द लंचबॉक्स आणि शिप ऑफ थिसस च्या निमित्ताने...

Submitted by बुन्नु on 24 September, 2013 - 03:51

नमस्कार,

नुकताच द लंचबॉक्स, आणि काहि दिवसा पुर्वि येउन गेलेला 'द शिप ऑफ थिसस', या दोन हि चित्रपटांमधला समान धागा म्हणजे प्रयोगशिलता, आणि संबधित निर्देशकाच्या त्या पहिल्याच कलाकृति आहेत.

रितेश बत्रा (द लंचबॉक्स) आणि आनंद गांधि (शिप ऑफ थिसस) हे दोघेहि नव्या पिढिचे नेत्रुत्व करणारे निर्देशक. दोघांच्याहि कलाकृति बाहेरच्या चित्रपट मोहोत्सवात कौतुकास्पद ठरलेल्या, आणि समिक्षकांच्या पसंतीस उतरेल्या, ग्रिक तत्व्वेत्ता प्लुटार्क ह्याच्या फिलोसॉफिकल पॅराडॉक्स वर आधारित 'द शिप ऑफ थिसस' हा तर प्रयोगशिलतेच्या बाबतीत लंचबॉक्स च्या हि पुढचं पाउलंच ठरावं.

पण प्रश्न असा पडतो की, अश्या चित्रपटांना मिळणारा जेमतेम प्रतिसाद, तिकिट खिडकि वरच्या गणितामुळे असे चित्रपट वितरण करणे, प्रदर्शित करणे खरेच हिंमतिचे काम आहे. लंचबॉक्स चि जमेची बाजु म्हणजे ईरफान खान, नवाजुद्दिन सारखे अंतरराष्ट्रिय ख्यातिचे कलाकार, पण 'द शिप ऑफ थिसस' च्या बाबतित तेहि नाही. असे चित्रपट आपल्या सारख्या जन सामान्यांना पहायला मिळावा म्हणुन आमिर खान चि पत्नि किरण राव हिचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

पण, मला लंचबॉक्स च्या वेळी आलेला अनुभव फारसा चांगला नाही, तशी गर्दी तरुण लोकांचीच होति पण
चित्रपट सुरु होउन १ तास होत नाहि तोच, अचकट विचकट विनोद, काहिंनी शिव्या देउन आमचे तिकिटाचे पैसे वाया गेल्याचा निषेध नोंदवायचा अधिकार गाजवला, पण ईतर प्रेक्षकांना चित्रपटाचा आस्वाद घेउ देण्याचा उदार पणा या सभ्य (?) मंडळि जवळ नव्हता..

आता पुढे प्रश्न हा पडतो हि मंडळि नेमक्या काय अपेक्षा घेउन आलेलि होती? लंचबॉक्स च्या जाहिराति मधे अश्लिलता, मारधाड, आयटम साँग, सुंदर अभिनेत्रि, विनोदाचे फवारे, या मधिल एकही दावा केलेला नव्हता. अश्या अपेक्षा असणार्यांसाठि बाजुला ईतर हि चित्रपट होते (फटा पोस्टर.., ग्रँड मस्ती). असे असतांनाही या मंडळींची अशी कोणती अगतिकता त्यांना लंचबॉक्स ला घेउन आली होती? किंवा या लोकांकडे ईतका जास्त पॅसा आहे कि ते अश्या प्रकारे वाया घालवु शकतात?

आपली हि मानसिकता बदलणार का? कि अश्या लोकांमुळे मुठ्भर रसिक प्रेक्षकां ना निखळ करमणुकीला कायमच मुकावे लागणार?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात फिल्म करण्यामागचा हेतू बितूने काहीही फरक पडत नाही हो. >> पडतो, पडतो जरुर पड्तो..

सगळेच लोक अशी नफ्या तोट्याची गणित मांडत नसतात, यामुळेच काही लोक देशोधडी ला लागल्याचि उदाहरण प्रत्येक क्षेत्रात आहेत. चित्रपट सृष्टिचे जनक दादासाहेब फाळके यांनिही नफ्या तोट्याचा विचार केला असता तर आपल्या सारख्या पर्यंत हे माध्यम पोहोचलेच नसते. त्यामुळे समाज प्रबोधनासाठि असा धोका पत्करणारे ध्येयवेडे कमी नाहित (आणि हो चांगल्या आर्ट ला भारताबाहेर चिक्कार मागणी असते, त्यामुळे धोका कमी होतोच) . आणि १०० करोड च्या जमान्यात २.५ करोड म्हणजे खरचं काहिच नाहित.

