Submitted by आशुचँप on 19 September, 2013 - 13:20
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्षमस्व....माबोच्या नविन धोरणाचा आदर करत मी इथले प्रचि काढून टाकले आहेत...
जबरदस्त, कडक, राप्चिक्,फाडु
जबरदस्त, कडक, राप्चिक्,फाडु सगळं काही एकदाच.......लै भारी आशुचँप
प्रचि १८ मधला छोटुला अगदी समरसुन वाजवत आहे. त्याच्या नाकपुड्याही आवेशाने फेंदारलेल्या स्पष्ट दिसताहेत.
मस्त फोटो !!!
मस्त फोटो !!!
सर्वांना खूप खूप
सर्वांना खूप खूप धन्यवाद
तुमच्या सगळ्यांच्या प्रोत्साहनामुळेच दरवर्षी फोटो काढण्याचा उत्साह येतो..
पियुपरी - हो, ते काय होते ते मला पण नीटसे कळले नाही. पण असे वाटते की त्यांना म्हणायचे होते अनेक यांत्रिक उपकरणे येऊन देखील स्त्रीचे काम काय कमी झाले नाही. किंबहुना उलट असेही असेल की स्त्री त्या उपकरणांच्या आहारी गेली आहे..
ज्याला हवा त्याने तसा अर्थ लावावा...
अजुन एक.. सगळे फोटो आपण काढलेले असतील तर कृपया त्यांच्यावर वॉटरमार्क टाका.
अतीशय दृष्ट लागण्यासारखे फोटो आहेत. त्यामुळे ढापले जाण्याची दाट शक्यता आहे.
काही दिवसांनी इथले फोटो तुम्हाला फेसबुकच्या एखाद्या ग्रुपमध्ये/ पेजवर तुम्हाला क्रेडीट न देता दिसू नयेत हिच प्रामाणिक इच्छा आहे.
हे झालेले आहे याआधीच...२०११ च्या मिरवणुकीचे फोटो मी मायबोलीवर टाकले होते. ते मलाच नंतर मेलने फॉरवर्ड झाले होते. कहर म्हणजे माझ्या मुलाचे पण त्यात फोटो होते. त्यानंतर मग मी मायबोलीवर फोटो टाकणेच कमी केले. पण दरवर्षी गणेशोत्सवाचे टाकतो आणि त्यावर मुद्दामच वॉटरमार्क टाकत नाही. बाप्पांच्या फोटोवर वॉमा टाकण्याची योग्यता नाही. त्यामुळे हे प्रताधिकारमुक्त फोटो आहेत. ज्याला जसे वापरायचे त्याने वापरावेत. बाप्पांच त्यांना सद्बुद्धी देतील.
राहुल१२३ >> लक्ष्मी रोड वर..
राहुल१२३ >> लक्ष्मी रोड वर.. साधारण ११- ११:३०वाजता सुरु होते मिरवणुक.. लवकर जाउन जागा पकडायची
आमचा ग्रुप अलका टॉकीज पासुन लक्ष्मी रोड कडे चालत फिरतो.. जागा मिळाली की थांबायचे बाप्पा येवुन पुढे जाई पर्यंत
ढोल-ताशा ऐकायचा आहे तर एक परिक्षण मंड्प असतो तिथे सगळी पथक येतात स्पर्धेला.. गेल्या वर्षी नादब्रम्ह नि शिवगर्जना मधे जुगलबंदी होती.. भन्नाट मज्जा!
दगडू - एकदा उलटे करू..मी
दगडू - एकदा उलटे करू..मी तुझ्याऐवजी कोकणात जातो आणि तु माझ्याबदली पुण्यात फोटो काढ...मला जामच आवडलाय तुमचा निवांत गणेशोत्सव
चनस - मी पण फिरतच होतो, पण त्यातल्या त्यात जास्त फोटो गणपती चौक आणि नंतरचे काही अलका चौकातले आहेत. टॉप अँगलने घेतलेले फोटो मी रेड डीपी बॉक्सवर चढून काढले आहेत. त्यावर चढणे उतरणे हा एक दिव्य प्रकार आहे.
तुला अशा अॅक्युरेट मोमेंट कशा काय मिळतात रे?
