प्रारंभ - हितगुज दिवाळी अंक २०१३

Submitted by संपादक on 23 September, 2013 - 02:39

हितगुज दिवाळी अंक २०१३ प्रकाशित झाला आहे.

Masooda poster.jpg

रसिक मायबोलीकरहो,
नमस्कार!

हितगुज दिवाळी अंक २०१३च्या कार्याचा शुभारंभ करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे. आपल्या मायबोलीवर दर्जेदार साहित्य आणि कलाकृतींनी नटलेला ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याची अनोखी परंपरा गेली तेरा वर्षे अखंड चालू आहे. तो वारसा जपण्यासाठी आणि नेटानं पुढे नेण्यासाठी आम्हांला हवी आहे साथ, तुमची.

यंदाच्या हितगुज दिवाळी अंकात असणार आहेत कथा, लेख, ललित, कविता, हलकंफुलकं साहित्य, अविस्मरणीय आठवणी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या व्यक्तींशी साधलेला संवाद. तसंच, दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीनंच दृक्श्राव्य विभागासाठीही तुमच्या कलाकुसरींचं, रेखाटनांचं, पाककृती सादरीकरणाचं आणि इतर विशेष गुणप्रदर्शनाचं स्वागत आहे!

यंदा आपल्या अंकात मायबोलीकरांच्या लेकरांच्या कलागुणांचा दृक्श्राव्य आविष्कार असावा, असा मानस आहे. आपल्या लेकरांच्या विशेष नैपुण्याचं चित्रीकरण किंवा ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) आम्हांला पाठवा. यासंदर्भात आपण संपादक मंडळाशी सदस्यखात्यातून संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी, ही विनंती.

हितगुज दिवाळी अंक २०१३च्या विशेष संकल्पनांविषयी सविस्तरपणे इथे वाचा-
संकल्पना-१ - वैद्यकशास्त्र
संकल्पना-२ - वेध भविष्याचा

आपले साहित्य आणि कलाकृती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सविस्तर सूचना आणि नियम खाली दिलेले आहेत. तसंच प्रताधिकारांसंबंधित नियम आणि सूचनाही दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचून त्यांचे योग्यप्रकारे पालन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा.

साहित्य पाठवण्याची मुदत आता २० ऑक्टोबर, २०१३पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तर मग आपण आता लेखणी सरसावून... आपलं की-बोर्ड झटकून कामाला लागा कसे!

आपले साहित्याभिलाषी,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१३

साहित्य आणि कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियम
मालकीहक्कांबाबत सूचना आणि नियम

>साहित्य पाठवण्याची मुदत आता १६ ऑक्टोबर, २०१३पर्यंत वाढवण्यात आली आहे.
मायबाप मायबोली... अजून जरा ढील देतासा काय? ऐतवारपतूर? Uhoh
मले बरेच लोक म्हन्ले, वर्शातून एकच चानस गावतो. वाडवून न्हाई का मिळनार?
त्यांच्यासाटी ब्वोलतोय. सोताहसाटी न्हाई काई! Proud
कर्ता का इच्चार??

@आभार्स! Happy

हितगुज दिवाळी अंक २०१३साठी साहित्य आणि कलाकृती पाठवण्याची तारीख आणि वेळ आता संपलेली आहे याची कृपया नोंद घ्यावी.
वेळ कमी असूनही आमच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांना मनःपूर्वक धन्यवाद!

साहित्य स्वीकृतीबाबत सर्व संबंधितांना कळवण्यात येईल.

इंतजारका फल मिठा होता है !
भगवानके घर देर है, अंधेर नही !
देरसे आये दुरुस्त आये !
.......असलं सगळं लिहायच्या तयारीत राहूंया !!!!! Wink

संपादक, काही तांत्रिक अथवा इतर अडचनी असतील तर आम्ही समजू शकतो, पण तरी तुमच्याकडून अंक साधारण कधी येइल याचा काहीतरी अंदाज येऊ द्या. गेले दोन दिवस सतत मायबोलीचे होम पेज चेक करतेय. आज पहाटे साडेपाच पासून लॉगिन झालेय. Happy

Pages