आणि हो नवख्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला कोण तयार होणार? त्यामुळे आर्ट फिल्म्स या फक्त प्रयोग या एकाच दृष्टिकोनातुन बनवलेले असतात. जोपर्यत भारतियांचा आर्ट फिल्म्स बद्द्ल दृष्टीकोन बद्लत नाहि तो पर्यंत त्या ड्ब्ब्यातच जाणार..

याआधी २-३ वेळी सिनेमा बघताना हा अनुभव आलाय. प्रत्येकवेळी आरडाओरडा करणारे रिकामचोट मराठी तरुण होते. टिपिकल गळ्यात्-हातात सोन्याच्या चेन्स वाले. (आलं ना लक्षात?) फुकट पैसा आहे तर घालवायला आलेले.
त्यामुळे सध्या मल्टिप्लेक्सला तरी असा १०-१२ मराठी मुलांचा ग्रुप दिसला की मला आधीच लक्षात येते की आज काही खरं नाही.

इथे वाचून मी लंचबॉक्स बघायला गेले तेव्हा आधीच विचारलं की लोकांना दंगा केला तर काय करायचं? कारण असा १०-१२ तरुणांचा ग्रुप प्रवेश करतानाच दिसला. तेव्हा हे उत्तर मिळालं- हॉलमध्ये लोक फार दंगा करायला लागले तर डोअरकिपरला तक्रार करा. ते मॅनेजरला बोलवून पुढची कारवाई करतील.

नवरा म्हणाला की तुला असं का वाटतंय की ते त्रास देतील? मी म्हटलं राश्ट्रगीत झाल्यावर आरडाओरडा, "भारत माता की जय" चालु करतात की नाही, ते बघ. अन तसंच झालं. पण त्यांच्या अन माझ्या नशीबाने सिनेमात कमेंट्स मारण्यासारखं काही नव्हतं. त्यामुळे त्यांना जास्त गोंधळ घालता आला नाही अन मला तक्रार करायची वेळ आली नाही.

मी पीव्हीआर अमनोरा मध्ये बघितला.

विशेष निरिक्षण: पुण्यात तरी सध्या अशा मराठी मुलांची कमी नाही अन जमेल तिथे हुल्लडबाजी करण्याशिवाय त्यांना काही येत नाही. त्यामुळे बाकी लोकांत मराठी लोकांची इमेज खराब होतेय. हे "मी मराठी माणुस" वाल्यांना अभिमानास्पद वाटतं की लज्जास्पद?

सर्वप्रथम आधीच्या प्रतिसादातल्या स्पॉयलरसाठी मनापासुन क्षमा मागते.

पुण्यात तरी सध्या अशा मराठी मुलांची कमी नाही अन जमेल तिथे हुल्लडबाजी करण्याशिवाय त्यांना काही येत नाही. त्यामुळे बाकी लोकांत मराठी लोकांची इमेज खराब होतेय. हे "मी मराठी माणुस" वाल्यांना अभिमानास्पद वाटतं की लज्जास्पद?

>> ती मुलं अशी आहेत हे लज्जास्पद आहे यात वादच नाही. पण ती मराठीच असतील असं नाही. "टपोरी" ही एक नवीन जमात उदयाला आली आहे सध्या.. तिला जात, धर्म, प्रांत, भाषा यांचे वावडे नाही. तुम्ही पुण्यात होतात म्हणुन कदाचित मराठी मुलं जास्त दिसली.

हेच मुंबई आणि उपनगरांमध्ये सर्व जातीधर्माची मुले दिसतील या कॅटेगरीतील..

द लंचबॉक्स विषयी -

मला स्वतःला तरी हा डब्बा चित्रपट अजिबात आवडला नाही. फारच सुमार आणि अतर्क्य वाटला. ईलाने कधीच ओढणी न परिधान करण्याचे कारणही कळले नाही. एकीकडे नॉनग्लॅमरस भुमिका म्हणायचे आणि दुसरीकडे शरीराला घट्ट बसणारे व खोल गळा असणारे कमीज घालायचे. एका दृश्यात ती एका अंगावर पहुडलेली असताना तर इतके अश्लील दर्शन होते की या चित्रपटाला कलात्मक / समांतर / नॉन-कमर्शिअल चित्रपट का म्हणावे असा प्रश्न पडला. हे मान्य की आजच्या काळात बनणारे इतर सर्व चित्रपट यापेक्षाही बर्‍याच जास्त प्रमाणात स्त्री-कलाकारांना एक्स्पोज् करतात पण म्हणून या चित्रपटानेही तीच वाट चोखाळावी का? मग याला वेगळा का म्हणावे?

नायिका निम्रत कौर अगदीच माठ वाटते. तिला पाहून तरूणपणच्या अमृता सिंगची आठवण येते. फरक इतकाच की ती रांजण होती.

