चष्म्याचा नंबर कमी करणे / घालवणे

Submitted by rakhee_siji on 11 October, 2013 - 13:40

माझ्या ६ आणि ११ वयाच्या मुलीना चष्मा लागला आहे . ६ वर्ष्याच्या मुलीला astigmatism २. ७५ आहे . हा नंबर जाण्यासाठी काही औषधे / आयुर्वेदीक उपाय आहे का ? किंवा डोळ्याचे व्यायाम आहेत का ?
धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इब्लिस, माझ्या अ‍ॅन्युल लेन्सेस आहेत. मी रोजच्या रोज लेन्स वापरत नसल्याने मंथली अथवा वीकली डिस्पोजेबल परवडत नाहीत. मंजूडी म्हणाली तसं माझ्या डोळ्यांच्या डॉक्टरनं तशा लेन्स दोन तीन दिवसही एक्स्ट्रा वापरू नकोस असं सांगितलं आहे.

डोळ्यांच्या डॉ़क्टरकडे गेलं तर तो डिसैन्फेक्ट करून देईल का? लेन्स फेकणं जीवावर आलंय!!!

लवकर म्हणजे साधारण कधी ? आणि effective लेन्स एकच असते की myopia सारखं वेगवेगळे नंबर असतात ?
कारण hypermetropia आणि presbiopia मध्ये होणारा त्रास हा बऱ्यापैकी सारखा असू शकतो ना ?

साधारणतः ४० वर्षे वयाच्या आसपास जवळचे (वाचन इ.) दिसणे कमी होते. त्यासाठी जो प्लस नंबरचा चष्मा लागतो, त्याला प्रेस्बायोपिया म्हणतात.
हा नंबर मुळात हापरमेट्रोपिया (प्लस नंबर, बहिर्वक्र भिंग) वापरणारा, किंवा मायोपिया (मायनस नंबर) असणार्‍या वा मुळात अजिबात नंबरनसलेल्याही तिन्ही प्रकारच्या व्यक्तींना लागतो. या त्रासासाठी काचेत खाली टिकली असते, म्हणजेच एका चष्म्यातून २ वेगळ्या अंतरांवर पहाण्याची सोय. याला बायफोकल चष्मा म्हणतात.
आधी कोणताही नंबर नसलेल्या माणसाला सुमारे ५० च्या वयापाशी दूरचा प्लस चष्मा लागू शकतो, (हायपरमेट्रोपचा नंबर वाढतो, मायोपचा कमी होतो) याला अ‍ॅक्वायर्ड हापरमेट्रोपिया म्हणतात.
८वी ते १०वीच्या शास्त्राच्या पुस्ताकांत वरील माहीती थोडी जास्त डीटेल सापडेल.

मी ​चौथीत ​होते तेव्हा​ मला

मी ​चौथीत ​होते तेव्हा​ मला ​चष्मा​ लागला. चष्मा वापरायला सुरुवात केली​, तेव्हा नंबर ४ च्या आसपास होता. ​डॉक्टरांनी ​" चष्मा​ ​नियमितपणे ​वापरला नाहीस , ​तर नंबर वाढेल हो ' ​असा बागुलबुवा दाखवल्यामुळे​ ​झोपायची वेळ सोडल्यास पूर्ण वेळ
चष्मा​ लावून असायचे. ​(अगदी आंघोळीच्या वेळीही चष्मा​ लावलेला आठवतोय.) आई गाजराचा रस काढून द्यायची. त्यानेही काही फायदा झाला नाही. ​(नंतर कळले कि बीटा कॅरोटीन असते, ज्याचे 'अ' जीवनसत्वात रुपांतर होण्यासाठी त्यानंतर लगेचच प्रथिने घेण्याची गरज असते.) नंबर मात्र वाढतच राहिला आणि नंतर ९.५० वर डावा आणि ७.०० वर उजवा असा स्थिर झाला.

​२ वर्षांपूर्वी एक पुस्तक हातात आले. Better Eyesight Without Glasses ​by Dr. Bates​ आणि माझा पूर्ण दृष्टीकोनच बदलला. पण हे पुस्तक खूपच technical ​होते आणि यात सांगितलेले व्यायामही ​​​अत्यंत तपशीलवार सांगितल्याने अवघड वाटत होते. पण त्यामुळे चष्मा काही काळ तरी काढून ठेवायला हवा, अशी इच्छा होऊ ​लागली. पण धीर होत नव्हता, कारण एवढ्या नंबरला हातभर दूरवरचे ही दिसायचे नाही. आणि मग, जसं शिष्याची इच्छा प्रबळ झाली कि गुरु मिळतो तसंच माझी इच्छा प्रबळ होत जाऊ न एकदा डॉ. धीरेन गाला यांचे खालील पुस्तक हातात आले.

http://www.bookganga.com/eBooks/Books/details/4840210807996561616?BookNa...

