संसार देवीची आराधना उर्फ संसारदेवाची कहाणी.....

Submitted by jayant.phatak on 10 October, 2013 - 00:50

माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो

नमनाला इतके तेल खूप झाले. तर आता कहाणीला सुरुवात करतो.
---------------------------------------------------------------------------------
एक आटपाट नगर होते.त्यात एक गरीब माणूस रहात होता.त्याचा संसार काही चांगला होत नसे.त्याची बायको इतर बायाकांसारखीच होती.त्यामुळे घरात रोज भांडणे असायची.एकदा तो असाच दुखी-कष्टी होवून बसला होता…सुदैवाने त्याची आणी आमची गाठ पडली.त्याने त्याची सर्व कहाणी मला सांगितली.मग मी त्याला संसार देवीची आराधना करायला सांगितली.त्याने ते व्रत केले आणि त्याचा संसार सुखाचा झाला.

सकाळी लवकर उठावे आणि खालील गोष्टी रोज कराव्यात.

१. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. (तू सुंदर दिसतेस,कामसू आहेस इ. ह्याला थापा म्हणत नाहीत. असे खोटे बोलले तरी पाप लागत नाही)

२.सासरच्या मंडळींची निंदा न करणे.(तुझा भाव्वू किती हुशार.तिसरी नापास १० वेळा झाला तरी....शिक्षक फालतू आहेत असे म्हणावे.सासरे किती बोल-घेवढे आहेत असे म्हणावे.भांडकुदळ आहेत, असे स्पष्ट म्हणू नये मेव्हणीची स्तुती करू नये.ती (म्हणजे मेहुणी) रंभा आणि बायको टूनटून असली तरी,मेहुणीकडे बघू नये,मेहूणीबरोबर गप्पा तर अजिबात मारू नयेत.नाहीतर संशय-पिशाच्य मागे लागते,आणि ह्या संशय-पिशाच्यावर उपाय नाही.

३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे (हॉटेल्स असतातच जवळ,नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या.पण मुलं झाली की अशा हॉटेलजवळच्या जागा सोडा.मुले झाली की बायकांचा स्वैपाक सुधारतो.आता ही जादू कशी होते ते फक्त ब्रम्ह देवालाच माहित)

४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा.थोडे दिवसांनी होईल सवय.

५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या.सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय.साडीचा खर्च वाचतो.

६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या (म्हणजे बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही...सवय राहते)

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे

७. शांत रहा.(देव प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने आई व साहेब प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने “बायको” निर्माण केली आहे.

तर वत्सा असा हा साधा सरळ व सोप्पा बिन खर्चिक मार्ग आहे.जो कोणी हा वसा आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होई पर्यंत (आपल्या मुलांचे लग्न झाले की बायकोचे सासूत रुपांतर होते आणि मग ती "जावयाच्या किंवा सुनेच्या घरांत प्रवेश करते") करेल त्याचे सदरे (म्हणजे मराठीत शर्ट).सुखी माणसा सारखे होतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक प्रश्न ?

<< शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या. >>

बरी गजरेवाली कि गजरे बरी असलेलि

@उमेशप

शक्यतो दोन्ही.... (असा संभव फार कमी)

पण अगदीच काही नाही तरी "बरी गजरेवाली ,,, हा निकष लावा... बायकोला "गजरा" दिल्याशी मतलब... पण रोज देवू नका.....बायका फात संशयी असतात्,,,असे माझे गुरु म्हणतात....

चांगल लिहिल आहे.... फक्त एक प्रश्न विनोदी लेखनासाठी कायम बायकोच्या / बायकोच्या माहेरच्या मंडळींच्या जाचातील व्यक्ती हाच विषय हिरीरीने का मांडला जातो, प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असतानाही?? जगात विनोदी लेखनासाठी इतर बरेच विषय असताना त्यांचा विचार का केला जात नाही????

@ मुग्धा रानडे....

तुमचे म्हणणे एक्दम पटले....

खरी गोष्ट अशी आहे की,,, माझे लेख आधी माझी बायकोच वाचते आणि तिने परवानगी दिली की मी प्रकाशित करतो... मी माझ्या बायकोला असे म्हणालो देखील . "की अगं मी जरा जास्तच लिहीत नाही आहे ना?" ... पण तीच म्हणाली ... लिहा हो बिंधास्त... तुमच्या लेखांनी आणि प्रतिसादांनी आम्हा बायकांवर काही फरक पडणार नाही

.......मेरे घरवालीकोच प्रॉब्लेम नहीं है तो बंदा कुछ नही कर सकता...

<< बायकोच्या / बायकोच्या माहेरच्या मंडळींच्या जाचातील व्यक्ती >>
एकदा माझ्या घरी या. माझे सा. सा. माझ्या कडेच राहतात.

