र्हाईन फॉल हि अगदी छोटीशी ( म्हणजे वेळेच्या दॄष्टीने ) सहल. साडेतीन तासात आपण परतही येतो. ( बाकीच्या सहली १०/११ तासांच्या आहेत. ) त्यामूळे परतीचे विमान दुपारी २ नंतरचे असेल तर शेवटच्या दिवशीही हि सहल करता येते आणि येताना थेट विमानतळावर जाता येते.
तर हा र्हाईननदीवरचा धबधबा. युरपमधील सर्वात मोठा. गोविंदा आणि राणी मुखर्जीचे एक गाणे इथे चित्रीत
झाले होते. ( कुठले ते जाणकारांना विचारा )
या धबधब्याला भिडायचे अनेक पर्याय आहेत. अंग न भिजवता नदीच्या काठाकाठाने पायी जाता येते. धबधब्याच्या थोड्या मागे एक रेल्वेचा ब्रिज आहे. त्यावर आता जाता येते का ते माहीत नाही, पण गेल्या वेळेस मी गेलो होतो. उजव्या बाजूला एक राजवाडा आहे तिथून खाली उतरत ( आता लिफ्ट आहे ) एका सज्ज्यावर येता येते. तिथून धबधब्याला हात लावता येतो.
शिवाय बोटी आहेतच. या बोटींचेही पर्याय आहेत. एक बोट लांबूनच जाते तर एक चक्क धबधब्याच्या जवळच नेते. आणखी एक पर्याय म्हणजे त्या मधल्या सुळक्यापाशी ती सोडते. दहा मिनिटांनी परत न्यायला येते.
ऐन धबधब्याच्या मधे चारी बाजूंनी पाणी वहात असताना, नुसते असणेच थरारक असते.
पण हे सर्व अत्यंत सुरक्षित आहे. बोट अजिबात हेलकावत नाही. तसेच सुळक्यावर जायला व्यवस्थित पायर्या आहेत. तिथल्या धक्काही सुंदर आहे.
तिथे मात्र दोन भारतीय बायकांनी घोळ घातला. गाईडने नेमक्या सुचना देऊनही त्या दोघी हरवल्या.
वेळ झाली तरी बसकडे आल्याच नाहीत. नियमानुसार दहा मिनिटे त्यांची वाट बघून, गाईडने बस सोडली.
अशा वेळी एक सर्टीफिकेट तयार करून दोन साक्षीदारांच्या सह्या घेतात. मी सही केली पण ती करताना~
खरोखरच लाज वाटली. आणि नवल म्हणजे गाईडलाही वाईटच वाटत होते. ( त्यांना परत यायला समजेल ना ? पैसे असतील ना ? अशी काळजी तिला वाटत होती. )
मी अर्थात वेळेवर परत आलो होतो. येताना तिथल्या भारतीय स्टॉलवर गेलो तर गर्दी होती म्हणून परत आलो. दहा मिनिटे थांबायचे ठरले म्हणून परत तिथे गेलो तर तिथल्या भोंगळ कारभाराचा चांगलाच
अनुभव आला. सामोसे घ्यायचे होते, नुसते मागितल्याबरोबर सुटे पैसे द्या. दोनच आहेत, जास्त मिळणार
नाहीत. मी तरी किती तयार ठेवू. तुम्ही असेच बस सुटताना येता. मग घाई करता.. अशी बडबड.
( विशिष्ठ शहरातला दिसत नव्हता पण त्याचे ग्राहक मात्र तिथलेच असावेत. )
अर्थात मी घेतलेच पण काही खास नव्हते.
परतीच्या वाटेवर एअरपोर्टवरून काही गेस्टस पिक अप केले पण त्यापुर्वी थोडा काळ आपण जर्मनीत असतो.
तिथे सरकारी गेट आहे पण पासपोर्ट कंट्रोल नाही. पासपोर्ट जवळ ठेवावा अशी अपेक्षा असते, पण कुणी
विचारत नाही. जर्मनीमधले अन्नपदार्थांचे भाव तुलनेने कमी असल्याने, अनेक स्विस लोक केवळ
खरेदीसाठी तिथे जात असतात.
मी सहसा व्य्क्तींचे फोटो इथे टाकत नाही. पण हे बाळ मात्र खुप आवडले. ऐट तरी बघा. बाजारहाटीला निघालय. ते मावेल एवढी पिशवी आहे. झेब्रा वरूनच क्रॉस करायचा निर्धार आहे.
धबधब्याचे पहिले दर्शन
आणि दुसरे दर्शन
जागूचे मित्र !
बोटीतून सुळक्याकडे जाताना
धक्क्यावर पोहोचल्यावर
सुळक्याच्या वाटेवर
सुळक्याच्या वरून
तो सज्जा दिसतोय, तिथून धबधब्याला हात लावता येतो.
परत जाणारी बोट
दूरवरून दर्शन
सुळक्याच्या मागे
सुळक्याच्या पायतळीचा बोगदा
गुलाबी बोट, ( हि धबधब्याच्या जवळ नेते )
सुळक्यावर जायचा जिना
फेसाळ पाणी
फेसाळ पाणी
या जागी मला रफीचे, सौ बार जनम लेंगे.... आठवलं !
अर्थात त्यासाठी सौ बार मरायची तयारी आहे माझी !
सुरक्षित धक्का
जर्मनीतली शेती ( इथून पुढचे सर्व फोटो चालत्या बसमधून घेतले आहेत )
रांगोळी
जर्मन स्विस बॉर्डर
जरा फोटुग्राफी !
जरा फोटुग्राफी !
मला आवडलेली घरे
मागे वळून बघताना.
दिनेशदा झक्कास फोटोज
दिनेशदा झक्कास फोटोज
आधी धबधबा पाहुन म्हणलं हे काय
आधी धबधबा पाहुन म्हणलं हे काय एवढुस्साच???
मग रेफरन्सला बोट बघुन कळालं. >>>>> मलाही असंच वाटलं अगदी...
जबरी फोटो ....
तिथे मात्र दोन भारतीय बायकांनी घोळ घातला. गाईडने नेमक्या सुचना देऊनही त्या दोघी हरवल्या.
वेळ झाली तरी बसकडे आल्याच नाहीत. नियमानुसार दहा मिनिटे त्यांची वाट बघून, गाईडने बस सोडली. >>> भारत सोडला तर बाकी सर्वत्र वेळ अगदी कटाक्षाने पाळतातच. मी गेलो होतो तिथल्या गाईडने तर आधी अशा स्टोर्या सांगून, सांगूनच सर्वांना वेळेत यायला भाग पाडले होते ....
फारच सुंदर फोटो आहेत सगळेच...
फारच सुंदर फोटो आहेत सगळेच...
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
मस्तच ..भारी फोटु
मस्तच ..भारी फोटु
मस्त आहेत फोटो... फेसाळतं
मस्त आहेत फोटो... फेसाळतं पाणी जबरी दिसतंय.
Pages