द लंचबॉक्स आणि शिप ऑफ थिसस च्या निमित्ताने...

Submitted by बुन्नु on 24 September, 2013 - 03:51

नमस्कार,

नुकताच द लंचबॉक्स, आणि काहि दिवसा पुर्वि येउन गेलेला 'द शिप ऑफ थिसस', या दोन हि चित्रपटांमधला समान धागा म्हणजे प्रयोगशिलता, आणि संबधित निर्देशकाच्या त्या पहिल्याच कलाकृति आहेत.

रितेश बत्रा (द लंचबॉक्स) आणि आनंद गांधि (शिप ऑफ थिसस) हे दोघेहि नव्या पिढिचे नेत्रुत्व करणारे निर्देशक. दोघांच्याहि कलाकृति बाहेरच्या चित्रपट मोहोत्सवात कौतुकास्पद ठरलेल्या, आणि समिक्षकांच्या पसंतीस उतरेल्या, ग्रिक तत्व्वेत्ता प्लुटार्क ह्याच्या फिलोसॉफिकल पॅराडॉक्स वर आधारित 'द शिप ऑफ थिसस' हा तर प्रयोगशिलतेच्या बाबतीत लंचबॉक्स च्या हि पुढचं पाउलंच ठरावं.

पण प्रश्न असा पडतो की, अश्या चित्रपटांना मिळणारा जेमतेम प्रतिसाद, तिकिट खिडकि वरच्या गणितामुळे असे चित्रपट वितरण करणे, प्रदर्शित करणे खरेच हिंमतिचे काम आहे. लंचबॉक्स चि जमेची बाजु म्हणजे ईरफान खान, नवाजुद्दिन सारखे अंतरराष्ट्रिय ख्यातिचे कलाकार, पण 'द शिप ऑफ थिसस' च्या बाबतित तेहि नाही. असे चित्रपट आपल्या सारख्या जन सामान्यांना पहायला मिळावा म्हणुन आमिर खान चि पत्नि किरण राव हिचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.

पण, मला लंचबॉक्स च्या वेळी आलेला अनुभव फारसा चांगला नाही, तशी गर्दी तरुण लोकांचीच होति पण
चित्रपट सुरु होउन १ तास होत नाहि तोच, अचकट विचकट विनोद, काहिंनी शिव्या देउन आमचे तिकिटाचे पैसे वाया गेल्याचा निषेध नोंदवायचा अधिकार गाजवला, पण ईतर प्रेक्षकांना चित्रपटाचा आस्वाद घेउ देण्याचा उदार पणा या सभ्य (?) मंडळि जवळ नव्हता..

आता पुढे प्रश्न हा पडतो हि मंडळि नेमक्या काय अपेक्षा घेउन आलेलि होती? लंचबॉक्स च्या जाहिराति मधे अश्लिलता, मारधाड, आयटम साँग, सुंदर अभिनेत्रि, विनोदाचे फवारे, या मधिल एकही दावा केलेला नव्हता. अश्या अपेक्षा असणार्यांसाठि बाजुला ईतर हि चित्रपट होते (फटा पोस्टर.., ग्रँड मस्ती). असे असतांनाही या मंडळींची अशी कोणती अगतिकता त्यांना लंचबॉक्स ला घेउन आली होती? किंवा या लोकांकडे ईतका जास्त पॅसा आहे कि ते अश्या प्रकारे वाया घालवु शकतात?

आपली हि मानसिकता बदलणार का? कि अश्या लोकांमुळे मुठ्भर रसिक प्रेक्षकां ना निखळ करमणुकीला कायमच मुकावे लागणार?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे वॉशिंग्टन ग्रुपमध्ये चुकुन घुसलं कि काय? असो.

असे चित्रपट थिएटरपेक्षा इंटरनेटवर आणि डीव्हीडीच्याच माध्यमातुन असावे का? जेणेकरुन सगळ्या रसिकांना(च) आस्वाद घेता येईल. Happy

