संसार देवीची आराधना उर्फ संसारदेवाची कहाणी.....

Submitted by jayant.phatak on 10 October, 2013 - 00:50

माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो

नमनाला इतके तेल खूप झाले. तर आता कहाणीला सुरुवात करतो.
---------------------------------------------------------------------------------
एक आटपाट नगर होते.त्यात एक गरीब माणूस रहात होता.त्याचा संसार काही चांगला होत नसे.त्याची बायको इतर बायाकांसारखीच होती.त्यामुळे घरात रोज भांडणे असायची.एकदा तो असाच दुखी-कष्टी होवून बसला होता…सुदैवाने त्याची आणी आमची गाठ पडली.त्याने त्याची सर्व कहाणी मला सांगितली.मग मी त्याला संसार देवीची आराधना करायला सांगितली.त्याने ते व्रत केले आणि त्याचा संसार सुखाचा झाला.

सकाळी लवकर उठावे आणि खालील गोष्टी रोज कराव्यात.

१. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. (तू सुंदर दिसतेस,कामसू आहेस इ. ह्याला थापा म्हणत नाहीत. असे खोटे बोलले तरी पाप लागत नाही)

२.सासरच्या मंडळींची निंदा न करणे.(तुझा भाव्वू किती हुशार.तिसरी नापास १० वेळा झाला तरी....शिक्षक फालतू आहेत असे म्हणावे.सासरे किती बोल-घेवढे आहेत असे म्हणावे.भांडकुदळ आहेत, असे स्पष्ट म्हणू नये मेव्हणीची स्तुती करू नये.ती (म्हणजे मेहुणी) रंभा आणि बायको टूनटून असली तरी,मेहुणीकडे बघू नये,मेहूणीबरोबर गप्पा तर अजिबात मारू नयेत.नाहीतर संशय-पिशाच्य मागे लागते,आणि ह्या संशय-पिशाच्यावर उपाय नाही.

३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे (हॉटेल्स असतातच जवळ,नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या.पण मुलं झाली की अशा हॉटेलजवळच्या जागा सोडा.मुले झाली की बायकांचा स्वैपाक सुधारतो.आता ही जादू कशी होते ते फक्त ब्रम्ह देवालाच माहित)

४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा.थोडे दिवसांनी होईल सवय.

५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या.सगळ्यात स्वस्त आणि मस्त उपाय.साडीचा खर्च वाचतो.

६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या (म्हणजे बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही...सवय राहते)

आणि सर्वात महत्वाचे म्हणजे

७. शांत रहा.(देव प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने आई व साहेब प्रत्येक वेळी हजर होऊ शकत नाही म्हणून त्याने “बायको” निर्माण केली आहे.

तर वत्सा असा हा साधा सरळ व सोप्पा बिन खर्चिक मार्ग आहे.जो कोणी हा वसा आपल्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होई पर्यंत (आपल्या मुलांचे लग्न झाले की बायकोचे सासूत रुपांतर होते आणि मग ती "जावयाच्या किंवा सुनेच्या घरांत प्रवेश करते") करेल त्याचे सदरे (म्हणजे मराठीत शर्ट).सुखी माणसा सारखे होतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ शिरीन ताई

असेल हां तसेही असेल पण काय करणार हो? आमची "ही" अज्जून पण साडीच नेसते आणि सदैवाने बॉय कट न केल्याने गजर्‍याचा आनंद पण घेते...

लेख आवडला, नाही, किंवा त्यातल्या त्यात काय सुधारणा पाहिजे हे सोडून 'अमुक विषयावरच का लिहीलं' हे म्हणणं म्हणजे चमत्कारिक आहे. न वाचणं तर आपल्या हातात असतं की नाही ?

माझ्या दृष्टीने ही हा चघळून चोथा झालेला विषय आहे, पण म्हणून त्यांनी लिहूच नये ? ऐकावे ते नवलच.

@ मिलींदा....

जावू दे रे....

मला तरी काही फरक पडला नाही..

जीन्सच्या जमान्यांत साडी चालत नाही
आणि बॉय कटच्या जमान्यात गजरा चालत नाही
ह्याचा अर्थ असा नाही की मला नविन काही आवडत नाही
आणि असाही नाही की मला जुने सोडवत नाही

अर्थ असेल तर तो इतकाच की मला अजून जगणेच समजलेले नाही....

काय जयंतराव, काहीही लिहाता तुम्ही... अगदी चोथादेखील चावुन झालाय. चला, मीच एक नविन विषय देतो. फेडच्या अध्यक्षपदी आणि आपल्या स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी महिलांचीच नियुक्ती करावी यासाठी आपल्या पंतप्रधानांनी ओबामाभाऊंची चर्चा करावी, यासाठी मेधाताई, अण्णा, आणि बॉलिवुडचे तमाम कलाकार यांच्या वतीने पिंपळगाव शेंडा बुजरुक गावचे सरपंच आणि प्रिंस ओकेहोना कामाटोकी यांनी नावेश शरीफ यांची भेट घेतली होती, त्याचा राजकीय परिपाक काय आहे, आणि त्याचा इराणच्या तेल उत्खनावर सामाजिक परीणाम काय होईल, हे लिहा बघु. Biggrin

सकाळ चा चहा नवर्‍याने करण्यात विनोद काय आहे आज काल?

ह्यात विनोद नाहि पण बायकोच्या डाएट साठी आम्हाला पण बीना साखरेचा चहा प्यायला लागतो. त्याचे काय ???

