स्वित्झर्लंड मधल्या एका राज्यात बुरखा बंदी

Submitted by फारएण्ड on 27 September, 2013 - 02:35

स्वित्झर्लंड मधल्या एका "कॅण्टन" (प्रांत/राज्य/परगणा सारखे काहीतरी असेल) मधे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालायला बंदी केलेला कायदा नुकताच पास झाला. याचा मुख्य उद्देश बहुधा मुस्लिम स्त्रियांना बुरखे घालायला बंदी करणे हा असावा.
http://www.swissinfo.ch/eng/swiss_news/Burka_ban_approved_in_Italian-spe...

त्याचे वरकरणी कारण सार्वजनिक सुरक्षा हे दाखवले जाते आहे. बुरखा असेल तर आत कोण आहे हे कळणार नाही वगैरे वगैरे. पण इमिग्रंट लोकांनी स्वत:ची ओळख जपल्यास ते मुख्य प्रवाहात मिक्स होत नाही असे सहसा 'उजवे' लोक म्हणतात त्याचाही हा एक भाग आहे.

एक सुरक्षेचा भाग सोडला तर आवर्जून कायदा करण्याएवढे यात काय आहे ते कळत नाही. काही महिला तशा फिरल्या तर कोणाला काय प्रॉब्लेम आहे? काही स्पेसिफिक ठिकाणी तसे करायला बंदी असू शकते (विमानतळ, लायसन्स साठी फोटो ई.) पण सार्वजनिक ठिकाणी कोणी काय घालून फिरावे याबद्दल कायदा कशाला?

पण त्याची दुसरी बाजू ही आश्चर्यकारक आहे - अ‍ॅम्नेस्टी सारख्या संस्थांनी याचा निषेध केला आहे. तोही अनाकलनीय आहे. त्या स्त्रिया स्वेच्छेनेच नव्हे तर आवडीने अशा फिरतात की काय? उलट त्यांनाच आपोआप स्वातंत्र्य मिळणार नाही का यातून? अ‍ॅम्नेस्टीचा यात एक मुद्दा असा आहे की बाहेर बुरखा घालता येणार नसल्याने त्यांना बाहेर पडताच येणार नाही. पण पाश्चात्य देशातील सामाजिक व्यवस्थेमधे तसे बरेच दिवस करणे अवघड वाटते. मध्यपूर्वेतील मागासलेल्या देशांमधे सामाजिक प्रेशरमुळे ज्या कुटुंबांना तसे वागावे लागत असेल त्यांना तसे प्रेशर पाश्चात्य देशात नसल्याने उलट त्या कायद्याचे निमित्त वापरून बुरखा न वापरता फिरता येइल.

एका बाजूने ही धर्मात अनावश्यक ढवळाढवळ वाटते, तर दुसर्‍या बाजून स्त्रियांना चांगली संधी. कॉम्प्लिकेटेड केस आहे Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धर्मात (तथाकथित) ढवळाढवळ आणि स्त्रियांना चांगली संधी/त्यांची बेटरमेन्ट ---- या बहुतेकवेळा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, फारेण्डा. Wink

लेखाच्या पूर्वाधाप्रमाणे बंदी समर्थनीय आहे. पण उत्तरार्ध वाचल्यावर बंदी बुरख्याच्या सक्तीविरुद्ध असायला हवी होती असं वाटतं....

फ्रान्समध्ये दोन वर्षांपूर्वीच बुरख्यावर बंदी आली होती. स्वित्झर्लंडमधल्या एका परगण्यातील जनतेने प्रत्यक्ष मतदानाद्वारे या नियमाच्या बाजूने मत दिले असले तरी स्विस पार्लमेंटने त्याला मंजुरी देणे गरजेचे आहे.

<पण इमिग्रंट लोकांनी स्वत:ची ओळख जपल्यास ते मुख्य प्रवाहात मिक्स होत नाही असे सहसा 'उजवे' लोक म्हणतात त्याचाही हा एक भाग आहे.> इकडचे उजवे उलट 'त्यांनी' स्वत:ची ओळख जपावी असेच प्रयत्न करतानाच्या बातम्या आहेत.

जास्त कशाला ? सत्यपालसि.न्ग पुण्याचे पोलीस आयुक्त असताना त्यानी मुलींनी स्कार्फने तोंड झाकून वावरू नये असा फतवा काढला होता. त्याचे कारन सुरक्षा असाच होता. त्याविरुद्ध नेहमीप्रमाणे ओरड झाली. पुण्यातलोकानंच्या फायद्याचा निर्णय घेतला तरी त्याविरुद्ध बोम्ब मारण्याचा शिरस्ता आहे. उद. हेल्मेट सक्ती. सिग्नल्स. इ. अर्थात त्यावेळी कदाचित पुढेही स्त्रिया.न्ना पुढे करून अतिरेकी कारवाया करण्याचा प्रकार सुरु होता . उदा. इशरत जहां प्रकरण. पूर्वीही असे झाले आहे राजीव गा.न्धी प्रकरणारील धनू आणि नलिनी ई.

धर्मात (तथाकथित) ढवळाढवळ आणि स्त्रियांना चांगली संधी/त्यांची बेटरमेन्ट ---- या बहुतेकवेळा एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, फारेण्डा. > १०००००+

ज्या सन्स्कृतिचा बुरखा हा महत्त्वाचा घटक आहे त्या संस्कृतीत व्यक्तीस्वातंत्र्याला कितपत वाव आहे? आजिबात नाही. अशा सर्व देशात धर्म बदलला की मृत्युदंड आहे, धर्माचा अपमान होईल असे काही बोलले, लिहिले वा वाचले तर मृत्युदंड होतो असा कायदा आहे. कुठला हा धर्म हे सांगायची गरज नाही.
त्यामुळे जी संस्कृती प्रबळ असताना, सत्ताधारी असताना व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटते त्याच संस्कृतीच्या परंपरांनी पाश्चिमात्य संस्कृतीतील व्यक्तीस्वातंत्र्याचा आधार घेऊन आपली परंपरा अव्याहत चालू ठेवण्याचा नैतिक आग्रह धरणे कितपत योग्य आहे?
पाश्चिमात्य संस्कृतीला बुरखा हा अशा दडपशाहीच्या संस्कृतीचा चंचूप्रवेश असे वाटते, ह्या चंचुप्रवेशानंतर ही संस्कृती डोईजड होणार आणि त्यातून वाढत्या मागण्या आणि त्यातून सांस्कृतिक अतिक्रमण अशी साधार भीती आणि त्याविरुद्ध बंदीचा विचार त्यातून उपजतो आणि बळावतोही.