24 - मालिका

Submitted by उदयन.. on 7 October, 2013 - 05:44

नविन मालिका - २४

अनिल कपुर ची नविन मालिका "२४" कलर्स वाहिनीवर शुक्रवार पासुन दाखवली जात आहे.
इंग्लिश मालिका "२४" चे भारतीय रुपांतर आहे

जय सिंग राठोड ( अनिल कपुर) एटीयु ( अँटी टेरेरीस्ट युनिट) चा ऑफिसर आहे. त्याला आदल्यारात्री माहीती मिळते की दुसर्या दिवशी शपथग्रहण करणार्या पंतप्रधानांचा काही अतिरेकी लोक खुन करणार आहे..त्या पुर्ण २४ तासाच्या दिवसाच्या घडामोडींवरची ही मालिका...... २४भागात प्रसारीत करणार आहेत... दर भाग एक तासाचा....

सुरुवात तर प्रचंड आशादायक झालेली आहे...

दोन एपिसोड तर झाले आहेत... प्रचंड गुंतागुंत आणि वेगवेगळे कथानकाचे पैलु एकाच वेळेला समोर येत आहेत

आता पर्यंतचे कथानक:-

जय सिंग राठोड आपल्या बायकोचा वाढदिवस साजरा करण्यासाठी रात्री घरी असतो...साजरा करत असतानाच त्याला ऑफिस मधुन फोन येतो..की उद्या पंतप्रधानांवर हल्ला होणार आहे.. तो सगळे तसेच टाकुन ऑफिस ला निघतो... जय सिंग ची बायको आधीच दोघांमधे काही अपसेट असल्यामुळे चिंतेत असते.. त्यांची मुलगी या प्रकाराला कंटाळुन मैत्रीणी बरोबर रात्री कुणाला न सांगता पार्टीला निघुन जाते...

जय सिंग ऑफिस मधे आल्यावर त्याचे सहकारी त्याला ब्रिफींग करतात..त्या वेळेला त्याचा मित्र अनुपम खेर जो वार्ताहर असतो.. तो सुध्दा हीच बातमी देतो.. त्यासाठी लागणारे पुरावे त्याला एका सिनेमाघरात त्याचा सहकारी देणार असतो ते घेण्यासाठी तो निघालेला असतो...

घरी मुलगी नाहिशी झाल्याचे समजल्यावर तिस्का (जय सिंग ची बायको) जय सिंग ला कळवुन शोधार्थात मुलीच्या मैत्रीणीचे वडील (अजिंक्य देव) यांच्या बरोबर निघते.. त्याची सुध्दा मुलगी पार्टीला गेलेली असते...

पार्टी मधे किरण (जय सिंग ची मुलगी) तिच्या मैत्रीणीच्या मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाते..ती, तिची मैत्रीण , आणि तिचे दोन मित्र असे चौघेजण कार मधुन लाँगड्राईव्ह ला निघतात.. परंतु या दोन मित्रांचा प्लॅन वेगळाच असतो...मित्र तिला आणि तिच्या मैत्रीणीला मारहाण करतात.. अतिरेकी टोळीचा प्रमुखाच्या इशार्यावर किरण चे अपहरण तिच्या मित्राने केलेले असते...

भारताचे भावी तरुण प्रंतप्रधान आदित्य सिंघानिया मुंबईत आदल्या दिवशी रात्री काहीकामानिमित्ताने आलेला असतो.. त्याची आई (अनिता राज ... फार फार फार वर्षांनी Wink ) आपल्या परिने त्याला कंट्रोल मधे ठेवण्याचे बघत असते.. ती पार्टीअध्यक्षा असते... मुंबईत आल्यावर .. आदित्याला जय सिंग हल्याची माहीती देतो आणि त्याला योग्य ती काळजी घेण्यासाठी सांगतो.. आदित्यचे सुरक्षारक्षक प्रमुख सगळ्या हॉटेल ची कसुन तपासणी करतो आणि बंदोबस्त वाढवतो....
अश्यात आदित्यला एका टिव्ही एंकर चा फोन येतो...कॉलेज मधे असताना एका अपघाताने आदित्यच्या हातातुन खुन झालेला असतो आणि तो खुन आदित्यचा भावाने दडपलेला असतो... अँकर शी बोलण्यानंतर आदित्या आपल्या भावाबरोबर तिची भेट घेण्यासाठी गुपचुप हॉटेल मधुन बाहेर पडतो...

