इन्व्हेस्टमेंट च्या निमित्ताने...

Submitted by घारुआण्णा on 21 September, 2013 - 22:56

इन्व्हेस्टमेंट च्या निमित्ताने...
अयोग्य जागी केलेली गुंतवणुक ही फायदा तर मिळवुन देत नाहीच पण मुळ मुद्दल ही धोक्यात पडतं .
investment 1.jpg
जेव्हांपासुन माणुस नावाच्या प्राण्याला गुंतवणुक ,गुंतवणुकीचे फायदे, तोटे या गोष्टी उमजायला लागल्या तेव्हा पासुनच माणुस हा "प्राणी" या संकल्पनेतुन पुढे सरकत गेला. सुरवातीला , इन्व्हेस्टमेंट, ही मेहनत आणि त्यातुन मिळणरे दुरगामी लाभ , आणि भविष्य़्काळाची तरतुद इतपतच मर्यादित होती. आणि ती ही अधिक तर , धन , घरदार , जमिन जुमला अशा भौतिक गरजांची बेगमी इतपतच होती. नंतरच्या काळात, ज्या ज्या आपल्या आकांक्षा अपुर्ण राहील्या त्या आपल्या मुला नातवंडानी पुर्ण कराव्यात या अपेक्षा वाढु लागल्या आणि मग , त्यांना त्यांचं धेय गाठण्यासाठी योग्य परिस्थिती , निर्मण करण्याचा अट्टाहास ही वाढु लागला. पुढ्ची पिढी हे अपेक्षांच ओझ समजुन घेत होती त्याच बरोबरीने आसपासच्या निरिक्षणातुन स्वत:बद्दलचा आत्मविश्वासही वाढवत होती . त्या आत्मविश्वासाचं अतिशय गर्विष्ट आणि स्वकेंद्रित उदाहरण म्हंजे प्राचि , सोहेलची आई..... आपल्या पाल्यानी राजकारणी व्हावं यामागचा सामाजिक बांधिलकी वगैरे कोणताही हेतु नाही. केवळ मनि पावर आणी मसल पावरच्या जोरावर सर्व सुखं धन दौलत खेचता येते हाशुद्ध व्यवहार, तीला आजुबाजुला दिसत असतो आणि आपणही हे सोहेलच्या माध्यमातुन करवुन घेउ शकतो हा तिचा अट्टाहास.
दुसरी बाजु सोहेलचे वडील या जगण्याच्या रेसमध्ये तर आहेत, त्यांच्याही अपेक्षा अहेतच पण त्यासाठी येन केन प्रकारेण , अशा पद्ध्तीने पुढे सरकायला त्यांची पावलं अजुनही सरावलेली नाहीत. आदर्शवादी पत्रकार वडिल, आणि कदाचित जिवंत असलेली तत्त्वनिष्ठ शिक्षिका आई , यांमुळे हे द्वंव्द अजुनही चालुच असावं. राहता राहिला या कथेचा तिसरा आणि महत्वाचा कोन, अर्थातच सोहेल, घरातल्या आज्जीचे संस्कार, हे ओझं वाटु लागलेला, पण ते अजुनही सहज धुडकावण्या इतक वय नाही असा, आपल्या आई-वडलांच्या अपेक्षा, आणि त्या पुर्ण केल्यावर ,त्याचे मिळणारे फायदे , या सगळ्यां वर तो नजर ठेउन आहे. आपली बारगेन पावर कोणाकडे कधी वापरायची याचाही तो अंदाज घेतो, अति संकटाच्या वेळीही आपल्यावर काही शेकणार नाही याची खात्री पट्ल्यावरच तो वकिलांशी सहजते बोलु शकतो. (वर म्हट्ल्याप्रमाने नवीन पिढीकडे वाढणारा आत्मविश्वास /तो हाच )
invtu2.jpginvtu1.jpg
या सगळ्या गदारोळातही ठळक पणे जाणवतो तो वकिल, न्यायमुर्ती,पोलिस अशा सिस्टीम शी रिलेटेड माणसांचा बेरकी पणा.
कोणताही भावनिक/ न्याय्य विचार न करता केवळ आर्थिक निकषांवर , केस घेणारे वकिल, हे त्याच उत्तम उदाहरण. काही वर्षांपुर्वी लिहिलेलं हे कथानक आजही प्रत्यक्षात कुठं ना कुठं , नक्कीच घडत असणार (केवळ अल्पवयीन म्हणुन ३ वर्शात सुटणार्या आरोपी मागेही असाच एखादा ववकिल , पोलिस असावा .)
संपुर्ण चित्रपट पहात आसताना सातत्याने जाणवणारी बाब म्हणजे हे सगळं आपल्या आजुबाजुलाच घडत असल्याचा होणारा भास. आणि सतत होणारे जाणिव की ही सगळी समाजातल्या कोणाचं ना कोणाचं प्रतिनिधीत्व तर करत नाहीत ना ,
हताश आजी -- संस्कार घड्वु पाहाणरी , पण आर्थिक आणि नविन (अ)विचांरांना सहज मोडु न शकणारा
अशिष (सोहेलचे वडील) - प्रगती कराय्चीय पण त्याच्या वेगाबरोबर अजुनही नीट जुळवुन घेतायेत नाहीये
प्राचि (सोहेलची आई)- येन केन प्रकारेण यश मिळवयंचच असत हा विचार आणि कृति पक्की डोक्यात बसलेले

