(थरांचे राजकारण सोसवेना )

Submitted by निनाद on 3 October, 2013 - 05:05

बेफिकिर यांची क्षमा मागून... त्यांच्या गझलेवर हे सुचले.

थरांचे हे लेप-थापण सोसवेना
मला फेशियलचे मिश्रण सोसवेना

तिची जागेपणीही पडतात स्वप्ने
सासर्‍यांचे आता आवतण सोसवेना

गझलेची व्यथाच ही मूळव्याधी
रोज मसाल्याचे जेवण सोसवेना

स्वतःचाही शिरा खाईन म्हणतो
फक्त तुझेच खादाडपण सोसवेना

शिंक शिंकता जाणे सोसले पण
तुझे सदा सर्दीचे कारण सोसवेना

विचारावे कुणाला कोठे कळेना
पोटातील दाबाचा क्षण सोसवेना

पुन्हा मैद्याचा हा उंडा घ्यावा
पाककला नाही हे दूषण सोसवेना

दयेचा अर्ज दे कवीस माझ्या
हा विडंबनांचा रावण सोसवेना

प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही
गझलांचे नित्य पाडण सोसवेना

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निनाद,

समवृत्तीय विडंबने(विशेषतः गझलेची तरी) झाल्यास मजा यावी.

धन्यवाद!
अलामत, काफिया आणि रदीफ पाळला... रावण विडंबनात अजून काय पाळेल? Wink
आणि सगळेच पाळले तर मजा काय असेही वाटले.

तरीही तुम्ही शब्द बदल सुचवा... स्वागत आहे.

निनाद.. मस्तच जमलीय...
बेफीजींच्या नावाचा पण काफिया घ्या.. त्यांच्या गझलेवरच बेतलेली असल्याने अजून रंगत येईल.. Wink
हो.. पण अर्थ सांभाळून बरं का?

विडंबन करणे इतकी सोपी गोष्ट नसते, निनादराव ! सर्कशीतल्या कसरतपटूंची नक्कल करत धडपडणार्‍या विदूषकाच्या अंगी त्या कसरतपटूंपेक्षा जास्त कौशल्य असावे लागते, तसेच आहे हे.
तूर्तास किमान वृत्तात तरी लिहा.

प्रशांत, वैभवराव आणि विजयराव पोच दिल्याबद्दल धन्यवाद!!
दोन क्षण हसू आले तरी बास अजून काय हवे.

ज्ञानेश पण या रचनेला मी 'गझल' म्हंटले नाहीये हे ध्यानात घ्या. Happy
तुमच्या सूचनेचा विचार मी नक्कीच करेन जर गझलेचे गझल म्हणूनच विडंबन केले तर...