अनुपम खेर पुरावे घेण्यासाठी सिनेमाघरात आलेला असतो.. परंतु तिथे त्याच्यावर गोळीबार होतो...तो जय सिंग ला बोलवुन ते पुरावे त्याच्या हाती सोपवतो.. परंतु गोळीबार मधे दगावतो..
जय सिंग ला संशय असतो की त्याच्याच ऑफिस मधुन कोणी या कटात सामिल आहे...

-----------------

आता पुढे............

सुरुवात तर अतिशय रंजक झालेली आहे... एकाच वेळी सगळ्या घडामोडीं चित्रीत केल्या आहेत...त्यामुळे एपिसोड संपताना पुढे काय होईल याची ओढ तर लागतेच.....त्याच बरोबर... प्रत्येकाच्या बरोबर काय होईल हा ही एक विचार येतो....

-----------------------

फार वर्षांनी एक चांगली आणि सशक्त कथानक असलेली मालिका आलेली आहे..
सासबहु पेक्षा ही मालिका कैकपटींनी दर्जेदार आणि अतिशय उत्तम आहे............. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या भागात जर दिव्याचा नवरा कंटाळुन स्वतःच आदित्य वर हमला करतो आणि त्याला ठार करतो त्याला हमला करताना पृथ्वी मधे येतो आणि त्याचा देखील बळी जातो .आणि जयसिंग राठोड दिव्याच्या नवर्यावर गोळीबार करुन त्याला देखील ठार करतो.....

दुसर्य दिवशी.......... नैना दिव्याला पंतप्रधान म्हणुन घोषीत करते......... आणि दिव्या... कपटी हसते Happy

हा देखील एक शेवट होउ शकतो

,

माझा संशय दिव्यावर आहे. दिव्याचा नवरा ऑलरेडी इन्वॉल्व्ड आहे तेव्हापासून जास्तच!! >>> नंदिनी, तू माझा किंवा मी तुझा ड्युआय असणार. नेहमीच माझ्या मनात असेल ते तू बरोब्बर आणि नेमक्या शब्दात लिहितेस. Happy

साधारण ४-५ वाजेपर्यंत मला जयसिंगचा देखिल संशय येत होता. विशेषतः त्या एका माणसाला पळापळ करून पोलिसांच्या स्वाधीन करण्याच्या आधीच मारलं तेव्हा. त्यानंतर उगाच काही कारण नसताना त्रिशाचाही संशय आला होता. कारण आता काही खास कारण नसतानाही तिला दाखवत वेळ काढतात. आता लक्षात आलं की तिचा ट्रॅक हा फिलर म्हणून वापरताहेत. ती आणि किरण डोक्यात जातात माझ्या.

जर ओरिजनल 24 ला पूर्णपणे फौलो करत असतील तर या सीझन मध्ये किरण मरणार. त्यामुळे पुढच्या सीझनला ती नसेल डोक्यात जायला. त्रिशा पासून मात्र कधीच सुटका नाही Biggrin

जर ओरिजनल 24 ला पूर्णपणे फौलो करत असतील तर या सीझन मध्ये किरण मरणार. त्यामुळे पुढच्या सीझनला ती नसेल डोक्यात जायला. त्रिशा पासून मात्र कधीच सुटका नाही >>>>> हे राम!!! खरं की काय? पण इथे त्रिशाला मरू घातलंय.

पौ, तू 'ते' लिहिल्यावर मी विचार केला पण पुन्हा तो कैदी दिसेपर्यंत ट्यूब पेटली नव्हती. तोच रविंद्रन आहे हे नक्कीच.

पौ, तू 'ते' लिहिल्यावर मी विचार केला पण पुन्हा तो कैदी दिसेपर्यंत ट्यूब पेटली नव्हती. तोच रविंद्रन आहे हे नक्कीच.>>>+++१

कारस्थान रचणारी सूत्रधार दिव्या असूच शकते.
१) तिच्या वडिलांच्या आशा तिच्यावरच होत्या- आदित्यपेक्षाही (हे गेल्या भागात संवादातून आलं)
२) मूल करियरच्या आड येऊ नये म्हणूनही तिने रिस्की अबॉर्शन करून घेतले असावे.
३) आदित्य सेन्ट स्टीफन्सची जनतेपाशी कबूली देतो त्या बेताला ती पाठींबा देते- कारण त्याने पोलिटीकल स्यूसाईड केला, तर ती आहेच त्याची जागा घ्यायला. तो ईमोशनल आहे. त्यामुळे वरकरणी त्याला सपोर्ट करून तोंडघशी पाडायचं आणि डाव त्याच्यावर उलटला की त्याला पाठीशी घालून जागा बळकवायची. (हां, आता जनतेचाच पाठींबा मिळाला त्यामुळे तो प्लॅन फसला हा भाग वेगळा. शिवाय पृथ्वीनेही हीरोगिरी केली.)

