Submitted by Prashant Pore on 8 October, 2013 - 23:48
समोर नसता स्मरते काही
समोर येता विरते काही
मला न कळते ही अगतिकता
कसे आत पाझरते काही
असेच आता जगतो आहे
उरात धडधड करते काही
कसा तुझा हा न्याय विधात्या
घडते काही ठरते काही
जरी चेहरा दिसे हासरा
काळजात चरचरते काही
उगाच होते इश्क आणखी
अलगद पण थरथरते काही
तिचा सुरा ही मोरपिसाचा
हळूवारसे चिरते काही
पुन्हा पावसा कशास पडतो
दुःख जरा ओसरते काही
प्राण दागिना या देहाचा
सुटू पाहता धरते काही
कसा गुंतलो तुझ्यात इतुका
स्मरते ना विस्मरते काही
सखी पौर्णिमा चंद्र चेहरा
भान कुणा मग उरते काही
अता सोडते संग लेखणी
तरी अंतरी झरते काही
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला न कळते ही अगतिकता कसे आत
मला न कळते ही अगतिकता
कसे आत पाझरते काही
वा.
सगळीच गजल मस्त ..... कसा तुझा
सगळीच गजल मस्त .....
कसा तुझा हा न्याय विधात्या
घडते काही ठरते काही >>>> हे विशेष आवडलंय ...
पहिले दोन जास्त आवडले
पहिले दोन जास्त आवडले
सर्वांचे आभार..
सर्वांचे आभार..
सुंदर....व्वा !
सुंदर....व्वा !
मला न कळते ही अगतिकता कसे आत
मला न कळते ही अगतिकता
कसे आत पाझरते काही
अता सोडते संग लेखणी
तरी अंतरी झरते काही<<<
सुंदर शेर
वर कोट केलेले शेर मस्त
वर कोट केलेले शेर मस्त आहेत...
सपक शेरांच्या गुंत्यात चांगल्या शेरांचा कोंडमारा होतो असे वाटते कधीकधी.
धन्यवाद शाम
धन्यवाद शाम
सगळेच शेर छान
सगळेच शेर छान वाटले..त्यातही...बरेच शेर अप्रतीम आहेत!!
..धन्यवाद....
मला न कळते ही अगतिकता कसे आत
मला न कळते ही अगतिकता
कसे आत पाझरते काही
कसा तुझा हा न्याय विधात्या
घडते काही ठरते काही
तिचा सुरा ही मोरपिसाचा
हळूवारसे चिरते काही
अता सोडते संग लेखणी
तरी अंतरी झरते काही
हे शेर बरे वाटले!