आधुनिक सीता - १०

Submitted by वेल on 25 September, 2013 - 12:29

ही मी लिहिलेली पहिलीच कथा. कथा मोठी आहे म्हणून क्रमशः टाकली आहे.

२०१२च्या कालनिर्णय ह्या दिवाळी अंकात डॉ अरविंद संगमनेरकर ह्यांची एक कथा वाचली होती. "ती पुन्हा दिसलीच नाही." ते कथानक वापरून मी ही कथा पुढे चालवली आहे. ती कथा कथानायकाने अनुभवलेली सांगितलेली .. ही कथा कथानायिकेने अनुभवलेली सांगितलेली... माझ्या कथेसाठी मूळ कथानकात काही बदल मी केले आहेत.

भाग ५ - http://www.maayboli.com/node/45139
भाग ६ - http://www.maayboli.com/node/45250
भाग ७ - http://www.maayboli.com/node/45278
भाग ८ - http://www.maayboli.com/node/45392
भाग ९ - http://www.maayboli.com/node/45427

ह्या भागापासून पूर्णपणे मी लिहिलेली कथा सुरू होत आहे.

***************************************************

"आता ऐक. तू गेले आठ तास बेशुद्ध होतीस. आणि सागर तुला माझ्याकडे सोडून पुण्याला परत गेला आहेस."
"क्काय? कस शक्य आहे हे? काय मस्करी चालू आहे, सागरला बोलवा, मला जाऊ द्या."
"मी काय बोलतो आहे, शांतपणे ऐक."
"हे बघा मला तुमचं काहिही ऐकायचं नाहिये, मला सागरकडे परत जायचं आहे. "
"सरिता, सागर पुण्याला परत गेलाय. हे बघ त्याचं तिकिट." आणि रफिकने मला सागर्च्या तिकिटाची फोटोकॉपी दाखवली.
"काय मस्करी करताय हो तुम्ही आमची, सागर माझं तिकिट बुक करणार होता, मी जाणार होते पुण्याला परत. मला सोडून तो कसा जाईल तो."
"हा हा हा. तू सागरला ओळखलं नाहीस म्हणजे. काय सुंदर अभिनय करतो हा माझा मित्र."
"अहो काय बोलताय तुम्ही. प्लीज मला जाउद्या ना सागरकडे."
"सरिता, तुला समजत नाहिये का. सागर तुला माझ्याकडे सोडून, माझ्याकडची नोकरी सोडून, माझ्याकडून पन्नास लाख रुपये घेऊन परत गेलाय पुण्याला. तुला विकलय त्याने मला."
"असं कसं करेल तो. मी बायको आहे त्याची. लग्न केलय त्याने माझ्याशी. असं कसं वागेल तो? अस परत गेला तर पोलिस तुरुंगात तकतील त्याला. आणि तो मुळात असा नाहीच आहे. खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर."
" हा तुझा गैरसमज आहे. त्याचं तुझ्यावर प्रेम वगैरे काही नाहिये. त्याने तुझ्याशी लग्न केलं ते तू सुनीतासारखी दिसतेस म्हणून. मी त्याला सांगितलं होतं सुनीताला परत आण, नाहीतर तिच्यासारख्या दिसणार्‍या इतर कोणाला तरी. सुनीता नाही सापडली त्याला. पण तिच्यासारखी दिसणारी तू मिळालीस. म्हणूनच त्याने तुझ्याशी लग्न केलं आणि आता माझ्याकडे सोडून परत गेलाय. आणि पोलीसांबद्दल म्हणशील तर ते पन्नास लाख म्हणून तर दिलेत त्याला, पोलीसांना मॅनॅज करायला. तुला काय वाटलं त्याला असंच वार्‍यावर सोडून देईन मी? अरे त्याने तुला आणलं माझ्याकडे. हे बघ पन्नस लाख ट्रान्सफर केल्याची बँकेची पावती."
मला धक्काच बसला. मी रफिकच्या चेहर्‍याकडे पाहात बसले. फातिमा माझ्याजवळ आली आणि तिने माझ्या खांद्यावर थोपटले, मला कळत नव्हतं मला राग आलाय का दु:ख झालय. मी अगदी ब्लँक झाले होते. विषण्णपणे बसून होते. मी ज्याला सर्वस्व मानलं ज्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला तो, तोच मला सोडून, नव्हे विकून परत गेला?
रफिकने बेल वाजवली. मगासची डॉक्टर परत आली. तिने मला इंजेक्शन दिलं. मी कसलाही प्रतिकार केला नाही. फातिमा माझ्या जवळच बसून होती. रफिक देखील शेजारीच होता.

