मासे ४५) खवली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 October, 2013 - 06:33
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

खवली मासे २ वाटे
१ गड्डा लसुण पाकळ्या ठेचून
पाव चमचा हिंग (नसल्यास चालेल)
पाव वाटी तेल
अर्धा चमचा हळद
१.५ ते २ चमचे मसाला
आवश्यकते नुसार मिठ

क्रमवार पाककृती: 

खवली मासे हे जास्तकरून खाडी व खाडीलगतच्या शेतांमध्ये सापडतात. साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांमध्ये ह्यांची रेलचेल जास्त असते. ह्यांचे शरीर चकचकीत खवल्यांनी भरलेले असते म्हणून ह्यांना खवली म्हणत असावेत. आत मधला काटा बारीक काट्यांचा असतो जसा मांदेली, मोदकांमध्ये वगैरे असतो तसाच. बोईटा एवढेही खवली मासे असतात. खालील फोटोतील खवली मासे हे लहान साइझचे आहेत. पण हे लहान खवली मासे चविला अप्रतिम असतात. अगदी मोठ्या मोठ्या नामवंत चविष्ट माश्यांची चव झाकून टाकतात इतके टेस्टी.

मासे लहान असल्याने साफ करणे जरा कष्टाचे काम असते. विळीवर न काढता सरळ नखांनी उलट्या बाजूने काढून टाकायची. नरम असल्याने सहज निघतात. डोके ठेवायचे. फक्त डोक्याच्या खाली ली साईडने थोडी चिर पाडून पोटातली घाण काढून घ्यायची व साफ केलेले मासे तिन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे.

हे मासे शिजवण्यासाठी भांड्यात तेल गरम करून घ्या. त्यावर लसुण पाकळ्या परतवा. आता ह्यावर हिंग, हळद, मसाला घालून पटापट परतवून (मसाला जळू नये म्हणून) त्यावर मासे टाका. लगेच गरजेनुसार मिठ घाला. गॅसची फ्लेम अगदी मिडीयम किंवा मंदच ठेवा. अगदी हलक्या हाताने हे मासे ठवळा. आता ह्यावर झाकण ठेऊन मंद आचेवरच वाफेवर शिजवत ठेवा. मधुन एकदा परत हलक्या हाताने ढवळा किंवा भांडे झाकणासकट फडक्यात उचलून वरखाली करून ढवळा म्हणजे माश्यांचा चुरा होणार नाही. १० मिनीटांत शिजतात मंद आचेवर शिजतात. चव अगदी खल्लास.

अजुन एक

वाढणी/प्रमाण: 
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा: 

चिंच टाकण्याची गरज नसते.
मोठे खवली मासे नुसते तळता येतात.
डोके काढायचे नाही त्याला चांगली चव असते व ती मसाल्यात मुरते.

माहितीचा स्रोत: 
चुलत सासरे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोएपंखिस म्हणुन जास्त काटे असलेले मासे शक्यतो तळायचे म्हणजे काटे पसरत नाहीत. आणि काटे कालवणात उतरले म्हणजे जास्त शिजवल कालवण त्यामुळे मासे तुटले. मासे जास्त शिजवण्याची गरज नसते. ते लगेच शिजतात.

सौ ने त्याचा रस्सा आमटी बनवली पहतो तर काय बरेच काटे त्य मध्ये छोटे मोठे ... मग ते एक एक घास खायच्या अगोदर दहा वे>>>>>>>> मासे नाजूक असतात. २-३ मिनिटात शिजतात.अगदी हलक्या हाताने परतायचे.नाहीतर त्याचे तुकडे पडतात.आपण भाजी ढवळतो तसे मासे ढवळू नये.

माशाचे एंडोस्केलेटन (आतला सांगाडा) : दोन प्रकारचा असतो. एक कार्टिलेजिनस, दुसरा बोनी. एक्झोस्केलेटन उर्फ खवले, पर्/फिन्स इ. कोळीण देतानाच साफ करून देते.

मोठ्या माशांच्या स्टीक्स बनवताना / फाय्स्टार हाटलीतले शेफ्स सगळेच लहान मोठे काटे चिम्ट्याने मासा कच्चा असतानाच काढून मग शिजवतात. हे कसे करायचे त्याचे व्हिडू यूट्यूबवर बक्कळ आहेत. पण तो किचकट प्रकार, अन किम्मत फाईव्ह स्टार होते.

घरी आपण आतल्या काट्यासकट शिजवतो.

तर, कार्टिलेज उर्फ कूर्चा, हे मऊ हाड असते, कोंबडीत हे अगदी खोबर्‍यासारखे लागते, आरामात चावून खाता येते. माशातले छोटे कार्टिलेजिनस काटे आरामात चावून खाता येतात. बरेचसे छोटे बोनी अर्थात हाडासारखे काटेही चावून खाता येतात.
बहुतेकदा लहानमोठे काटे गिळले गेले, तरी चालतात, जठरातल्या हायड्रोक्लोरिक आम्लात ते पूर्ण वितळतात, व हा सगळा कॅल्शियमचा उत्तम स्रोत असतो.

मटणात/चिकनमधे हाडं चावून खाताना, हे कॅल्शिअम प्लस त्यातील मॅरो मधील उत्तम दर्जाचे हीम आयर्न खाणार्‍यास भरपूर प्रमाणात मिळते.

हुकसारख्या आकाराचे बोन/काटा न चावता गिळला गेला, तर त्रासदायक होऊ शकतो, कारण तो अडकू शकतो.. मग तुमच्या घशात दुर्बीण टाकून आम्ही तो काढतो. ३० रुपयांच्या माशाचा काटा काढून घ्यायला ३० हजारापर्यंट खर्च येऊ शकतो Wink

तर टेक होम मेसेज काय?

१. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा. भसाभसा गिळायचा प्रयत्न केला, तर मासा त्रास देतो. कोकणस्थी पद्धतीने हळूहळू रवंथ केल्यासारखे खा.
२. मासे खाताना नीट चावूनही जे काटे बारीक होत नाहीत, जिभेला टोचतात, ते गिळू नका. यासाठी पोळीत गुंडाळून पीस खाऊ नका.
३. एखादा गिळला गेलाच तर पॅनिक होऊ नका. अनेकदा काटा घशातून खाली निघून गेलेला असतो, घशात थोडा ओरखडा उमटल्याने टोचत असते. थोडा सुका भात खा. खरच भीती वाटत असेल, तर डॉ. कडे जा. पण यासाठी आधीच मोठे काटे बोटाने काढून टाकून अन बारिकसारिक नीट चावून खायची सवय लावून घ्या.

लहान मुलांना बोटाने नीट चाचपून तुकडा भरवा. चावून खायची सवय लावा.

अ‍ॅनाटॉमी ठाऊक नसली तरी सवयीने कोणत्या माशाच्या कोणत्या भागात कोणते काटे असतात ते समजते.

आरारा छान माहीती.

घोळ, जिताडा ह्या सारख्यात छोटे मासे नसतात. मणक्यासारखाच भाग असतो तो तर सहज काढता येतो. शिवाय कोलंबीला एकही काटा नसतो.

पापलेट हलव्याचे काटेही सहज काढण्यासारखे असतात.

Pages