदू. ऑपरेशन केले नाही तर अंधत्व येणार हे १००%नक्की. केल्यावर डोळा फुटण्याची शक्यता १० हजारात ३. अ‍ॅक्सेप्टेबल. (आर्बिटरी .००३% फेल्युअर रेट गृहित धरला आहे. प्रत्यक्षात जास्त असावा. वर कुणीतरी डोळ्याचे डॉक्टर चष्माच वापरतात वगैरे लिहिले आहेच.)

आता 'चष्म्याचा नंबर घालवायचे ऑपरेशन' चा विचार करा.
नाही केले तर १००% वेळा चष्मा लावून दिसेलच.
केले, तर दहा हजारात ३ डोळे आंधळे होणार.

रिस्क-बेनिफिट रेशो??

असो.

हो इब्लिस. खूप मोठी रिस्क आहे, जी मी विनाकारण घेतली होती. Happy

रिया, मला जरी काहीही त्रास नाही झाला तरी शेवटी ही सर्जरीच आहे. काहीही होवू शकतं. आणि हो जरी नंबर गेला ऑपरेशनने तरी ५-१० वर्षांनी परत चश्म्याचा नंबर लागू शकतो. नेहेमीसाठी नंबर जाणार याची काहीही खात्री नाही.

अल्पना
ऑपरेशनची व आधीची नंबरची सर्व कागदपत्रे कायमसाठी जतन करून ठेवा.
कॉर्निअल कर्व्हेचर बदलले गेले आहे. त्यामुळे जर ७०वर्षे वयात कदाचित मोतिबिंदू वै झाला, तर पुढे हिशोब करताना डॉ. ना उपयोगी पडतील.

***

या निमित्ताने एक अवांतर टेक्नो सॅव्ही सूचना.

आपल्या सगळ्यांच्या मोबाईलला क्यामेरे असतात.
कार्डावर भरपूर मेमरी असते. फुकटातले क्लाऊड स्टोरेज असते.
त्यातला एकादा फालतू टॉकिंग टॉम इ. गेम डिलीट मारा, अन-
आपले महत्वाचे ब्लड रिपोर्ट्स. चष्म्याचे नंबर्स. बीपी, डायबेटीस, इ. भरपूर दिवस चालणार्‍या आजाराच्या ट्रीटमेंटची प्रिस्क्रिप्शन्स, मुलांच्या लशीकरणाचे शेड्यूल्स व दिलेल्या लशींचे रेकॉर्ड्स. इ. यांचे फोटो काढून ठेवत जा. फायदेशीर असते.

इब्लिस. चांगली सूचना, मी ऑलरेडी सर्व रिपोर्ट्स स्वतःला ईमेल करून ठेवले आहेत. त्याखेरीज पर्समधे ब्लड ग्रूपची माहिती देणारी आणि ईमर्जन्सीला कुनाला कॉन्टॅक्ट करायचे ही चिठ्ठी कायम ठेवली आहे.

मला आठवीत असताना चष्मा लागला, त्यावेळेला नंबर -०.५ होता, नंतर वाढत वाढत आता ३ वर येऊन थांबलाय. मी पाचेक वर्षापूर्वी लेन्सेस वापरायला सुरूवात केली, अर्थात कायम वापरत नाही. बाहेर जाताना केवळ वापरते. कॉलेजमधे आमच्या ग्रूपमधे बिनाचष्म्याचं कुणीही नव्हतं. नंतर आता लग्नं झाल्यावरदेखील आमचे सर्वांचे जोडीदार चष्मेधारीच आहेत!! Happy
सर्जरीचा ऑप्शन मी विचार केला होता, पण त्याने अजून पाच दहा वर्षांनी पुन्हा चष्मा येऊ शकतो असं सांगितल्यावर उत्साहच राहिला नाही. एवढे पैसे घालून परत नंबर आलाय तर उपयोग?? त्यापेक्षा तेवढ्या पैशामधे भारीमधले दहा बारा चष्म्याचा फ्रेम्स येतील असा विचार केला!!!

इब्लिस, सर्जरीबद्दलची पोस्ट आवडली!

माझ्या एका मैत्रीणीची (लग्नात अडथळा नको म्हणून) २५ वर्षापुर्वी फेल झालेली शस्त्रक्रिया आठवली तर अजुनही अंगावर काटा येतो! खुप दिव्यातुन गेली बिचारी आणि चष्म्याचा नंबर तेव्हढाच राहिला होता... चष्म्यात हल्ली खर तर किती स्मार्ट ऑप्शन्स आहेत. लेन्सेसमध्ये पण शेडस आहेत.