खरोखरी विचार करायला लागेल अशीच परिस्थिती अशा अभिजात चित्रपट निर्मितीबद्दल झाली आहे. एनएफडीसी आणि तत्सम संस्था अशा होतकरू निर्माता दिग्दर्शकाला अनोख्या कथानकावर निर्माण होऊ शकणार्‍या चित्रपटांना आवश्यक तो वित्तपुरवठा जरूर करते; पण मुंबई पुणे अशी दोनतीन मेट्रो सिटीज् वजा करता कुठे प्रदर्शित होत असतात 'लंच बॉक्स' आणि "शिप ऑफ थीसस" सारख्या कलाकृती. लंच बॉक्स निदान इरफान आणि निम्रत कौरमुळे पाहाण्याची उर्मी तर निर्माण झाली....आणि पाहिला त्यावेळी समजले की सिद्धीकीसारखा आणखीन् एक अष्टपैलू कलाकार त्यात आहे....चित्रपट खूप पसंतही पडला, तरीही हे शल्य मनी आहेच की अशा चित्रपटांना कोल्हापूर-सांगली-सातारा अशा धर्तीच्या मराठमोळ्या शहरात एकही थिएटर मिळू शकत नाही....वितरण व्यवस्था इतक्या दरिद्री अवस्थेत असणे हे एक कारण.

मनिष यानी प्रेक्षकांच्या मानसिकतेचा उल्लेख केला आहे; पण मला वाटते इन्फ्रास्ट्रक्चरवरही विचार करणे आवश्यक आहे. जिथे मूलभूत सोयीच त्या त्या शहरात उपलब्ध नाहीत त्या ठिकाणांच्या रसिक प्रेक्षकांच्या मानसिकतेचा प्रश्न उभा राहू शकत नाही.

दमदार जाहिरातबाजीचा अभाव हे आणखीन् एक कारण आहेच.

अशोक पाटील

हे वॉशिंग्टन ग्रुपमध्ये चुकुन घुसलं कि काय? >> होय, पहिल्यांदाच लेखन करत असल्याने, तो ललित लेखना कसा हलवायचा? माहिति मिळेल काय?

पण मला वाटते इन्फ्रास्ट्रक्चरवरही विचार करणे आवश्यक आहे. जिथे मूलभूत सोयीच त्या त्या शहरात उपलब्ध नाहीत त्या ठिकाणांच्या रसिक प्रेक्षकांच्या मानसिकतेचा प्रश्न उभा राहू शकत नाही?>>
अशोक जी, मि जो प्रंसग वर्णन केलेला आहे तो मुंबई जवळच्या एका सुप्रसिध्द मल्टिप्लेक्स मधला आहे..

ही परिस्थिती सर्वत्र आहे. केवळ 'लंचबॉक्स' किंवा 'शिप ऑफ थिसियस' याच चित्रपटांच्या बाबतीत हे घडत नाही.
अर्थात हा रसभंग केवळ थेटरातच होतो असं नाही.
आंतरजालावर परीक्षण म्हणून संपूर्ण चित्रपटाची स्टोरी लिहिणे, किंवा 'शुद्ध देसी रोमांस' किंवा 'लंचबॉक्स'चा शेवट कसा आहे, हे प्रतिसादात लिहून टाकणे, याची बरोबरी थेटरातल्या हुल्लडबाजीशी करता येईल.

आंतरजालावर परीक्षण म्हणून संपूर्ण चित्रपटाची स्टोरी लिहिणे, किंवा 'शुद्ध देसी रोमांस' किंवा 'लंचबॉक्स'चा शेवट कसा आहे, हे प्रतिसादात लिहून टाकणे, याची बरोबरी थेटरातल्या हुल्लडबाजीशी करता येईल.>>>>>>>>>>

हसुन हसुन पोट दुखलं की....ऑनलाईन हुल्लडबाजी Happy

दमदार जाहिरातबाजीचा अभाव हे आणखीन् एक कारण आहेच.>>>> अगदी योग्य कारण... किरण राव (निर्माती ?) असुनही जाहीरातीत कमी का असावी की लोकं बघणार नाही म्हणुन पैसे वाचवले म्हणावे ?

ज्या विभाग लेखन करायचे आहे तो आधी जॉईन करा. मग या लेखावर येउन संपादन वर क्लिक करा. सर्वात खाली तुम्हाला ग्रूप्स दिसतील, तिथे सिलेक्ट करा.

सेव्ह करा... झालं. Happy

'शिप ऑफ थिसियस'चं उत्तम मार्केटिंग केलं गेलं, आणि चित्रपटानं पैसाही चांगला कमावला. मुंबई-पुणे-दिल्ली येथे पाचसहा आठवडे होता.
जाहिरातबाजी करून प्रेक्षकांना सुसंस्कृत करता येत नाही. मुळात आपण इतर पैसे देऊन आलेल्या प्रेक्षकांचा रसभंग करत आहोत, ही जाणीव असली पाहिजे. अचकटविचकट कमेंटा या 'भाग मिल्खा भाग', 'लुटेरा' यांच्या वाट्यालाही येतात.