तुषार /सुप्रिया चांगला अभिनय, सुलभा देशपाडें चही काम , आवडलं विशेषत: "गांगणकडे त्याच्या पत्नीची चौकशी करुन मग माफीचा प्रसंग". व्यवहारी वकिल संजय मोने एकदम पर्फेक्ट.
भावु खाउन गेला तो संदीप पाठक , नाही रे वर्गाचं प्रतिनिधीत्व करणारा , तरीही लाउड वाटणारा, सहज अगतिक ....
invtu3.jpg
चित्रपट अतिशय सुंदर . टेक्नीकल , म्हणुन , विचार करायला लावणारा म्हणुन. साधारण १० वर्षाच्या पुढच्या पाल्यांनी पालकांसकट शक्य असल्यास आजी आजोबांनाही घेउन पाहीलाच हवा...
मायबोली माध्यम प्रायोजक: खरोखरीच असे चित्रपट प्रायोजित करण्याचा निर्णय उत्तम असे विषयवार समाजापर्यंत पोहोचवण्यात आपलाही खारीचा वाटा , आहे ....

चिनुक्स य़ोकु , सगळ्यांना धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अण्णा, छान परीक्षण.
संदीप पाठकच्या पत्नीच्या छोट्याशाच भुमिकेतली भाग्यश्री पाणे पण लक्षात राहते.

घारु, छान आढावा घेतला आहेस Happy

संदीप पाठकच्या पत्नीच्या छोट्याशाच भुमिकेतली भाग्यश्री पाणे पण लक्षात राहते. >>> +१

आवर्जून बघावा असा चित्रपट.

अण्णा, छान परीक्षण.
संदीप पाठकच्या पत्नीच्या छोट्याशाच भुमिकेतली भाग्यश्री पाणे पण लक्षात राहते > +१०१

आज आपण थोड्याफार फरकाने का होईना हे सगळंच आजूबाजूला पाहातोच. येनकेनेप्रकारेण आपल्याला जे हवं ते मिळवण्याकरता वाट्टेल ते करणारी माणसं आज आपल्याच आजूबाजूला आहेत. नेमकं चित्रपट हेच दाखवतो. चित्रपट पूर्ण वेळ खिळवून ठेवतो.
काहीकाही ठिकाणी जरासा लाऊड वाटू शकेल काही जणांना, पण तसले संवाद अग्दीच घडत नाहीत असं नक्कीच नाही म्हणता येणार.

