सारातले मुगडाळ आप्पे.

Submitted by सुलेखा on 4 October, 2013 - 00:13
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भिजवलेली मुगडाळ-कोणतीही सालीची किंवा पिवळी .
१/२ वाटी पोहे.
हिरवी मिरची -लसुण-आले-कोथिंबीर-जिरे यांचे वाटण २ चमचे किंवा आवडीप्रमाणे.
१/४ टी स्पून हिंग,
१/२ टी स्पून हळद,
मीठ चवीप्रमाणे,
इनो पाऊच,
१ टेबलस्पून तेल,
सारासाठी :-
नारळाचे दाट दूध,
चिंचेचा कोळ ,
गूळ
थोडेसे खोबरे व हिरवी मिरचीची पेस्ट चवीप्रमाणे,
मीठ.
वरुन घालायला कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे.

क्रमवार पाककृती: 

पोहे भिजवुन पाणी निथळ्उन घ्यावे.
भिजवलेली मूगडाळ मिक्सरमधे जाडसर वाटावी.त्यात पोहे घालुन ते ही एकदा फिरवुन घ्यावे.
यात वाटलेले वाटण,हळद,हिंग,मीठ ,इनो घालुन फेटावे,
या मिश्रणाचे आप्पे करायचे आहेंत.
आप्पेपात्रात किंचित तेल सोडुन आप्पे दोन्हीकडुन छान भाजुन घ्यावे.
नारळाच्या दाट दूधात चवीप्रमाणे चिंचेचा कोळ,खोबरे -हिरवी मिरचीचे वाटण ,गूळ व मीठ घालुन ढवळावे.
नारळाचे सार तयार झाले आता यात गरम आप्पे सोडुन वरुन कोथिंबीर व डाळिंबाचे दाणे घालावे.

अधिक टिपा: 

चिंचेच्या कोळाऐवजी कोकम आगळ चालेल..
पिवळी मूगडाळ +पालक ,हिरवे मूग+थोडीशी उडद डाळ, असे घेतले तरी चालेल.

माहितीचा स्रोत: 
आई.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, छान आहे हे कॉम्बिनेशन. झटपट होईल. गरमागरम खाताना बरं वाटेल. थँक्स सुलेखा Happy