कथानक तर इतके लहान आणि अतर्क्य आहे की डबा नवर्‍याला न मिळता दुसर्‍या कुणाला तरी मिळतोय हे सलग इतके दिवस कोणी सहन करेल यावर शेंबडे पोरदेखील विश्वास ठेवणार नाही. तसेच रोज बटाटा-फुलकोबीची भाजी डब्यात दिली तर नवरा बायकोत भांडणे होणार नाहीत का?

भारती आचरेकरांचा मधून मधून कानावर पडणारा आवाज नकोसा वाटतो. तसेच डब्यातील अन्नाबद्दल आभार प्रदर्शन न करता उलट जास्त मीठ टाकल्याची तक्रार आली म्हणून दुसर्‍या दिवशी डब्यातील अन्न तिखट बनविण्याचा सल्ला देखील पटत नाही.

भारतातील शाळकरी वयातील मुले आजही मोठ्या माणसांना काका / चाचा / अंकल असे संबोधतात. असे असताना परदेशी पद्धतीप्रमाणे या चित्रपटातील लहान मुले मिस्टर फर्नांडिस असे संबोधताना का दाखवावीत? अर्थात भारताबाहेर राहणार्‍यांनी भारतीय समाजजीवनावर आधारित कथानक असलेले चित्रपट दाखविले की अशी गल्लत होणारच.

इतके असूनही चित्रपट सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहू शकलो कारण चित्रपटाच्या या काही जमेच्या बाजू:-

  1. प्रथम क्रमांकावर अर्थातच इरफान आणि नवाजुद्दीन यांचा सहजसुंदर अभिनय.
  2. अब तक छपन्न फेम नकुल वैदचं बर्‍याच कालावधीनंतर पडद्यावरील दर्शन.
  3. मुंबईतील जनजीवनाच सुखद चित्रीकरण.
  4. कार्यालयातील वास्तवदर्शी वातावरण.
  5. नवाजुद्दीनचे अनाथ असणे, त्याची प्रेमकहाणी, त्याच्या विवाहात त्याच्यातर्फे ईरफानने उपस्थित राहावे म्हणून त्याने केलेली विनंती आणि प्रत्यक्षात तो प्रसंग व त्यावेळी काढलेले छायाचित्रे हे सारे फारच हृदयस्पर्शी वाटले.
  6. चित्रपटात गाणी नसणे.

ह्याच्या उलट मला बँग बँग चित्रपट बघताना झालं. तो इतका काही ब्रेनलेस, असंबद्ध आहे कि काही बसवेना. मग एकट्यानेच मनाशी हसत बसले पण मध्यंतरात बाहेर पडले. पब्लिक फार शांततेत बघत होतं आणि त्यांना ती तू तू तू तू मेरा वगिअरे गाणी चक्क आवडत पण होती. नॉट माय टाईप म्हणून आवरते घेतले. Wink

ईलाने कधीच ओढणी न परिधान करण्याचे कारणही कळले नाही. एकीकडे नॉनग्लॅमरस भुमिका म्हणायचे आणि दुसरीकडे शरीराला घट्ट बसणारे व खोल गळा असणारे कमीज घालायचे. एका दृश्यात ती एका अंगावर पहुडलेली असताना तर इतके अश्लील दर्शन होते की या चित्रपटाला कलात्मक / समांतर / नॉन-कमर्शिअल चित्रपट का म्हणावे असा प्रश्न पडला. हे मान्य की आजच्या काळात बनणारे इतर सर्व चित्रपट यापेक्षाही बर्‍याच जास्त प्रमाणात स्त्री-कलाकारांना एक्स्पोज् करतात पण म्हणून या चित्रपटानेही तीच वाट चोखाळावी का? मग याला वेगळा का म्हणावे?>> ती घरात एकटी आहे. तिच्या मानसिक उलघाली कडे लक्ष गेले का? तिची शारिरिक उपासमार होते आहे. तर ती कदाचित पडून त्या बद्दल विचार करत असेल. असे शक्य आहे.

नायिका निम्रत कौर अगदीच माठ वाटते. तिला पाहून तरूणपणच्या अमृता सिंगची आठवण येते. फरक इतकाच की ती रांजण होती.>> तिने फक्त मध्यमवर्गीय स्त्रीची भूमिका केली आहे. एक व्यक्ती म्हणून तिच्या इंटेलिजन्स्चा अंदाज कसा करता येइल. अमृता सिंग बद्दलचे वाक्य डिरोगेटरी आहे. तिची टू स्टेट्स मधील भूमिका पाहिली आहे का?

कथानक तर इतके लहान आणि अतर्क्य आहे की डबा नवर्‍याला न मिळता दुसर्‍या कुणाला तरी मिळतोय हे सलग इतके दिवस कोणी सहन करेल यावर शेंबडे पोरदेखील विश्वास ठेवणार नाही.>> तीच तर गम्मत आहे. यू हॅव मिस्ड द होल पॉइन्ट.