<< बायकोला "गजरा" दिल्याशी मतलब >>
माझ्या बाइकोचा बॉय कट, मग कसे जमणार.

@ उमेशप...

दोन्ही उत्तरे विनोदी आहेत.......

"एकदा माझ्या घरी या. माझे सा. सा. माझ्या कडेच राहतात"

====> मित्रा मी तुझ्या सुखात सहभागी आहे....माझ्या कडे पण असेच आहे...पण माझे सासु-सासरे फार चांगले आहेत.माझी बायको काही बोलली तर ते मला सांभाळून घेतात....

"माझ्या बाइकोचा बॉय कट, मग कसे जमणार.?"

======> अरे व्वा!! मग तर रोज आणा...तुझ्या चेहर्‍याला फार सुंदर दिसतो असे म्हणा...

(पण मग तुम्हाला जर बॉय कट आवडत असेल तर काही तरी वेगळा उपाय काढला पाहिजे....

हं... मग तुम्ही असे करा. की तिला रोज फिरायला न्या..पण पाकीट घरीच ठेवा...)

एकदा माझ्या घरी या. माझे सा. सा. माझ्या कडेच राहतात.>>>>>>> उमेशप, यात काही विशेष नाहिये. माझ्या आईची आई माझी अविवाहीत physically & mentally handicap मावशीसुद्धा आमच्या घरी रहात होती. माझी आजी देवाघरी जाउन बरीच वर्ष झाली आहेत, त्यानंतर माझ्या मावशीला माझ्या वडीलांनी खूप छान सांभाळल आहे. कसलीही कुरकुर न करता..... या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माझी आई नोकरी करत होती. तिच्या निवृत्तीच्या १० वर्ष आधी माझे बाबा निवृत्त झाले आहेत. बायकोच्या गैरहजेरीत तिच्या बहिणीला उत्तम रित्या त्यांनी सांभाळलेल मी माझ्या डोळ्यांनी पाहिल आहे. अगदी आजारपणात तिचा आहार वगैरे सांभाळुन...... मी इथे अभिमानाने सांगु इच्छीते की माझ्या आई वडिलांनी त्यांच्या त्यांच्या सासरच्या माणसांना अतिशय उत्तम रित्या सांभाळल आहे. माझी आजी (वडिलांची आई) १०० वर्ष वयात पदर्पण होउन देवाघरी गेली. त्या आधी अनेक वर्ष ती बेड रिडन होती. माझ्या आई-वडिलांनी तिच्या बरोबरीने माझ्या आईच्या आईला आणि मावशीला सांभाळले होते.

जयंत फाटक मला तुम्हाला फक्त इतकेच सुचवायच आहे की हा विषय सोडुन इतर विषयही आहेत विनोदी लेखनासाठी आणि तसही हा विषय मालिका, चित्रपट या माध्यमांतुन चावुन चावुन चोथा झाला आहे.

@ विनायक परांजपे......

आम्ही डोंबिवलीकर स्वतःला काहीच समजत नाही....आता तुम्ही जर समस्त डोंबिवलीकरांना बाजीराव समजत असाल तर तो बाजीरावांना मान दिल्या सारखेच होईल...

@ मुघ्धा रानडे...

ताई, मुळात हा लेख विनोदी आहे.. ह्यात कुठेही विचारसरणी नाही.किंवा कुठल्याही प्रकारचे विचारमंथन पण नाही.

"माझ्या बाइकोचा बॉय कट, मग कसे जमणार.?" >>>>>>>>>>> नविन आयडिया काढावी लागेल... शॉर्ट गजरा किंवा तसल्या क्लिपा.... चिन्यांना कळ्वलं पाहिजे, लगेच उपाय आणि प्रॉडक्ट काढतील Happy

जयंत दादा मला माहीत आहे की हा विनोदी लेख आहे ह्यात कुठेही विचारसरणी नाही.किंवा कुठल्याही प्रकारचे विचारमंथन पण नाही. पण माझा मुद्दा या लेखाच्या विषयाबद्दल आहे. विनोद करण्यासाठी इतर विषय भरपूर आहेत हो... त्याच्यावर लिहा ना...... राजकारण आहे, टिव्हीवरच्या कौटुंबिक मालिका आहेत, खेळ आहे, दैनंदिन जीवनातही खूप काही गोष्टी घडत असतात. त्यावर लिहा ना.........

@ मुग्धा रानडे....

तुमचा नक्की हाच मुद्दा आहे ना? की,,,"राजकारण आहे, टिव्हीवरच्या कौटुंबिक मालिका आहेत, खेळ आहे, दैनंदिन जीवनातही खूप काही गोष्टी घडत असतात. त्यावर लिहा ना........"

