24 - मालिका

Submitted by उदयन.. on 7 October, 2013 - 05:44

नविन मालिका - २४

अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे

जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....

सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...

दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत

आता पर्यंतचे कथानक:-

जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...

जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...

घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...

पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...

भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी Wink ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...

अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...

-----------------

आता पुढे............

सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....

-----------------------

फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे............. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल कपूरने अमेरिकन २४च्या ज्या हंगामात काम केलंय, त्यावरून इथल्या २४च्या या हंगामाचे धागे दोरे बेतले असावेत.

मूळ २४ वरून ही मालिका करताना फितूर आणि निष्ठावान कॅरॅक्टर्स मूळ मालिकेप्रमाणे ठेवलेली नाहीत. उदा : मूळ २४ मध्ये मंदिरा बेदीचं कॅरॅक्टर फितूर असतं. तर जिशा(?- सिस्टमवाली- विचित्र वाटणारी) शेवटपर्यंत जयच्या कॅरॅक्टरशी निष्ठा ठेवून. इथे हे उलट दाखवलेलं.

त्यामुळे मूळ २४ पाहिलं असलं तरी हे बघताना रहस्य सहज उमगणार नाही.

टीव्हीवर बघता नाही आली मग voot वर बघितले दोन्ही भाग. कलर्सच्या मालिका हल्ली यु ट्युबवर नसतात.

इंटरेस्टिंग आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडतात त्यांची लिंक लागेल हळूहळू, आत्तातरी confused. गिरीश ओक आहे आणि डी 3 मध्ये चोर दाखवला तो आहे, मंदिरा बेदी नाही. आशिष विद्यार्थी आहे. हरून म्हणून त्याचा भाऊ दाखवलाय तो सिकंदर खेर आहे का? तो फार dangerous आहे.

सुरविन चावला आहे, साक्षी तंवर, सुधांशू पांडे आहे. एक अशोकामध्ये जस्टीनचं काम केलेला आहे. आदित्य सिंघानियाची gf एक डॉक्टर आहे, ती आवडली मला. पहिल्यांदाच बघितलं तिला.

एका dangerous वायरसभोवती कथानक फिरतं. आवडले दोन्ही भाग.

सिकंदर खेर डेंजरस ? Lol
जितके अभिनयात त्याचे आईवडील सिकंदर आहेत त्यातला १% सुध्दा अंश त्याच्यात उतरला नाही.

नंदीनी थँक्स.

सस्मित voot वर बघायला मिळेल. मी तिथेच बघितला.

उदय मला वाटला सिकंदर तसा, किळस वाटली मला त्याची.

यावेळेसचा सिजन मागच्या विकांताला संपला. हाही सिजन आवडला. सगळे एपिसोड्स वूट च्या साईटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर अवेलेबल आहेत.

Pages