तसेच रोज बटाटा-फुलकोबीची भाजी डब्यात दिली तर नवरा बायकोत भांडणे होणार नाहीत का?
>> दोघांच्यातील संवाद संपला आहे. हे सहज दिसते. भांडण्याइतकाही रस त्या नवर्‍याला राहिलेला नाही तिच्यात.

<< ह्याच्या उलट मला बँग बँग चित्रपट बघताना झालं. तो इतका काही ब्रेनलेस, असंबद्ध आहे कि काही बसवेना. >>

बँग बँग तुम्ही चित्रगृहात जाऊन बघितला? आश्चर्य आहे. मी तर माझ्या भावाने टाटा स्कायवर रेकॉर्ड करून ठेवलेला होता तो सलग अर्धा तास देखील पाहू शकलो नाही. डोके दुखायला लागल्याने नाद सोडून दिला. ते तद्दन व्यावसायिक गल्लाभरू चित्रपट असेच असतात वय वर्षे ७ च्या प्रेक्षकांकरिता बनविलेले. हे वय वर्षे ७ वाले प्रेक्षकच स्वतःबरोबरच हट्टाने आपल्या पालकांनाही चित्रगृहात घेऊन जातात. त्यामुळे खास त्यांची आवडनिवड लक्षात घेऊनच हे चित्रपट अशा प्रकारे बनविले जातात.

कलात्मक चित्रपटांकडून फारच वेगळ्या अपेक्षा असतात.

<<तिने फक्त मध्यमवर्गीय स्त्रीची भूमिका केली आहे. एक व्यक्ती म्हणून तिच्या इंटेलिजन्स्चा अंदाज कसा करता येइल. >>

चेहर्‍यावर अतिशय गोंधळलेले हावभाव होते. बरेचदा चेहरा निर्विकार / कोरा दिसत होता. अशाच वैशिष्ट्यांमुळे अनेकदा (इथे मायबोलीवर सुद्धा) विश्वजीत, भारतभूषण व प्रदीपकुमार आदींना ठोकळा, पुतळा आदी उपाध्यांनी गौरविण्यात येत असते.

<< अमृता सिंग बद्दलचे वाक्य डिरोगेटरी आहे. तिची टू स्टेट्स मधील भूमिका पाहिली आहे का? >>

मी तरूणपणच्या अमृता सिंगच्या अवताराबद्दल लिहीले होते. त्यावेळी तिचा अभिनय, पडद्यावरील वागणे एकूणच अशोभनीय होते. तीन दशके उलटल्यावर आता तिच्या अभिनयात सुधारणा झाली आहे (पाहा - औरंगजेबमधील खलनायिका) पण तशी तर सैफ अली खान, अजय देवगण, अक्षय कुमार अशा अनेकांच्या अभिनयात केवळ दशकभरात झालीच की. प्रॅक्टीस मेक्स मॅन (अ‍ॅन्ड मे बी वुमन ऑल्सो) पर्फेक्ट.

<< तिच्या मानसिक उलघाली कडे लक्ष गेले का? तिची शारिरिक उपासमार होते आहे. तर ती कदाचित पडून त्या बद्दल विचार करत असेल. असे शक्य आहे. >>

या घासून गुळगुळीत झालेल्या विषयावर अनेक फायर ब्रँड चित्रपट निघालेत. या मुद्द्यावर पुन्हा अजुन एक चित्रपट बनविण्यासारखे काय आहे?

द लंच बॉक्स हा माझा आवडता चित्रपट आहे. मी तो घरीच जालावर दोनदा पाहिला.
अशा चित्रपटांचा आनंद आपण घरी बघून छान घेऊ शकतो. अशा अन्य चित्रपटांची यादी सवडीने करेन म्हणतो.

चित्रपट आणि हा धागा दोघेही विस्मृतीत गेले होते. पुन्हा वर आणल्याबद्दल धन्यवाद Happy
अशा अन्य चित्रपटांची यादी सवडीने करेन म्हणतो.>> नक्की आणि इथे पण शेअर करा..

बुन्नू,

नुकतीच आपली वरील चर्चा झाली आणि आज असाच एक ‘घरी शांतपणे पाहायचा’ चित्रपट पाहिला. ‘पती, पत्नी और वो’ या पठडीतला. त्याचे नाव ‘कागज के फूल्स '(fools).

मध्यमवर्गीय लेखकाच्या जीवनातील ताणेबाणे छान रंगवले आहेत. विनय पाठक, मुग्धा गोडसे आणि रायमा सेन या कलाकारांचा सहजसुंदर अभिनय.
छान हलकाफुलका, खुसखुशीत चित्रपट. ‘प्राईम’ वर आहे . जरूर पहावा.

Pages