अहो तुमचे म्हणणे मला एकदम पटले बघा...पण काय आहे....

राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही

टी.व्ही. मी अजिबात बघत नाही

खेळ मी खेळतो पण त्या खेळांविषयी काय लिहीणार... ब्रिज आणि कॅरम हे न बोलता आणि विनोद न करता खेळायचे खेळ आहेत.... बरे आणि हे खेळ स्वहिंमतीवर खेळायचे असल्याने ह्यांत विनोदी असे फार काही होत नाही हो.....

त्यामुळे दैनंदिन जीवनांत ज्या काही घडामोडी घडतात त्यावरच लिहीले आहे....

{{ तुम्हाला जर बॉय कट आवडत असेल तर काही तरी वेगळा उपाय काढला पाहिजे.... }}

आधि कसे केसाला तेल लाउन वेण्या घालायचे, आता तीच्या शोल्डर कट मोकळ्या केसाचि अडचण मला आणि तिला दोघाना होते म्हणुन बॉय कट.

{{ मग तुम्ही असे करा. की तिला रोज फिरायला न्या..पण पाकीट घरीच ठेवा}}
माझे पाकिट माझ्या जवळ आणि डेबिट कार्ड तिच्याजवळ.
हि पण एक र्संसार देवीची आराधना

{{ गजरेवाल्या डोंबिवलीकरानो । स्वत:ला काय बाजीराव समजता?}}

ओ विप, घरी मस्तानि म्ह्णणुन आम्ही बाजीराव, तुमचे काय ??????

{{ physically & mentally handicap }}

physically & mentally strong माणसांना सांभाळणे हेहि एकदा अनुभवायला पाहिजे.

उमेश ते तर अनुभवत आहेतच की दोघेही.... तुम्ही माझी पोस्ट नीट वाचलेली दिसत नाहि. physically & mentally handicap फक्त माझी मावशीच आहे. माझ्या दोन्ही आज्या नव्हत्या.

@ उमेशप

है शाब्बास

"माझे पाकिट माझ्या जवळ आणि डेबिट कार्ड तिच्याजवळ."

हमारी हालत तो तेरेसे भी गई गुजरी है

माझे ए.टी.एम. आणि चेकबूक पण तिच्या कडेच आहे....

लग्नापुर्वी बाप पॉकेट मनी देत होता आजकाल हिच्या कडून घ्यायला लागतो..कमनशीब रे बाबा दुसरे काय?

हायला, बायको आणि तिच्या माहेरची माणसे यांच्यावर विनोदी लेख लिहिला तर त्यात काय चूक आहे?

नवरा आणि त्याचे नातेवाईक यांच्यावर पण खमंग गप्पा, लेख येतच असतात की मायबोलीवर.

लगेच 'आता बायकोच्या दृष्टीकोनातून नवऱ्याबद्दल एखादा टीकात्मक विनोदी लेख लिहा' अशी सूचना द्यायचे काय कारण?

[[ उमेश ते तर अनुभवत आहेतच की दोघेही.... तुम्ही माझी पोस्ट नीट वाचलेली दिसत नाहि. physically & mentally handicap फक्त माझी मावशीच आहे. माझ्या दोन्ही आज्या नव्हत्या. ] ]

चुक झालि

physically & mentally strong माणसांना सांभाळणे हेहि एकदा अनुभवायला पाहिजे.

च्या जागी
physically & mentally strong व्यक्ति सांभाळणे हेहि एकदा अनुभवायला पाहिजे.

असे वाचावे

--------------------------------------------

- : - : - लग्न झाले कि पुरुष एवढा अगतिक होतो हे माहीत नव्हते … - : - : -
माबोच्या आयडिचि माफि मागायला लागते तर घरी काय...................

--------------------------------------------
कमनशीब रे बाबा दुसरे काय?

नशीब डिस्कस करायला बसायला पाहिजे

@ विजय देशमूख,

हो रे बाबा ,,,, हे असेच समजून गप्प बसलो आहे....नाहीतर तसा मी ऐकणारा नाही... (एक २/३ पेग पोटात गेले की मग वाघ होतोच की नाही?)

@ माधव,

असु द्या हो... कशाला नाराज होता?

आपण आपले जरा पाय मोकळे करून येवू या.....कधी येताय आमच्या डोंबिवलीला?

नमस्कार माधव मी personaly ओळखते जयंत यांना, त्यांची बायको माझी शाळेतली मैत्रीण आहे म्हणून त्यांना हक्काने लिहिले अशा लेखासाठी.

हे फार १९७०'स च्या विनोदी (?) लेखकांची कोपी वाट्तीये.
Keep up. गजरा, साडी, बास की अता. सकाळ चा चहा नवर्यानी करण्यात विनोद काय आहे आज काल?
-शिरीन

Pages