चिनूक्स.....आय अ‍ॅग्री वुईथ यू....बट अपटू अ सर्टन एक्स्टेन्ट.

लंचबॉक्ससारख्या चित्रपटाचा शेवट कसा असू शकेल याबद्दल फार ताणलेली उत्सुकता प्रेक्षकाच्या मनी असत नाही.... हाही 'रजनीगंधा' सम एक चित्रपट समजू या.... त्यातील नायिका दीपा कितीही नवीनसमवेत फिरली तरी ती शेवटी संजय ह्यालाच आपला मानणार हे चित्रपट सुरू होण्यापूर्वीही तुमच्यामाझ्यासारख्या प्रेक्षकाला समजलेले असते, त्यामुळे त्या चित्रपटाची रंगत तसूभरही कमी होत नाही. लंचबॉक्सचा शेवट अधांतरी ठेवण्यात रितेश बात्रा याना जे यश आले आहे ते काही कोडे नसून मानवी जीवनातील एक अपरिहार्यता असून साजन आणि ईलाने ती स्वीकारली आहे.....समाजात अशी कित्येक उदाहरणे नित्यदिनी पाहायला मिळतातच.

रसभंगाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास आमीर करीनाच्या 'तलाश' चे देता येईल....यातील कथा सर्व रुपात सांगणे म्हणजे नक्कीच रसभंग केल्याचा तो एक प्रकार ठरू शकतो.

अशोक.,
एकानं चित्रपट पाहिला म्हणजे सर्वांनीच पाहिला असं नाही. आंतरजालावर चित्रपटाबद्दल लिहिताना शेवट लिहिल्यानं रंगत कमी होत नाही, हा निर्णय इतरांच्या वतीनं घेण्यात हशील नाही. Happy

सिनेमा थिएटरच्या बाहेर नावाजलेल्या समीक्षकांच्या प्रतिक्रिया लावल्या पाहिजेत. त्या वाचून चित्रपट बघायचा कि नाही ते या प्रेक्षकांना ठरवता येईल.

दिनेश.....असे होऊ शकणार नाही कदाचित....कारण थिएटर परिसरात अमुक एका चित्रपटाच्या संदर्भात काही प्रकाशित करायचे असल्यास त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची लेखी परवानगी घ्यावी लागते.....ही बाब वितरकांनी फार वर्षापूर्वी कोर्टाकडून मंजूर करून घेतली आहे.

तुम्हाला बी.आर.इशारा यांचा १९६९-७० चा 'चेतना' चित्रपट आठवतोय ?...रेहाना सुलताना त्यात होती....आजच्या व्याख्येत त्याला कुणी 'ए' ग्रेडचा चित्रपट समजणारही नाही इतकी सौम्य लैंगिक सूचकता त्यात होती. वेश्येच्या जीवनावर चित्रपट असल्याने आमच्या शहरातील रोटरी महिला वर्गाने त्याचा निषेध म्हणून व्हीनस टॉकीजच्या बाहेर आणि खुद्द भिंतीवर काही पोस्टर्स लावून येणार्‍या प्रेक्षकांना नैतिकतेचे पाठ देण्याचा प्रयत्न केला होता....ही बाब प्रथम पोलिस आणि मग जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत गेली. स्थानिक वितरकांनी मग मुंबईहून 'सेन्सॉर बोर्डाने मंजूर केलेल्या चित्रपटाविरूद्ध अशी जाहिरातबाजी करता येणार नाही' अशा आशयाची ऑर्डर आणली आणि ती रोटरी सदस्यांना दाखविल्यावर तो प्रकार बंद झाला.

त्या अनुषंगाने बाजूने वा विरूद्ध परीक्षणाबाबतीतही नक्कीच होणार.

[अर्थात तुम्ही वर जी प्रतिक्रिया दिली आहे ती खेळकरपणाने दिली असेल तर मग माझ्या प्रतिसादाची गरजच नाही...तरीही त्या निमित्ताने 'चेतना' प्रकरण आठवले म्हणून लिहिले आहे.]