@ विजय देशमूख,

प्रतिसादाची नोंद घेतली आहे असे लिहिणार होतो पण ते बदलून असे लिहीतो.....

पॉइंट नोटेड

असे रोट केले बघा...

jayant.phatak

तुम्ही स्वतःच्याच प्रतिसादाला उत्तर कधी देता याची वाट पहातोय. Happy

@ इब्लिस....

अहो हे मी इथेच शिकलो...

हे बरे आहे राव

इतरांनी केले तर पाप आणि आम्ही केले तर पुण्य

आँ

इथे स्मायली कशी टाकायची हो?

ही व्रते जुनी झाली. नविन घ्या -

१. चांगल्या पोळ्या करणारी बाई, घरकामाची बाई शोधून ती टिकवल्याबद्दल बायकोचे सढळ जीभेने कौतुक करावे. ह्याने काय होते? पोळी भाजीच्या डब्ब्याबरोबर एकादे ताजे फळ सोलून, कापून किंवा सलाड डब्ब्यात मिळण्याची शक्यता वाढते.

२.कचेरीतून बायको उशिरा येऊ शकते ह्याची सवय करून डाळ भाताचा कुकर किंवा पास्ता - पराठा ह्यांची तयारी करून ठेवावी. ह्याने महाराजा काय होते? पराठा, वरण भातावर तूप, लोणचे पापड ह्याची सोय होते.

३. आपली मेहुणी रंभा असली तरी तिच्या नवर्‍याला/ बायकोच्या बॉसला/सहकार्याला आपली बायको उर्वशी वाटू शकते ह्याची जाणिव ठेवून उभयपक्षी शांतता नांदेल ह्याची काळजी घ्यावी, त्यामुळे रंभा, उर्वशी पेक्षा गार्गी मैत्रेयी ह्यांच्या गुणाचे आदर्श आपल्या मनावर बिंबवावेत. हे कठीण वाटल्यास किमानपक्षी बायकोमधली उर्वशी आपल्या संसाराच्या रगाड्यात जिवीत राहील ह्याची काळजी घ्यावी. ह्याने काय होते? घरात अप्सरापर्व सुरू होत नाही ते टीव्हीवरच रहाते.

४. दोघांच्याही सासरच्या माणसांची निंदा करू नये. ह्यामुळे काय होते? मुला बाळांची दोन्ही आजोळे सुखरूप रहातात व जसे सत्यकथन आपण करू शकतो तसेच आपल्या माणसांच्याबाबतीत ऐकून दु:खी होण्याची वेळ आपल्यावर येत नाही.

५. बायकोच्या एखाद्या गुणाचे, निगुतीने केलेल्या पदार्थाचे खरे कौतुक कोणासमोरही करावे. किंवा आपले काही चुकले असेल तर ते मोकळेपणी मान्य करावे. ह्याने काय होते? फुले, साड्या ह्यांच्या रतिबाशिवायही संसार सुखाचा होतो.

६. एखादा विकांत बायकोच्या मनानुसार तिच्या विश्रांतीसाठी मोकळा सोडावा. त्यादिवशी असलेले मुलांचा गृहपाठ, पीटीएम,प्रोजेक्ट अशी कामे स्वतःहून अंगावर घ्यावीत. ह्याने महाराजा काय होते? आपली मुले नक्की किती पाण्यात आहेत ह्याचा अंदाज येतो, ह्यावर्षीची शिक्षक पार्टी किती "इंट्रेस्टींग" आहे ह्याची कल्पना येते.

सर्वात महत्वाचे म्हणजे -

७. शांत रहा ( देव सगळ्या संकटात आपल्या सोबत असेलच असे नाही पण (स्वतः ची) बायको असण्याची शक्यता जास्त आहे)

वत्सा, ह्या बिन खर्चिक व्रताच्या पालनामुळे आपले इतरचे बाह्य खर्च कमी होतात व संसारात मन रमते. जशी आपली बायको परिपूर्ण नाही तसे आपणही नाही हे लवकर लक्षात येते आणि बायकोचे अशा बहुगुणी नवर्‍यावरून जराही लक्ष विचलीत होत नाही. आपल्या अपेक्षा काबूत येऊन मुले बाळे मार्गी लागल्यावरही आपला संसार सुखाने चालूच रहातो, प्रसंगी सुनेकडूनही आपले कौतुकच होते.

जाईजुई +१०००.

एकेक वाक्य भारी आहे
<<<आपली मेहुणी रंभा असली तरी तिच्या नवर्‍याला/ बायकोच्या बॉसला/सहकार्याला आपली बायको उर्वशी वाटू शकते ह्याची जाणिव ठेवून उभयपक्षी शांतता नांदेल ह्याची काळजी घ्यावी, >>> आइ ग Happy

<<< जशी आपली बायको परिपूर्ण नाही तसे आपणही नाही हे लवकर लक्षात येते आणि बायकोचे अशा बहुगुणी नवर्‍यावरून जराही लक्ष विचलीत होत नाही. >>> सत्यवचन Happy

त्यामुळे रंभा, उर्वशी पेक्षा गार्गी मैत्रेयी ह्यांच्या गुणाचे आदर्श आपल्या मनावर बिंबवावेत.<<< जाईजुई, परफेक्ट लिहिले आहेस. सर्वच व्रते आवडली. Happy

मस्त

Pages