मग वाईट कशाच वाटतंय??

Submitted by रमा. on 10 October, 2013 - 08:30

वाईट कशाचं वाटतंय? मैत्रीपेक्षा जास्त काहीतरी आहे खास आपल्यात, पण त्या 'खास' हून पलीकडे जाण्याला बंदी आहे हे माहीत होतंच की आधीपासून. मग वाईट कशाचं वाटतंय?

या आधीसुद्धा कितीतरी वेळा तूला 'मी' सोडून कुणासोबत तरी असलेला पाहिलेलं आहेच की मी..मग वाईट कशाचं वाटतंय?

तू कुणाच्या प्रेमात पडलास तर माझ्यासाठी आनंदच आहे, असं ठणकाऊन सांगते खरी मी नेहमी, पण त्या विचाराने अस्वस्थ ही होते. तू कुठल्याही प्रकारे बांधील नाहीस मला, पण मग 'तू लग्न करतो आहेस' असं कळल्यावर आकाश फाटल्यासारखं वगैरे का वाटलं असेल?

ही बातमी आली म्हणून? की तूझ्याकडून आली नाही म्हणून?? की ईतक्या लवकर आली म्हणून? की 'लग्न' करतोयस म्हणून?

मनाची तयारी करून ठेवलीच होती की केव्हाची? मग वाईट कशाचं वाटतंय?

'लग्न केलस' एवढ्या एका कारणाने परका होशील का रे? आता भेटतोस तसा नाही भेटणार मग? आता बोलतोस तसा नाही बोलणार तेव्हा? मध्यरात्री नाहीस नेणार बाईक वरून फिरायला..आता मी आजारी पडले की तासातासाने माझी चौकशी करायला फोन करतोस, तसं ही नाही करणार.. हे सहाजिक आहे सगळं..यातलं बरचसं आता अंगवळणीही पडलंय.. मग वाईट कशाचं वाटतंय?

खूप खूप कोसळून रडायचय तूझ्याकडे, भांड्ल्याचं निदान नाटक तरी करायचंय, किमान तेवढ्यासाठी तरी भेटून जा असं सांगतेय केव्हाची.. तू येणार नाहीस हे माहीत आहे पक्कं..मग वाईट कशाचं वाटतंय?

'माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी..तो समजून घेण्यातच हयात संपेल.. मग वाईट कशाचं वाटतंय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलं

खुपच सुन्दर

मी कविता लिहिणयचा केलेला एक प्रय्तान

Aayushya kit ichan hota
Sapta rangani bharleli rangoli hota
Ghongavat ek vadala aala
Aawaj n karta sara kahi lutun gela
vadla tun sutkecha khup praytna kela
Pan titkach tya vadlat harvat gela
Khup vata baher padava yatun
Pan paay gele aat aat rutun

आयुष्यात अशा माणसानी येउच नये हेच बर असत.>>
कधी कधी आपल्या बाजूनेही मर्यादा असूच शकतात. आपल्या काही commitments कोणाला तरी आयुष्यात भेटण्याआधीच ठरलेल्या असतात. त्यामुळे त्या खास कडे जायला आपणच बंदी घालतो कधी कधी. आणि तरी हि काहीतरी निसटून चालल्याची जाणीव तीव्र असते.

काय सुंदर लिहलंय तुम्ही.

प्रत्येक शब्द वाचताना

अगदी.....अगदी.... असंच वाटत गेलं

"'माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी."

हे अगदीच वरच्या पातळीवरंच

अप्रतिम. मी तर माझ्या १० मध्ये टाकलंय

एव्हढ्या छोट्याशा स्वगतातूनही तुमच्या उभयतांमधील नात्याची कल्पना आली. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही 'वाईट कशाचं वाटतंय?' असा स्वतःला प्रश्न केलात, तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी अंगावर रोमांच उभे राहिले.
कमी शब्दांत परिणामकारक लेखन वाचल्याचा प्रत्यय आला. छान!!!

अप्रतिम!
नेमक्या याच भावना येतायेत मनात गेले काही दिवस.

आज परत वाचली ... मनाला लागून गेलं लिखाण...
आयुष्यात अशा माणसानी येउच नये हेच बर असत>>> +१११११११११११११११११११११११११११..............

खुप छान लिहिलेय,

माझ्यापूरता तू', मिळवला आहे मी..तो समजून घेण्यातच हयात संपेल.. मग वाईट कशाचं वाटतंय? >>>> हे जास्त आवडले

आयुष्यात अशा माणसानी येउच नये हेच बर असत>>> +११११११११११

Pages