ऑल-इन-वन डेस्कटॉप घेण्यासाठी मदत

Submitted by तुर्रमखान on 5 October, 2013 - 02:30

नमस्कार मायबोलीकर्स,

पाच वर्षापुर्वी घेतलेला डेस्कटॉप कंप्युटर खूपच हळू चालतोय. (गेल्या पाच वर्षात अनेकदा रॅम, आईफळा Happy , मॉनिटर वगैरे बदलून झालयं त्यामुळे वर्जीनल पार्ट कोणता हे लक्षात नाही). मागचे युएसबी पोर्ट्स चालत नाहीत. शिवाय मागं वायरींचं जंजाळ बघून कंटाळा आलाय. त्यालाच आता अपग्रेड करण्यापेक्षा एक ऑल-इन-वन डेस्कटॉप घ्यायचा विचार आहे. घर लहान असल्यामुळे जागा देखील कमी लागेल हा विचार आहेच. माझ्याकडे लॅपटॉप असला तरीही इतरांना विशेषतः आईला डेस्कटॉप बरा पडेल.

आंजावर थोडी शोधाशोध केल्यावर लिनोव्हो आणि डेल चे काही चांगले वाटले.

माझे निकष खालीलप्रमाणे आहेत.

१. मॉनिटर २१" किंवा मोठ्ठा हवा. फुल-एचडी असावा. टचस्क्रीन नको.
२. रॅम ४जीबी आणि हार्डडीस्क ५०० जीबी हवी.
३. मदरबोर्ड आणी चीपसेट लेटेस्ट हवा. (आय-३ किंवा आय-५)
४. युएसबी-३, वायफाय हवं. वेब कॅम नसलातरी चालेल.
५. फ्रीडॉस असेल तर उत्तम. कारण मी उबुंटू वापरतो.
६. बजेट साधारण ५० हजाराच्या आसपास आहे.

दुकानात चौकशी केल्यावर असे कॉम्युटर खूप लोकं घेत नसल्याचं कळलं. नंतर समस्या येतात असं त्यांचं म्हणणं होतं. अपग्रेड होत नाही. आतल्या सुट्याभागांचे फॉर्मफॅक्टर वेगळे असल्यामुळे दुरुस्ती खर्च जास्त येतो. खूप वापरल्यावर गरम होतो. असं काहीबाही म्हणणं होतं. पण आयसीआयसीआय बँकेत वगैरे असे डेस्क्टॉप वापरायला चालू केलं आहे. त्यामुळे त्या दुकानदाराच्या म्हणण्यात कितपत तथ्य होतं ते माहिती नाही.

तर आपल्यापैकी कुणाला ऑल-इन-वन डेस्क्टॉप वापरण्याचा अनुभव आहे काय? असल्यास कोणता रेकमेंड कराल?

अग्रीम धन्यवाद.

आपला तुर्रमखान

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडलेले व परवडणारे कॉन्फिग/मशिन जास्त विचार न करता घेऊन टाकावे. >>>>>>>>> आवडल. Biggrin

आम्ही पीसी असेंबल्ड करुन देतो. असेंबल मध्ये अधिक पैसे वाचतील फक्त सगळे पार्टस घेतांना नीट निरखून / पारखून बसवतो. सोबत २ वर्षांची वॉरंटी पण आहे रिपेअरींगकरता अतिशय पैसे मोजावे लागत नाहि, घरी येऊन रिपेअरींग करतो. आपल्याला पीसी घेऊन त्यांच्या सर्विस सेंटरला जावं लागतं नाहि वगैरे वगैरे.
santosh karande.
मोबाइल नंब्रर- ७२०८६४३४६४
mumbai.

One easy suggestion is to purchase a laptop as per your required specs. and then connect wireless (or wired as per budget) keyboard and mouse .. This will be useful for senior people and everyone who require more typing or difficulty in operating laptop mouse.
This will save money and space as well.

Pages