अगं, कॅमेरा सतत क्लिककक्लिकतच असतो. फोटो काढण्यापेक्षा काढलेल्या ढीगभर फोटोंमधून बरे वाटणारे फोटो शोधणे हेच एक मोठे काम असते.
अरे, पहिल्या रागोळीचा फोटो आहे ना, त्यावेळी मी तिथेच होते. स्मित
सांगायचे ना मग त्याच वेळी...तुझापण फोटो काढला असता.
बिनधास्त दे झब्बू
रिया - म्हणजे सगळेजण गणपती सोडून तुझ्याचकडे बघत राहतील. ही अशी काय उड्या मारतीये म्हणून
राहूल - दरवर्षी बेलबाग चौकातून नऊ वाजता मिरवणुकीला सुरुवात होते आणि संपूर्ण लक्ष्मी रस्ता पार करून डेक्कनला दुसरे दिवशी दुपारी एक वाजता विसर्जन होते. या काळात कुठेही गेलात तरी मिरवणूक मिळेलच. मानाचे गणपती साधारणपणे संध्याकाळी सात वाजेपर्यंत विसर्जन होतात. याव्यतिरिक्त, केळकर रस्ता, कुमठेकर, टिळक, कर्वे, बाजीराव या सगळ्या रस्त्यांवरूनही मिरवणुका जात असतात.
छानच फोटो
छानच फोटो
यावर्षी केसरीवाड्याबरोबर
यावर्षी केसरीवाड्याबरोबर बेलबाग चौकापासून कुंटे चौकापर्यंत एक ज्ये ना हास्यक्लबाचं पथक पण होतं. त्यात बाबा होते माझे. मला पण अगदी आयत्यावेळेला बाबांनी सांगितले. तुझा नंबर नव्हता माझ्याकडे नाहीतर तुला सांगितले असते त्या पथकाचा एखादा फोटु काढायला.
क्या बात!!! क्या बात!!! क्या
क्या बात!!! क्या बात!!! क्या बात!!!!
एकसे एक खल्लास फोटो.
सगळे फोटो अप्रतिम, पण प्रचि १२ आणि प्रचि २२ विशेष आवडले. प्रचि ४७ अजुन थोडा शार्प असता तर मजा आली असती.
रच्याकने, यावेळेस शर्वरी जमेनीस नव्हती का?

सांगायचे ना मग त्याच
सांगायचे ना मग त्याच वेळी...तुझापण फोटो काढला असता.>>>>>>>>>>.ते तेव्हा माहित नव्हत. आता तो फोटो बघितल्यावर कळल. कुठे होतास तू?
सगळेच फोटू खल्लासच मस्त
सगळेच फोटू खल्लासच
मस्त वाटलं. यंदा लक्ष्मी रस्त्यावर जाता आलं नाही, पण तुझ्यामुळे मिरवणुक अनुभवता आली.
रच्याकने, यावेळेस शर्वरी
रच्याकने, यावेळेस शर्वरी जमेनीस नव्हती का?...>>>>>>>>>>>>>>>>>जिप्स्या, तिच्यावर इतकं का रे लक्ष तुझ?
जिप्स्या माझ्या फेबु
जिप्स्या माझ्या फेबु आल्बम्समधे बघ. एक दोन खूप जुने फोटो आहेत तिचे. मी डिरेक्ट केलेल्या नाटकातले.
अफलातून ... प्रचि आहेत सगळेच.
अफलातून ... प्रचि आहेत सगळेच.
वा हाव-भावही छान टिपले गेले
वा हाव-भावही छान टिपले गेले आहेत.
ऊ त्त म....!
ऊ त्त म....!
जळजळाट... मिरवणूक बघायला जाता
जळजळाट... मिरवणूक बघायला जाता न आल्यामुळे झालेला आहे...
फोटो नेहमीप्रमाणेच कडक..
आज सकाळला छोटीशी न्यूज आहे.. कॅमेरे गळ्यात घालून फिरणार्यांना न पोलिसांनी आडवले ना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला. सगळे जण त्यांना प्रेस फोटोग्राफर वाटले.
जबरदस्त फोटो! मस्त मूड्स
जबरदस्त फोटो! मस्त मूड्स टिपलेत एकेक!
बायदवे, (जित्याची खोड!) एक रंगोळीत "अतिवापराने स्त्रीची दशा" असे काहीतरी दिसले!! ते नक्की कशाबद्दल होतं ते कळले नाही ?
