आधुनिक सीता - ११

Submitted by वेल on 28 September, 2013 - 02:06

भाग ६ - http://www.maayboli.com/node/45250
भाग ७ - http://www.maayboli.com/node/45278
भाग ८ - http://www.maayboli.com/node/45392
भाग ९ - http://www.maayboli.com/node/45427
भाग १० - http://www.maayboli.com/node/45475

**************************************************************

त्या ग्लानीतून मी जागी झाले पाहिले तर फातिमा माझ्या बाजूलाच बसली होती. रफिक आजूबाजूला कुठेच नव्हता. मला थोडे बरे वाटले.
मला जाग आलेली पाहून फातिमाने मला उठेवून बसवले. "यु वॉक? यु टेक बाथ?" मी मान हलवली. अंग नुसते आंबून गेल्यासारखे वाटत होते. गरम पाण्याने जरा मोकळेपणा वाटेल असे मला वाटले. मी मान होकारार्थी हलवली. फातिमानेच आधार देऊन मला बाथरूमपर्यंत चालत नेले. "हॉट वॉटर ऑर कोल्ड?". "हॉट" तिने बालदीत गरम पाणी काढून दिले, बसायला छोटे स्टूल दिले आणि मला म्हणाली - "यु टेक बाथ. आय स्टॅण्ड हियर." असं म्हणून ती माझ्याकडे पाठ करून उभी राहिली. त्या गरम पाण्यासोबत माझ्या जाणीवा मोकळ्या होऊ लागल्या आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझ्या आयुष्यभराच्या तुरुंगवासाला आता सुरुवात झाली होती. मला जाणवले होते की माझी आता इथून सुटका होणे अशक्य. मी हुंदके देऊन रडू लागले. माझ्या रडण्याचा आवाज ऐकून फातिमा मागे वळली. तिने माझ्याभोवती टॉवेल गुंडाळला. मला बाहेर नेले. मी मुंबईला नेण्यासाठी म्हणून भरून ठेवलेली बॅग माझ्या पलंगाच्या बाजूला आणून ठेवली होती. त्यातून मला कपडे काढून दिले फातिमाने. तिनेच मला कपडे घालायला मदत केली. मला कळत होते, एखाद्या लहान मुलीची काळजी घ्यावी तशी ती माझी काळजी घेत होती. पण काही बोलण्याच्या पलिकडे गेल्या होत्या माझ्या जाणिवा. मला तिने पलंगावर बसवले. माझ्या बाजूला बसली ती. तिने माझे हात हातात घेतले आणि माझ्याकडे टक लावून पाहू लागली. मला दिसले नाहित तिचे अश्रू पण मला वाटतं तिलाही मानसिक वेदना होत होत्या. थोडा वेळ असाच गेला. दार उघडून रफिक आत आला, तसे फातिमा उठून निघून गेली.
रफिक माझ्यासमोर खुर्ची घेऊन बसला. "सरिता, मला कल्पना आहे तुला खूप धक्का बसला आहे. सागर तुला असा इथे सोडून गेला आणि तू आता कायम इथेच राहणार. तू माझ्याशी लग्न कर किंवा लग्न न करताच माझी हो. आता तुझ्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही. पण निर्णय तुझा. माझ्याजवळ कधी यायचे हाही तुझा निर्णय. मी तुझ्यावर कधीही जबरदस्ती करणार नाही. तू माझी झाली नाहिस तरिही तो तुझा निर्णय असेल. अगदी तुझ्या किंवा माझ्या शेवटापर्यंत. तुला तुझ्या आवडीप्रमाणे शाकाहारी जेवण मिळेल, पण याच खोलीत. तुला इथून बाहेर पडता येणार नाही. तुला बाहेर जायचे असेल तर मी सोबत असेन तेव्हाच बाहेर जाता येईल पण तेही ह्या घराच्या बागेमध्ये. तुला हवी ती पुस्तकं वाचायला मिळतील. वर्तमानपत्र मात्र मिळणार नाही. तुझ्या ह्या खोलीत तुला टी.