अशोक पाटील

मुळात चित्रपटांसाठी जी प्रसिद्धी माध्यमे प्रामुख्याने वापरली जातात त्यातच त्या चित्रपटाची रूपरेखा दिली जाते. (त्रयस्थ वा न्यूट्रल मत नोंदवणे हे एक समीक्षक म्हणून फार गरजेचे) अर्थात यातही व्यक्तीपरत्वे आवडनिवड मतमतांतर असू शकतेच... त्याची कारणेही वेगवेगळी असू शकतात.

मुळात लंच बॉक्स सारखे चित्रपट हे सर्वसामान्य अशा मोठ्या क्राऊडसाठी नसतात. तरीही मल्टीप्लेक्सला ग्रूपने चिलआऊट करायला येणे, पॉपकॉर्न्स, समोसे, सँडविचेस, कोक यांची मजा अनुभवणे यात ती क्रियेटिव्हीटी त्यांच्या काय पचनी पडणार? आणि मग मसाला सिन्स, शिट्ट्या मिळवणारी गाणी, चटपटीत विनोद, चकचकाटी विदेशी पर्यटनस्थळे, डोळे शेकवणारी सौंदर्यस्थळे नसतील तर त्यांना पैसा वसूल नाहीच वाटत... मग कमेंट्स आणि जे खरंच त्या चित्रपटाचा आनंद लुटायला आले आहेत त्यांच्या आनंदाचाही पार विचका!

मनात येऊन जातं कशाला येतात हे, असले चित्रपट पाहायला? आरजे आणि वॄत्तपत्रांद्वारे त्रोटक समीक्षण देऊन कोणी पाहावा, का पाहावा, का टाळावा इतकं स्पष्ट दिलेलं असूनही खरंच का येत असतील असे लोकं स्वतःचे पैसे आणि वेळ आणि इतरांचा आनंद बरबाद करायला?

रसभंगाचेच उदाहरण घ्यायचे झाल्यास आमीर करीनाच्या 'तलाश' चे देता येईल....>>>>>>>>> +१
अरेरे ,
इतरांनी कसे स्पॉइलर्स दिले याची उदाहरणे देण्याच्या नादात आपणही देतोय याचे भान ठेवावे प्लीजच.>>>>>>>> सॉरी. लक्षात नाही आलं. संपादीत Happy

मलापण तलाश आणि घनचक्कर चे शेवट आधीच सांगितले होते कोणीतरी Sad

"कॉनज्युरींग" बघायला गेलेल्या माझ्या एका मित्राचा अनुभव हॉरीबल होता.
लोकांनी भिती घालवायला म्हणुन म्हणा किंवा अजुन काही.. फार म्हणजे फारच हुल्लड केली होती.

हेच "चेन्नई एक्स्प्रेस"च्या वेळेला एकदम शांतता Sad

अशोक, याची कल्पनाच नव्हती मला.
चेतनाचे पोष्टर आठवतेय ना ! आम्ही ते बघू नये म्हणून पालक फार दक्ष असायचे त्या काळात Happy

एखादी अनोळखी चित्रपट सिडी बघताना मी नेहमीच त्याच्या कव्हरवर असलेली समीक्षकांची मते बघूनच घेतो.

सस्मित आणि पियू परी....

इंग्रजी चित्रपटांतील अशा रहस्याचा भेद करायला टपलेली एक थिल्लर जमात असते थिएटरमध्ये....आणि ही अशी रोगराई टीव्ही इथे अवतरण्यापूर्वीपासून आहे...... तुम्हाला आल्फ्रेड हिचकॉकचा "सायको" हा जगभर गाजलेला चित्रपट आठवतोय ? त्यातील खुनी चित्रपटाच्या शेवटी कळतो, पण आमच्याकडे कोल्हापुरात उमा टॉकीजमध्ये लागलेल्या पहिला खेळ पाहून बाहेर पडणारे काही आगाऊ दर्शक दुसर्‍या खेळाची तिकीटे काडून पाळीत उभे असलेल्यांकडे पाहत त्याना "अहो....तो अमुकतमुक खुनी असतो, बर का !" असे म्हणत तोंड वेंगाडत जात होती. काय करावे असल्या मनोवृत्तीकडे.

'तलाश' चा जालावरील चर्चेचा अनुभवही याच पठडीतील होता.

दिनेश....

