हितगुज दिवाळी अंक २०१३ : संकल्पना - १

Submitted by संपादक on 25 September, 2013 - 13:32

लहान मुलांचे आजार
डोक्यात कळ नेणारी टांचदुखी
पाठीचे दुखणे
डी व्हिटॅमिनची डेफिशिअन्सी
मोव्हेंबर: पुरुषस्वास्थ्यासाठीचा जागतिक उपक्रम

ओळखीचे वाटतात वरचे विषय? वाटणारच! मायबोलीच्या आरोग्यविभागातल्या चर्चा आहेत या.

बरं.. हे माहीत आहे का ?

१९१३ साली क्षयरोगावरील संशोधनासाठी मेडिकल रिसर्च कौन्सिलची स्थापना झाली. त्याला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली.
१९२९ साली सर हॉपकिन्स यांना 'वाढ आणि निरोगी आयुष्यासाठी व्हिटॅमिनचं आहारातलं महत्त्व' शोधून काढण्यासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.
१९४५ साली फ्लेमिंग, फ्लोरी आणि चेन यांना 'रोग निवारणासाठी औषधांमध्ये पेनिसिलिनचा वापर' यासाठी नोबेल पुरस्कार दिला गेला.
१९६२ साली क्रिक, वॉटसन आणि विल्किन्स यांना डीएनएची रचना शोधणे आणि त्या संबंधित कामासाठी नोबेल पुरस्कार दिला गेला.

काय बडबड चाललीय ही, असं वाटतंय ना? वर दिलेल्या सगळ्या विषयांत सामायिक धागा आहे तो औषधांचा, त्यांच्या संशोधनांचा व वैद्यकशास्त्राचा.

आजपर्यंत अनेक लोकांनी वैद्यकशास्त्राला आणि पर्यायानं जनकल्याणाला आपलं आयुष्य वाहिलं आहे. याच 'वैद्यकशास्त्र' या विषयाला वाहिलेला एक संपूर्ण विभाग आपल्या या हितगुज दिवाळी अंकात असणार आहे.

डॉक्टर, परिचारक, संशोधक, अ‍ॅलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक अशा पर्यायी उपचार पद्धती आणि यांसारखे अनेक पैलू आपल्याला उलगडायचे आहेत हितगुज दिवाळी अंकाच्या विशेष विभागात.

एखाद्या मोठ्या रोगाबद्दल आणि त्यावरील औषधोपचारांबद्दल माहिती, प्रतिबंधात्मक उपाय, एखाद्या किरकोळ दुखण्याबद्दल सर्वसामान्य भाषेतील माहिती, आरोग्यविषयक तपासण्या व त्यांचे दूरगामी परिणाम यांबद्दलची माहिती, नवनवीन औषधं, सध्या चालू असलेली संशोधनं आणि त्यांचे भविष्यातील उपयोग याबद्दलची माहिती किंवा अनुभव, वैद्यकशास्त्राशी निगडीत लेख, ललित, मुलाखती आणि कथा या साहित्यप्रकारांचे यंदाच्या दिवाळी अंकात स्वागत आहे.

या विषयावर लिहावं तेवढं थोडंच आहे.

चला तर मग, तयारीला लागा आणि येऊद्या उत्तमोत्तम साहित्य.

साहित्य आणि कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियम
मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा

आपल्या काही शंका, प्रश्न सूचना असतील तर संपादक मंडळाशी इथे किंवा sampadak@maayboli.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

कल्पना चांगली आहे पण हे साहीत्य त्या क्षेत्रातल्या तज्ञांनी लिहायचंय का कुणीही ऐकीव माहितीवर आधारित लिहिलेलं चालणार आहे? जे साहित्य येईल त्याची विश्वासार्हता कोण बघणार?

जे साहित्य येईल त्याची विश्वासार्हता कोण बघणार? >>> मला पण हाच प्रश्न पडला.

दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. विशेषतः भाव-भावना-इमोशन्स असं काही नाही. प्रॅक्टिकल आहेत दोन्ही विषय.

यात एखाद्या रोगा/स्थितीसोबत जगण्याचा किंवा अशांच्या केअरगिव्हर्सचा अनुभव अशासारखं काही ललित सदरात येऊ शकेल का? की केवळ माहितीपरच लिहायचं आहे?