सुलभाताईंच आजीचं रूप फारच छान जमलंय. तुषार-सुप्रिया-सोहेल उत्तम अभिनय.
सोहेल तर अगदीच घराघरांत दिसतो. आजकालची लहान मुलं टीनेज येऊ घातलेली म्हणा हवंतर असले हट्ट करतात, असंच वागतातही. सोहेलचा पडद्यावरचा वावरही छान आहे. लहान आहे म्हणून काही ठिकाणी अग्दीच बालिश संवाद कधी पहायला मिळतात, लहान कलाकार कधीतरी गडबडलेले दिसतात. तसं अजिबात नाहीये सोहेलच्या अभिनयात.
संदीप-भाग्यश्री यांचा अभिनय सुद्धा हुबेहूब वठलाय. त्यांची अगतीकता, मानसिक अवस्था यांचं चित्रण भाव खाऊन जातं.
संजय मोनेंचा रोखठोक वकील, अन त्यांचे सेटिंग लावण्याचे कसब, त्यातले हावभाव, संवाद-फेक, नंतरचे कोर्टातले युक्तिवाद... सगळंच अप्रतिम. Happy

संपूर्ण चित्रपट हॅन्डहेल्ड कॅमवर झालेला आहे, हे जाणवतही नाही. अमोल गोळेचं हे कसब वाखाणण्याजोगं आहे. गरज नसतांना प्रसंगाचा फील यावा म्हणून दिलेलं पार्श्व्संगीत सुद्धा कुठेही जास्त वाटत नाही. खरोखरच खूप छान दिग्दर्शन. जरूर सगळ्यांनी पहावा.

घारू, मस्स्तच लिहिलं आहेस.
सिनेमात एकही गाणं घुसडलेलं नाहीये - हे फार आवडलं.
तसंच पार्श्वसंगीतही खूप कर्कश्श नाहीये.

सिनेमात एकही गाणं घुसडलेलं नाहीये - हे फार आवडलं.
तसंच पार्श्वसंगीतही खूप कर्कश्श नाहीये. >>>> अगदी... त्यामुळेच कुठेही परिणाम डायल्यूट झाला नाही.

सोहेलच्या शिक्षिकेनी त्याच्या आज्जीला " आम्ही असले आर्टीफिशिअल संस्कार करत नाहीत मुलांना" हे सांगणं आणि त्याचे पुढे चित्रपटात जाणवणारे परिणाम 'असे संस्कार आवर्जुन करायलाच हवेत जरी ते आर्टीफिशिअल वाटले तरीही ' हेच अधोरेखीत करतात.
देणगीसाठी खोटे बोलणारे म्हणजेच नकळत चुकीचे संस्कार करणारे शिक्षक\ शाळा मन उद्वीग्न करतात.
सगळ्यांचीच कामे उत्तम
चित्रपटभर ए बाबा म्हणणार मुलगा मधेच एकदा बाबांना अहोजाहो करताना दिसलाय, पण एकदाच. ते चुकुन झालय की मुद्दाम माहीत नाही.
आणखी एक. :- तु. दळवीची आई जाते त्या वेळी त्यांच्या घरात कोणीच कसं नाही? तो स्मशानातून ते मडकं घेऊन येतो तेव्हाही एकटाच घरी येतो आणि घरात फक्त बायको आणि मुलगा हे जरा खटकलंच. कोणीतरी नातेवाईक किंवा शेजारी तरी असायला हवे होते. निदान अधुन मधुन भेटणारे अजित केळकर तरी. अशा प्रसंगात माणसे येतातच घरी.

रच्याकने घाऋ छान लिहिलय.

@मनिषा लिमये : तु. दळवीची आई जाते त्या वेळी त्यांच्या घरात कोणीच कसं नाही? तो स्मशानातून ते मडकं घेऊन येतो तेव्हाही एकटाच घरी येतो आणि घरात फक्त बायको आणि मुलगा हे जरा खटकलंच >>>>>>>> १०१% सहमत. मलाही खटकले होते की हे लोक एवढे निर्वातात का दाखवले आहेत !!!