जबरी फोटो आहेत सगळे.. आशुचँप
जबरी फोटो आहेत सगळे.. आशुचँप कॅमेरा सतत क्लिककक्लिकतच असला तरी चांगले मूड मिळत नाहीत कधीकधी.. अतिशय सुंदर फोटो आहेत.. माझ्याकडून सगळ्या फोटोंना काळा टीका
जबरदस्त फोटो!!!!
जबरदस्त फोटो!!!!
एक नंबर..
एक नंबर..
अप्रतिम!
अप्रतिम!
मस्त फोटो रे.. मजा आली बघायला
मस्त फोटो रे.. मजा आली बघायला खरेच
यावर्षी केसरीवाड्याबरोबर
यावर्षी केसरीवाड्याबरोबर बेलबाग चौकापासून कुंटे चौकापर्यंत एक ज्ये ना हास्यक्लबाचं पथक पण होतं. त्यात बाबा होते माझे.
ओहोहो...ठीकाय नेक्स्ट टाईम
प्रचि ४७ अजुन थोडा शार्प असता तर मजा आली असती. >>>>>
जिप्स्या - अरे तो जस्ट चालता चालता क्लिकला...लाईट कमी झाला होता आणि सेटींग चेंज करायला वेळ झाला नाही....
रच्याकने, यावेळेस शर्वरी जमेनीस नव्हती का?>>>>>>>
अरे ती या वर्षी मुंबईला होती...तिला कुणीतरी सांगितलं म्हणे की तु यंदा मुंबईची मिरवणूक करणार आहेस म्हणून....
माझ्याकडून सगळ्या फोटोंना काळा टीका >>>>>
हाहाहाहा....थांकू
आज सकाळला छोटीशी न्यूज आहे.. कॅमेरे गळ्यात घालून फिरणार्यांना न पोलिसांनी आडवले ना मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्रास दिला. सगळे जण त्यांना प्रेस फोटोग्राफर वाटले.>>>>>
हो असं झालं तरी खरं....अगदीच अडवत नव्हते असं नाही पण गेल्या वर्षीच्या तुलनेत बरेच सौजन्याने वागत होते...अगदी मध्येच कुणी थांबून फोटो काढत असलं तरी जरा बाजूला थांबून फोटो काढणार का अशी विनंती वगैरे करत होते....
गेल्या वर्षी बर्याच प्रेस फोटोग्राफरनी ढोल-ताशा पथकांच्या अरेरावीबद्दल पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रातही त्यांच्याबद्दल टीकेचा सूर उमटायला लागला होता. त्यामुळे त्यांनी वेळीच दखल घेतली असावी बहुदा
ओक्केज .. या वेळी पण मला
ओक्केज ..
या वेळी पण मला सिध्दार्थ चांदेकर दिसला नाही
अजुन एक सेलिब्रिटी .. तेजस्विनी पंडित (बहुतेक नाव बरोबर आहे .. मुख्य भुमिका सिंधुताई सपकाळ)
हो ही कसब्याला होती ना....ती
हो ही कसब्याला होती ना....ती नंतर सामिल झाली बहुदा....
मला दिसलीच नाही...नंतर चॅनेलवर पाहिले
सगळेच अप्रतिम फोटो. शेवटचा
सगळेच अप्रतिम फोटो. शेवटचा अगदी समर्पक. लोकांकडे पाठ करून निघालेला बाप्पा बघुन मन भरून आलं.
अप्रतिम फोटो आहेत! गर्दीचे
अप्रतिम फोटो आहेत! गर्दीचे मूड, अँगल्स.. मजा आली बघायला.
पुण्याच्या राजामागची गुलाबांची आरास फार आवडली.
'मानाचे गणपती' हा काय प्रकार असतो? पहिला, दुसरा असे नंबराचे मान असण्यामागे काय कारण/इतिहास आहे?
सुंदर आहेत फोटो.
सुंदर आहेत फोटो.
सुंदर!
सुंदर!
मस्त. अगदी नेमके चेहरे
मस्त. अगदी नेमके चेहरे टिपलेत..
आम्ही भाग्यवान कारण आम्हाला हे सर्व ध्वनिप्रदूषणाशिवाय बघता येतंय !
Pages