रिपोर्टस मोबाईलमध्ये ठेवण्याची टीप पण छानच.

मला लहानपणीच (सातव्या वर्षी) चष्मा लागला. लागला तेव्हा 1.5 होता तो पंचविशीपर्यंत वाढत वाढत 5.5ला पोचला. त्या चष्म्यामुळे कायम अनेक टोमणे ऐकले. ऍक्टिव्हिटींवर मर्यादा आल्या. 7-8 वर्षे लेन्सही
वापरल्या, पण त्रास व्हायला लागल्यामुळे वापरणे बंद करावे लागले.
लेसर ट्रीटमेंटबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट मिळाल्याने तेव्हा (सुमारे 15 वर्षांपूर्वी)
तो विचार सोडून दिला होता.
पण 2-3 वर्षांपूर्वी लेसर सर्जरी क्षेत्रातील एका तज्ज्ञाकडून, ज्याच्यावर आमचा अगदी संपूर्ण भरवसा आहे, या ट्रीटमेंटबद्दल चांगला रिपोर्ट मिळाला. मी निर्धास्तपणे ऑपरेशन करून घेतले. कसलाही त्रास झाला नाही. आणि आता इतके छान वाटते आहे की काय सांगू!
त्या तज्ज्ञाकडून असेही कळले की ऑपरेशन फेल म्हणजे फार तर फार परत चष्मा लावावा लागेल.

त्या तज्ज्ञाकडून असेही कळले की ऑपरेशन फेल म्हणजे फार तर फार परत चष्मा लावावा लागेल.
<<
संपूर्णपणे चुकीची माहिती दिलेली आहे.
हे पहा
ते तुमचे तज्ज्ञ तद्दन खोटे बोलले आहेत. असो. ५-७ वर्षांनंतर तुम्ही पुन्हा चष्मा वापरावयास सुरुवात कराल तेव्हा बोलू.

btw,
if a surgery has 99% success rate and one percent mortality, it means, that ONE in 100 dies.
मी केलेल्या १०० पैकी एक मरतो.
माझ्या दृष्टीने ९९% सक्सेस. त्या एकाच्या दृष्टीने १००% मृत्यू. प्लीज हे समजून घ्या.
असो.

मी आधीही इथे प्रतिक्रिया दिली होती, परत जरा सविस्तर लिहिते आहे -

इथे बर्‍याच जणींनी 'चष्मा वाईट दिसतो/ टोमणे ऐकावे लागतात' सारखी विधानं केली आहेत. आपण सुशिक्षित असूनही अशा गोष्टी महत्वाच्या मानत असू, दुसर्‍यांच्या असल्या बुरसट विधानांना/टोमण्यांना भीक घालत असू तर मग कठीण आहे! हे म्हणजे आपण स्वतःच स्वतःची किंमत कमी लेखण्यासारखं आहे... चष्मा लागणं म्हणजे नाक/कान/डोळा जाणं, चेहेरा विद्रूप होणं असं काही आहे का? आणि बाह्य सौंदर्याचे निकष चष्म्यावर ठरतात का? तुमच्या शरीराच्या अधू अवयवाची काळजी घेणं महत्वाचं का इतरांच्या तथाकथित सुंदरतेच्या निकषात बसण्यासाठी धडपडणं? त्या लेसर सर्जरीमधे आणि अनावश्यक कॉस्मेटिक सर्जरीमधे काय फरक आहे? एखाद्याची एक्स्ट्रीम केस आहे आणि डॉकनेच अत्यावश्यक उपाय म्हणून सर्जरी सुचवली आहे अशी क्वचित केस असू शकते. नाहीतर बाकीच्या सगळ्या सर्जरीज उगाचच केल्या जातात असं मला वाटतं.