होय....'चेतना' चे पोस्टरच खर्‍या अर्थाने पब्लिक डीमांड शो साठी कारणीभूत झाले होते. माझ्या माहितीप्रमाणे 'चेतना' नंतर पुढे राधा सलुजा हिचा 'दो राहा' आणि खुद्द रेहानाच 'दस्तक' निव्वळ त्या अंगप्रदर्शन पोस्टर्समुळेच बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते.

अर्थात या अभिनेत्र्यांची सिने कारकिर्दही याच कारणाने अल्पजिवी ठरली.

अशोक,
दस्तक तर मी टिव्हीवरच बघितला. काटछाट केली असेलही कदाचित पण नंतर त्यापेक्षा भयानक भाषा आणि दृष्य, चित्रपटात येऊ लागली. लता / मदनमोहनने मात्र गाण्यात जीव ओतला होता.
चेतना मधे ते दृष्य नव्हतेच असे पण वाचले होते.

चित्रपट सुरु व्हायच्या आधी धुम्रपान / मोबाईल फोन यासंबंधी ज्या पाट्या दाखवतात तसेच आवाजाबद्दलही दाखवायला हवी. एखाद्या रसिक ग्रुपने इंगा दाखवून प्रोजेक्शन बंद पाडायला हवे. कुठेतरी प्रतिकार होणे गरजेचे आहे.

इतरांनी कसे स्पॉइलर्स दिले याची उदाहरणे देण्याच्या नादात आपणही देतोय याचे भान ठेवावे प्लीजच >>> +१

लेटेस्ट चित्रपट बघण्याच्या बाबतीत शेवटून पहिला नंबर असल्याने मी आजकाल मायबोलीवरील किंवा ब्लॉगजगतातील चित्रपट परीक्षणे वाचणं बंद केलं आहे.

एनएफडीसी आणि तत्सम संस्था अशा होतकरू निर्माता दिग्दर्शकाला अनोख्या कथानकावर निर्माण होऊ शकणार्‍या चित्रपटांना आवश्यक तो वित्तपुरवठा जरूर करते; <<<
काय सांगता? नक्की किती वित्तपुरवठा आवश्यक असतो? आणि किती केला जातो? तो वित्तपुरवठा असतो की निर्मातेपण?
निर्माण केलेल्या चित्रपटाच्या विक्री (बॉक्स ऑफिसवरची तिकिटविक्री नव्हे) व रिलीजची एनएफडिसी जबाबदारी घेते का?

किरण राव (निर्माती ?) असुनही जाहीरातीत कमी का असावी की लोकं बघणार नाही म्हणुन पैसे वाचवले म्हणावे ? <<<
शिप ऑफ थिसियसची जाहिरात कमी केली? त्या फिल्मने रिकव्हरी + प्रॉफिट मिळवला नाही?

इतरांनी कसे स्पॉइलर्स दिले याची उदाहरणे देण्याच्या नादात आपणही देतोय याचे भान ठेवावे प्लीजच.

>> अगं हे चित्रपट येऊन गेले ना कधीच.. असं काय करतेस ?

पियु परी | 24 September, 2013 - 11:26 नवीन
इतरांनी कसे स्पॉइलर्स दिले याची उदाहरणे देण्याच्या नादात आपणही देतोय याचे भान ठेवावे प्लीजच.

>>>>

अग पियु पण मी पाहिला नव्हता आणि बघायच्या लिस्ट मधला होता.
Wink जाने भी दो अभी.

किरण राव हि शिप ऑफ थिसियसची निर्माती नव्हती, तर तिने ति फिल्म एका फेस्टीवल मधे पाहिली आणि तिला आवडल्याने तिने तिची भारतात जाहिरात केली. तिचे नाव जोडले गेल्याने जास्तीत जास्त लोक पाहण्याचा प्रयत्न करतील अशी तिला खात्री होति.

शिप ऑफ थिसियस चे प्रदर्शन हि खुप अनोख्या पध्दतीने झाले, सोशल मिडिया वर आवाहन करुन लोकांचा रिस्पॉन्स बघुन प्रदर्शनाचे ठिकाणं ठरविली गेलि. मला वाटतं ह्या प्रकारे प्रदर्शित झालेला हा भारतात ला पहिलाच सिनेमा असावा.