फिट्स इन.

नंदिनी, तुझा तर्क काय?

माफ करा जी जयसिंग ची बायको आहे ती मरते ओरिजनल सिरियल्मध्ये. मी त्रिशा आणि किरण मध्ये कन्फुज झालो

नंदिनी, तुझा तर्क काय?<>>> मेरा भी वही तर्क है. (ते अ‍ॅबॉर्शनचं नव्हतं आलं डोक्यात) शिवाय ती नवर्‍यालाच हाताशी धरून हे सर्व करवत आहे असा माझा अंदाज. पूजा-बाला कनेक्शनमधे पण तीच सामिल असावी. पण... पण... पण...

एल्टीएफनेच तिच्यादेखील वडलांची हत्या केलेली आहे, त्यामुळे त्यांना हाताशी धरून ती आदित्यला मारेल का? हादेखील प्रश्न मला पडलेला आहेच.

दिव्याचं काम करणारी अभिनेत्री मला आवडते. अचानक ती व्हिलन झालीतर बघायला मजा येईल. जर ती नसेल तर मात्र एखादे नवीन पात्रच सूत्रधार असू शकेल.

एल्टीएफनेच तिच्यादेखील वडलांची हत्या केलेली आहे, त्यामुळे त्यांना हाताशी धरून ती आदित्यला मारेल का? हादेखील प्रश्न मला पडलेला आहेच. >>+१

पण असं असू शकतं, तिला PM व्हायचं असेल आणि आदित्य तिच्यामार्गातला अडसर आहे. राजकारणी कुणाचे सख्खे असतात?

पण असं असू शकतं, तिला PM व्हायचं असेल आणि आदित्य तिच्यामार्गातला अडसर आहे. राजकारणी कुणाचे सख्खे असतात?>> करेक्ट!

एल्टीएफनेच तिच्यादेखील वडलांची हत्या केलेली आहे, त्यामुळे त्यांना हाताशी धरून ती आदित्यला मारेल का? हादेखील प्रश्न मला पडलेला आहेच. >>>

बाला एलटीएफचाच आहे हे तिला माहिती नसेल तर?? थोडा तकलादु आहे पण..

बाद वे, आताशी कुठे क्लीअर झालय की दोन प्लॅण आहेत.
भावी पीएम ला मारणे.
कैद्याची सुटका.

प्लॅन एकच आहे ........कैद्यांची सुटका करणे त्याच्या बदल्यात बाला भावी पीएम ला मारण्याचे कबुल करतो....

कैद्यांची सुटका करणे त्याच्या बदल्यात बाला भावी पीएम ला मारण्याचे कबुल करतो <<< बालाच्या वडीलांना मारायचा आदेश आदित्यच्या वडलांनी दिलेला अस्तो ना? ऑपरेशन त्रिशुल मधे?

हो...... परंतु जो वर एलटीएफ स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तो पर्यंत हे असले धाडस बाला करणार नाही..
त्यांना रविद्रची सुटका करायची असते त्यासाठी ते दिव्याचा नवरा याची मदत घेतात......जेल ची माहीती काढुन देण्याबदल्यात दिव्याचा नवरा आदित्यला मारण्याचे सांगत असेल... म्हणुन तो सारखा तेच तेच विचारत असतो. आणि एलटीएफ चा चीफ त्यावर वैतागतो. ... जर त्यांना खरच मारायचे असेल तर ते आधी आदित्यला मारण्याचा प्रत्यत्न करतील.....मग कैद्यांना सोडवण्याचा....... इथे आधी प्राधान्य कैद्यांना सोडवायला दिलेले आहे

आदित्यला मारल्याने दिव्याच्या नवर्याला डायरेक्ट फायदा असा काहीच नाहिये म्हणुन ह्या कारस्थानात दिव्याचा संशय येतोय

अरे कोणितरी तो किरणचा पित्र जो झाडांमधे लपुन बसला मग पळुन गेला त्याचे काय झाले सांगाल काय? तोपण अजुन गायब आहे की.

Pages