खूप लहान मुलांना चष्मा घालून काही अ‍ॅक्टिव्हिटीजवर मर्यादा येतात थोड्याफार. पण आता प्लास्टिक/फायबरच्या हाय इन्डेक्स फ्रेम्स मिळतात. त्यामुळे अतिशय सहजपणे चष्मा घालून वावरता येतं (तसंही १८वर्षांपर्यंत सर्जरी करायचीच नसते). बाकी चष्मा लावून एरवीच्या आयुष्यात कसलाही फरक पडत नाही. मला तेराव्या वर्षी चष्मा लागला. लागताना -२ होता. आता -२.५ आणि -३.५ आहे. मी खूप वर्षं रेग्युलर चष्मा (काचांचा) वापरला. नाकावर खूण आणि सनग्लासेस न घालता येणं एवढीच अडचण होती. गेली पंधरा वर्षं लेन्सेस वापरते आहे. लेन्स वापरायची पथ्यं असतात ती पाळते, सहसा दहा तासांपेक्षा जास्त घालत नाही. घरी असताना चष्माच घालते. मी लेन्स घालून फील्डवर्क केलंय, प्रवास केलाय, दुचाकी चालवली आहे, सतत कम्प्यूटरवर काम केलं आहे. माझं एरवीही सतत वाचनच चालू असतं. का ही ही त्रास होत नाही. मला कधी लेसरर्सर्जरी करायचा मोहही झाला नाहीये.
तेव्हा मला असं वाटतं की डोळ्यावर सर्जरी करून घेण्यापेक्षा स्वतःच्या मानसिकतेवर सर्जरी करून घ्यायची गरज जास्त दिसतेय इथे...

राहिता राहिली मूळ प्रश्नकर्तीचा प्रॉब्लेम - त्याच्यावर कुणाकडे काही ठोस वैद्यकीय माहिती असेल तर चर्चा करूयात

सनग्लासेस न घालता येणं
<<
अगदी रेबॅन सारख्या कंपन्याही प्रिस्क्रिप्शन नंबर्स मधे सनग्लासेस बनवून देतात.
नेहेमीचा चष्मेवाला बी२ नामक काचेत काळा नंबरचा गॉगल बनवून देईल.

इब्लिस, परत प्रिस्क्रिप्शनच्या सनग्लासेस कुठे बाळगा म्हणून आळस करायचे हे खरं कारण! Proud

!

एक वेगळाच लेन्सचा प्रॉब्लेम झालाय.

मागच्या रविवारी लेन्स घालून बाहेर गेले होते. परत आल्यावर रात्री डोळे आले (कंजक्टीवायरस)+अत्यंत वाईट थ्रोट इन्फेक्शन झालं. ते दोन दिवसांत बरं झालं पण त्यानंतर लेन्स घातल्याच नाहीत. काल लेन्स घातल्यावर उजवा डोळा खूपायला लागला आणि किंचीत लाल दिसायला लागला (असं मी म्हणतेय नवर्‍याच्या मते लाल दिसत नव्हता) तरीपन लेन्स इन्फेक्टेड झाली असेल का? तसं असेल तर स्वच्छ करयला काय वापरावे लागेल?

लेन्स अगदी नवीन म्हणजे नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या आहेत. आजवर वापरताना प्रॉब्लेम आलेला नाही.

corneal refractive therapy (CRT) overnight contact lenses for myopia
हे कोणी try केले आहे का?

http://www.paragoncrt.com/consumers/pat_info.asp

डॉक्टरांनी हे मोठ्या मुलीला recommend केले आहे. त्याने no स्टेबल राहून दिवसभर तीला चष्मा व लेन्सिस लावावे लागणार नाही. खूप प्रोमिसिंग वाटत आहे. कोणाचा अनुभव असल्यास please सांगा.

नंदिनी, हो! लेन्स इन्फेक्टेड झाली आहे. ती ऑप्टिशियनकडून डिसइन्फेक्ट करून घेता येईल पण ती लेन्स वापरूच नये असं मी सुचवेन.

इब्लिस, डिस्पोजेबल लेन्सेस एकदा सील उघडलं की तेवढ्याच कालावधीसाठी वापरायच्या असतात. त्या 'चालवू' नयेत. वीकली डिस्पोजेबल असतील तर आठवड्याच्यावर वापरू नयेत, मंथली डिस्पोजेबल महिन्याच्या वर वापरू नयेत, ३०चे अगदी ३२-३५ दिवसही नाहीत.

इथे कोणाला hyoermetropic asthigmatism आहे का ?
मला आहे आणि मला चष्मा वापरूनही मधल्या ( जवळचा नाही आणि खूप लांबही नाही ) अंतरावरचे वाचायला त्रास होतो, जे इतर सगळे सहज वाचतात. नंबर बदलाणे हा उपाय नाहीये कारण नाहीतर मला जवळचे वाचता येणार नाही . असाच अनुभव आणखी कोणाला येतो का ?

Pages