मी पुण्यात हडपसर च्या अमेनोरा मॉल मधे आइनॉक्स मल्टिप्लेक्स आहे तिथे पाहिला. सगळ्या अलेल्या लोकांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत शांतपणे पाहिला (योग्य जागी हशे पण येत होतेच). कोणाला आवडला नसेल तर ते पिक्चर सोडून गेलेही असतील. पण फालतू कमेंट्स करून बाकिच्यांचा रसभंग तर कोणीच केला नाही. एक जोडप्याचं तान्हुलं रडत होतं मधेच काही वेळ पण ते वेगळं.

मनिष यांचा हा अनुभव वाचून मला बरं वाटतय की आमच्या शो च्या वेळी असं पब्लिक नव्हतं. मूवी छान आहे.

मनिष गैरसमज दुर केल्याबद्दल धन्यवाद.

चित्रपटाच बजेट अंदाजे रु. १२,०००,००० दिलय IMDB वर. पण तितका रिस्पॉन्स मिळाला का? म्हणजे त्या फिल्मने रिकव्हरी + प्रॉफिट मिळवला का ?

शेवटी तेही महत्त्वाचं.

चित्रपटाच बजेट अंदाजे रु. १२,०००,००० दिलय IMDB वर. पण तितका रिस्पॉन्स मिळाला का? म्हणजे त्या फिल्मने रिकव्हरी + प्रॉफिट मिळवला का ?

IMDB ला हा आकडा कुठुन मिळाला माहित नाहि पण, द हिंदु या वृत्तपत्राने दिल्याप्रमाणे ते २.५ करोड आहे. आणि हा आकडा जास्त योग्य हि वाटतो कारण, जास्त बजेट वाढवणार्या गोष्टी जसे, बडे स्टार्स, प्रचंड सेट्स, स्पेशल ईफेक्ट्स, फोरेन लोकेशन यापेकी कहिहि नाहि. फारच काय तर चित्रिकरणासाठि वापरलेला कॅमेरा सुध्दा फार महाग नही तर २ ते ३ लाखाचा आहे.

तर उरला प्रश्न रिकव्हरी + प्रॉफिट चा, तर तो मुद्दा शिप ऑफ थिसियस च्या बाबतीत लागु होत नाहि. कारण, ह्या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि प्रदर्शन पाहता तो चित्रपट व्यावसायिक द्रुष्टिकोनातुन बनवल्याचे वाटत नाहि. व्यावसायिक चित्रपटांची समिकरणं वेगळी असतात, त्यांचे जाहिरातिचे बजेट हे शिप ऑफ थिसियस च्या बजेटएवढे किंवा त्यापेक्षा जास्त असतात. व्यावसायिक चित्रपटांचा निर्मिति चा खर्च हा बर्याचदा प्रदर्शित होण्याआधिच ओवेर्सिज राईट्स, सॅटेलाईट राईट्स, म्युझिक राईट्स विकुन वसुल झालेला असतो. आजकाल तर दुसर्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा बळजबरिने बदलायला लावणे, अतिप्रचंड प्रमाणात प्रिंट्स काढणे.. थोड्क्यात काय तर सुट्ट्यांच्या दिवसात जनतेला दुसरा पर्यायच न देणे. याचे ताजे उदा. म्हणजे आत्ताच येउन गेलेला चेन्नई एक्सप्रेस.

त्यामुळे, शिप ऑफ थिसियस हा आर्ट सिनेमा विविध अंतरराष्ट्रिय चित्रपट मोहोत्सवांना समोर ठेउनच झालेली असावी असेच वाटते..

चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि प्रदर्शन पाहता तो चित्रपट व्यावसायिक द्रुष्टिकोनातुन बनवल्याचे वाटत नाहि. <<<
समिकरणे काहीही असोत पण उदाहरणार्थ अडीच करोड ही छोटी रक्कम नाही जी फिल्ममेकरच्या खिशात अशीच कोपर्‍यात पडलेली असेल. सेलेबल चेहरा व इतर तथाकथित सेलेबल गोष्टी नसताना अडीच करोड उभे करणे ही सुद्धा खायची गोष्ट नाही. कुठून तरी तो फायनान्स उभा करून जर फिल्म केलेली असेल तर त्याचे रिपेमेंट विथ इंटरेस्ट होण्यासाठी रिकव्हरी + प्रॉफिट हे गरजेचे असते. यात फिल्म करण्यामागचा हेतू बितूने काहीही फरक पडत नाही हो.

Pages