समोर नसता

Submitted by Prashant Pore on 8 October, 2013 - 23:48

समोर नसता स्मरते काही
समोर येता विरते काही

मला न कळते ही अगतिकता
कसे आत पाझरते काही

असेच आता जगतो आहे
उरात धडधड करते काही

कसा तुझा हा न्याय विधात्या
घडते काही ठरते काही

जरी चेहरा दिसे हासरा
काळजात चरचरते काही

उगाच होते इश्क आणखी
अलगद पण थरथरते काही

तिचा सुरा ही मोरपिसाचा
हळूवारसे चिरते काही

पुन्हा पावसा कशास पडतो
दुःख जरा ओसरते काही

प्राण दागिना या देहाचा
सुटू पाहता धरते काही

कसा गुंतलो तुझ्यात इतुका
स्मरते ना विस्मरते काही

सखी पौर्णिमा चंद्र चेहरा
भान कुणा मग उरते काही

अता सोडते संग लेखणी
तरी अंतरी झरते काही

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर कोट केलेले शेर मस्त आहेत...
सपक शेरांच्या गुंत्यात चांगल्या शेरांचा कोंडमारा होतो असे वाटते कधीकधी.

सगळेच शेर छान वाटले..त्यातही...बरेच शेर अप्रतीम आहेत!!

..धन्यवाद....

Happy

मला न कळते ही अगतिकता
कसे आत पाझरते काही

कसा तुझा हा न्याय विधात्या
घडते काही ठरते काही

तिचा सुरा ही मोरपिसाचा
हळूवारसे चिरते काही

अता सोडते संग लेखणी
तरी अंतरी झरते काही

हे शेर बरे वाटले!