खूप जुनी आवृत्ती होती, १९८७ ची. आणि त्यावर फक्त एक पत्ता आणि एक दूरध्वनी क्रमांक दिला होता. जिद्द न सोडता २-३ दा तो नंबर वेगवेगळ्या वेळी लावल्यानंतर, एकदा कोणीतरी तो उचलला. मी घाबरत घाबरतच "हे दृष्टी सुधार केंद्र आहे का" अशी चौकशी केली. आणि त्यानंतरचा प्रवास संस्मरणीय आहे. डॉ. धीरेन गा​लांनी माझ्या चष्म्याचा नंबरच कमी केला नाही तर ​​इतरही बऱ्याच बाबतींत माझे डोळे उघडले.
रोज १५-२० मिनिटे डोळ्यांचे व्यायाम, Accupressure points​ आणि चुम्बकाचा चष्मा यांच्या सहाय्याने नंबर कमी कमी होता गेला. ​गेल्या सहा महिन्यांत दोन्ही डोळ्यांचा नंबर २ ने कमी झाला. ​आता रस्त्यावरही चष्मा न घालता आरामात फिरते. मीटिंग रूम मध्ये colleagues​ च्या चेहऱ्यावरचे expressions​ दिसतात. ​
​वयाच्या ३० व्या वर्षी हे प्रगती उल्लेखनीय अशीच म्हणता येईल. या अनुभवावर लेख लिहिण्याचे मनात होतच पण नंबर पूर्ण गेल्यानंतर लेख लिहूया असा विचार केला होता. पण जेव्हा हा धागा दिसला तेव्हा वाटले कि "कल करे सो आज कर…"

​इच्छुकांसाठी खाली डॉक्टरांचा पत्ता आणि नंबर दिला आहे. मुंबईत राहणाऱ्यांसाठी सोमवार ते शनिवार संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत डॉक्टर practice करतात.

Dr Dhiren Gala
A, Abbas Building, 1st Floor, Jalbhai Lane, Grant Road, Near Tilak Road, Mumbai - 400007
+(91)-9833443937
+(91)-22-23867275​

मायनस नंबर असेल तर कमी होत नाही​​ >>> माझा नंबर ​मायनस​च आहे आणि तरीही ​कमी झालाय आणि होतोय.

लेजर सर्जरी करून घ्या. ​​>>>​ मी लेझर सर्जरीच्या​ ​विरोधात​​ आहे. शस्त्रक्रियेच्या failure पेक्षाही ​ डोळ्यांवर कायमस्वरूपी चरे मारणे हेच पटले नाही.

बोरीवलीच्या "संजीवन आय क्लिनिक" (sanjeevan.in) चा कोणाला अनुभव आहे का? आल्टरनेटीव थेरापी / अ‍ॅक्युपंक्चर Amblyopia साठी किती उपयुक्त आहे?

चष्मा घालवायचा असेल तर सतत चष्मा लावणे बरोबर नाही, कारण त्यामुळे डोळ्याच्या स्नायूंना काही कामच रहात नाही आणि ते focus करण्यासाठी प्रयत्नच करत नाहीत. कालांतराने त्यान्ची लवचिकता अजुनच कमी होऊन नंबर वाढतच जातो.

याउलट, गरजेपुरता चष्मा लावून डोळ्याचे व्यायाम केले तर चष्मा कमी होण्याचे चान्स वाढतात.
मात्र वरील वर्णन Spherical नम्बर साठी आहे. माझा सिलेन्ड्रिकल आणि स्फेरिकल दोन्ही नंबर होता त्यातील स्फेरिचल आता ० आहे. माझे वय ४१ आणि २ वर्षांपुर्वी ०, +१ असा नम्बर आला होता.

सिलेन्ड्रिकल नम्बर डोळ्याच्या आकारामुळे येत असल्याने त्यावर व्यायामाचा परिणाम होणे कठीण आहे.

माझ्या ११ वयाच्या मुलाला चष्मा लागला आहे, -१.७५, -१.२५.
डॉ. म्हणाले की ऊंची जशी वाढेल तसा नं. वाढेल. काही उपाय आहे का?
'Advanced corneal reshaping treatment' बद्द्ल काही महिती आहे का ?

Pages