वेड

Submitted by सई गs सई on 22 September, 2013 - 06:01

सांज कोवळी गं सये कशी जाहली
फुलांचे हसू, सई अशी वेडावली..

कुठे जावू मना कुठे ठेवू तुला
दशदिशा हिंदोळती, पूर थोरला..

अनिमिष नजरांची ती भेट वेंधळी
डोळ्यांत उतरलेली रात्र आंधळी..

पापण्यांच्या पार, रंग निळा रंगे
स्वप्नं संगाचे.. पाण्यावर तरंगे..

पेट घेत उठे रे आस दाबलेली
आत्मार्पणाची ओढ ताणलेली..

- सई

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या ओळी अतीशय सुंदर ..तरल ...मोहक
कविता आवडली


२ X अष्टाक्षरीत असती तर काय बेजोड झाली असती म्हणून सांगू!!! पण असू देत आता

वा सुंदर!! आवडलीच.

अष्टाक्षरीत असती तर काय बेजोड झाली असती!! +१

अंजली जी "२ गुणीले अष्टाक्षरी " असे म्हटले होते मी Happy वाचकांचा गैरसमज नको म्हणून खुलसा कृगैन Happy

वानगी दाखल : (बदल सुचवत नाहीयेय ....फक्त उदाहरण म्हणून वाचा ! )

सांज कोवळी गं सये तुझ्या येण्यामुळे झाली
हसू फुलांचे पाहून सई अशी वेडावली..

कुठे जावू माझ्या मना कुठे ठेवू रे मी तुला
दाही दिशा हिंदोळती, पूर घेरतो थोरला..

Happy

वैभव, अंजली.. धन्यवाद!
ह्म्म.. जमतंय का बघते कधीतरी तुम्ही म्हणताय तसा डबल अष्टाक्षरी प्रयोग! Happy