काय मिळणार होतं प्रतिकार करून. माझी इथून सुटका होणार नव्हती, रफिकच्या आवाजावरून, बोलण्यावरून तेवढं कळलं होतं मला. माझा सागर मला परत मिळणार नव्हता. पण सागरच मला इथे सोडून गेला होता ना. मग तर मला इथेच राहायला लागणार होतं, सागर असा का वागला? पन्नास लाखासाठी त्याने मला विकल? माझा माझ्या घरच्यांचा, स्वतःच्या घरच्यांचा, दोघांच्या आज्यांचा कोणाचाच कसा विचार केला नाही त्याने? आजी आणि त्याची आजी मैत्रिणी होत्या तरीही? का तेही खोटंच. पण आज्यांची मैत्री कशी खोटी असेल. अगदी आजीच्या लहान्पणीच्या गोष्टी कशा शोधता येतील किंवा प्रीटेण्ड करता येतील? सागर खरंच असा वागला होता का ? का रफिक खोटं बोलत होता? त्याने जबरदस्तीने तर मला इथे अडकवलं नसेल ना? मग सागरला देखील अडकवलं असेल का? की त्याला सोडून दिलं असेल? सागरला सोडून दिलं असेल तर तो मला सोडवायला येईल न नक्की? रामानेदेखील स्वतःच्या पत्नीला सोडवायला रावणाशी युद्ध केलं होतं. माझ्यात सीतेची पतिव्रता आहे का? माझा राम मला सोडवायला येईल का? मुळात मी जसा विचार करते आहे तसं झालंय का काही वेगळं अरे देवा, सागरच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना? पण सागर तर रफिकचा जिवलग मित्र होता ना? मग तो जिवलग मित्राला काही कसं करेल? मग जिवलग मित्राच्या बायकोला असं डांबून ठेवणं तरी योग्य होतं का? बायकांच्या बाबतीत योग्य काय आणी अयोग्य काय. हा माणूस भारतीय थोडाच होता, इतका विचार करायला? आणी आजकाल भारतीय तरी कुठे मूल्य पाळत आहेत? हा तर अरब, ह्यांच्या संस्कृतीत बायकांना एखाद्या वस्तू इतकीच किम्मत. मी काय मूर्खपणा केला इथे येऊन. नसते आले तर किती बर झालं असतं मूळात पहिल्यांदा माझ्या मनाने दिलेला कौल इथे राहणार्‍या मुलाशी लग्न नको. पट्वर्धन काकांनी फोर्स केल म्हणून हे सगळं घडून आलं. ह्या सगळ्या प्लान मध्ये तेसुद्धा सहभागी असतील का? कस शक्य आहे. ते तर मला त्यांच्या सुमीसारखी मानतात. मग ... कमीत कमी, मुंबईत असताना माझं मन मला सांगत होतं - विचारत होतं काय गरज आहे जायची? नाही गेलीस तर नाही चालणार का, ते जरी ऐकलं असत तर? पण ह्या जर तरला काय अर्थ आहे, आता जे व्हायचं ते होऊन गेलं आता हा विचार करून कालचक्र मागे फिरवता येणार नाही. पण मग पुढे काय. अंधार, फक्त अंधार...
आणि अशा विचारांच्या आवर्तात मी कधी झोपी गेले मला कळलंच नाही.

क्रमशः

पुढचा भाग - http://www.maayboli.com/node/45524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.

please

केव्हापासुन वाचायची होती ही कथा. शेवटी आज सुरुवात केली. १० भाग पटकन वाचुन झाले. मस्त लिहिली आहे. बापरे! असेच झाले.