डॉक्टर, परिचारक, संशोधक, अ‍ॅलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टिक अशा पर्यायी उपचार पद्धती आणि यांसारखे अनेक पैलू आपल्याला उलगडायचे आहेत >>

संयोजक मग, होमिओपथी औषधशास्त्र आहे की नाही असा परिसंवाद परत असणार का? ( प्लिज ठेवा हो Happy

Lol

माबो डॉक लिहा की.. साती,इब्लिस असं नाही करायच...
इब्लिस .. स्माईली सहीच Lol

संकल्पना चांगली आहे. वर मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे अजून थोडे सविस्तर सांगितले तर बरे पडेल.

गंगाधर मुटे लिहितील काय?

अरे वा! एकदमच निराळी आणि छान संकल्पना. Happy

पण, नताशा, सिंडरेला प्रमाणेच मलाही प्रश्न पडला -

ऐकीव आणि विश्वासार्ह माहिती यांच्यात फरक कसा करणार? आणि यांचा मेळ कसा घालणार?

उत्सुकता आहे. पण मॉडर्न मेडिसिन, घरगुती औषधं यांवर वाचायला आवडेल. 'फॅमिली डॉक्टर' टाईप (सिद्धकेलेल्या वटी, काढा, चुर्ण, धुरी अणि पिचू अशी औषधं असलेली Happy ) लेख येउ नयेत ही अपेक्षा.

विंचु सर्प दंशावरील इत्यादी गावठी उपचार चालतील का ? एकदम मंत्रबिंत्र मारुन लिंबुमिर्ची लटकवुन..हवे तर मंत्रांसकट लिहावे

<<<डॉक्टर, परिचारक, संशोधक, अ‍ॅलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टि>>>>> ह्यातिल कुणिच नाही पण अनुभव लिहु शकतो का? उदा ..... medical counselling

साती, इब्लिस यांनी आधीच शस्त्र ठेवली? मला वाटलं त्यांचे लेख नक्की येणार ही खात्री करूनच संमंने ही संकल्पना राबवली असेल Proud Light 1

वेगळी आहे संकल्पना. त्यावर आलेले साहित्य वाचायला आवडेल.

'वैद्यकशास्त्र' या विषयाशी संबंधित विषयांची माहिती व्हावी आणि या माहितीचा प्रसार व्हावा, या उद्देशानंच केवळ आपल्या दिवाळी अंकाच्या विशेष विभागासाठी या विषयाची निवड केली आहे. या विभागातील लेखन दर्जेदार असावं, यासाठी संपादक मंडळ प्रयत्नशील असेलच, मात्र लेखांत मांडल्या गेलेल्या मुद्द्यांशी संपादक मंडळ सहमत असेलच, असं नाही. दिवाळी अंकातील लेखांतल्या माहितीचा वापर वाचकांनी विवेकानं आणि आपापल्या जबाबदारीवर करावा, अशी अपेक्षा आहे.

या विभागात केवळ माहितीपर लेखच नाही तर अनुभववांवर आधारित लेखनाचेही स्वागत आहे.

<<<डॉक्टर, परिचारक, संशोधक, अ‍ॅलोपथी, होमिओपथी, आयुर्वेद, फिजिओथेरपी, कायरोप्रॅक्टि>>>>> ह्यातिल कुणिच नाही पण अनुभव लिहु शकतो का? उदा ..... medical counselling
>> सुहास्य, हो. तुमच्या अनुभवांवर आधारलेल्या लेखनप्रकारांचे स्वागत आहे.

१९१३ साली क्षयरोगावरील संशोधनासाठी मेडिकल रिसर्च कौन्सिलची स्थापना झाली.>>>> कोणत्या मेडिकल रिसर्च कौन्सिलची स्थापना झाली? जागतिक की एखाद्या देशातील?

साती/इब्लिस, काय हे? लिहा, लिहा.

Chaan saMkalpana
यात एखाद्या रोगा/स्थितीसोबत जगण्याचा किंवा अशांच्या केअरगिव्हर्सचा अनुभव अशासारखं काही ललित सदरात येऊ शकेल का? की केवळ माहितीपरच लिहायचं आहे?
maraaTheeta kaa naahee lihitaa yete achaanak?

यात एखाद्या रोगा/स्थितीसोबत जगण्याचा किंवा अशांच्या केअरगिव्हर्सचा अनुभव अशासारखं काही ललित सदरात येऊ शकेल का? की केवळ माहितीपरच लिहायचं आहे?
<<<

हो, अनुभव ललित सदरात येऊ शकतील.