व्ही. मिळेल. पण त्यावर तुला न्युज चॅनेल्स पाहायला मिळणार नाहीत. सिनेमे, सिरियल्स हव्या तेवढ्या पाहा. तुला फोन, कॉम्प्युटर, इंटरनेट, कागद पेन काहीही मिळणार नाही. ह्या खोलीत काय होतं ह्यावर माझं आणि माझ्या मोठ्या अम्मीचं बारिक लक्ष आहे. त्यामुळे तू कोणाला माझ्याविरूद्ध फितवायचा प्रयत्न करू नकोस. तसे केल्यास तुला मी काही इजा करणार नाही. पण तुझा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही आणि तुला फ्रस्ट्रेशन येईल, आणि ते मला नको आहे. मला पूर्वीसारखी हसती खेळती गप्पा मारणारी, हुषार सरिता हवी आहे. ती आत्ता शॉक मध्ये आहेस, तुला हवा तेवढा वेळ घे रिकव्हर व्हायला, मी वाट पाहेन." तो बोलत होता, मी मान खाली घालून ऐकत होत. असे वाटले समोर बसलाय तो रावण आणि मी सीता, अशोकवनाऐवजी ह्या खोलीत बसलेली. माझ्याशी बोलून तो निघून गेला.
रफिक बाहेर गेला तशी फातिमा आत आली. तिकच्या सोबत तिने गरम गरम दूध आणि कॉर्नफ्लेक्स आणले होते. मला तशी खायची इच्छा नव्हती. पण फातिमाने जबरदस्तीने मला भरवायला सुरुवात केली. दोन घास पोटात गेल्यावर भूकेची जाणीव झाली. खरंतर पोटाल एवढी भूक होती की जे समोर असेल ते अधाशासारखं खावं पण मनावर हे जे दडपण होतं त्याने फारसं खाऊ नाही दिलं फातिमाने आणलेल्या दूध-कॉर्नफ्लेक्स मधले अर्धेसुद्धा संपवले नसतील, मन पुन्हा नैराश्याने झाकोळून गेलं.
हे काय होत होतं माझ्यासोबत आणि का? का होत होतं हे सगळं माझ्यासोबत? आता काय करायचं. स्वतःला हे दोन प्रश्न विचारत मी नुसतीच बसून राहिले. फातिमा बाहेर जाऊन परत आत आली. आत आल्या आल्या तिने टी.व्ही. लावला. टी.व्ही.वर टॉम अ‍ॅण्ड जेरी चालू होतं. नाही म्हटलं तरी त्यात मन रमत गेलं आणि मन हलकं होत गेलं. मनावर गारूड करणारे सगळे विचार दूर पळून गेले. किती वेळ मी ते पाहात होते कोणास ठाऊक. मला जाणीव झाली ते फातिमा जेवण घेऊन आल्याची. मी स्वतःच उठून हात धुवून आले. जेवायला साधासाच पराठा आणि बटाट्याची भाजी आणि चटणी होती. जेवून बरंच बरं वाटलं हे जेवण नक्कीच रामण्णाच्या हातचं होतं. म्हणजे रामण्णाची भेट झाली तर सागरची काहीतरी खबरबात मिळू शकली असती. पण मी रामण्णाला भेटणार कशी? रफिकने तर सांगितलं होतं ह्या खोलीबाहेर जायचं तर मी फक्त त्याच्यासोबतच जाऊ शकत होते. म्हणजे मरेपर्यंत तुरुंगवास? त्यापेक्षा मेलेलं काय वाईट. पण आत्महत्या करायलाही काही संधी ठेवली नव्हती रफिकने. त्या खोलीला पंखा नव्हता. टी.व्ही, ए.सी, गीझर यांच्या केबल्ससुद्धा नव्हत्या. खोलीच्या दरवाजाला आतून बंद करायला कडीसुद्धा नव्हती. काय विचित्र तुरुंग होता. मी टी.व्ही चं चॅनेल बदललं. पुन्हा एकदा कार्टून - मिकी डोनाल्ड. मी पुढचं चॅनेल पाहिलं कार्टून, पुढचं चॅनेल पुन्हा कार्टून, पुढचं चॅनेल पुन्हा कार्टून.... आठ दहा चॅनेल नंतर पुन्हा टॉम अ‍ॅण्ड जेरी. मला पुन्हा धक्क बसला. टी.व्हीवर फक्त कार्टून? मी माझा हा शॉक विसरून लवकरात लवकर नॉर्मल व्हावं म्हणून हे रफिकने मुद्दम केलं होतं का?

http://www.maayboli.com/node/45579

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास... .

मस्त.. उत्सुकता खूप वाढल्ये... पुढचे भागपण असेच पटापट टाका.. आम्ही वाट पाहतोय Happy पुलेशु