कृतघ्न

Submitted by joshnilu on 19 September, 2013 - 01:34

कृतघ्न

धनधान्य देणारी दिवाळीत पूजनीय लक्ष्मीमाता
सरस्वती देइ बुद्धि , मती अशी विद्येची देवता
कठीण संसारात रामाला साथ देणारी सीतामाता
स्वातंत्र्याचा लढा पुकारणारी झाशीची वीरमाता

विश्वात एकमेव जेथे देशाला म्हणतात भारतमाता
शिवाजीला बनवले लढवय्या ती जिजाऊमाता
सर्व स्त्रीशक्तीचा गौरव, प्रत्येक बाळाची माता
प्रेमाने मुलाला पान्हा पाजुन देते प्रेम व ममता

आई बनुन आपल्याला शिकवणारी शिक्षिका
मुलगी बनुन आपली काळजी घेणारी बालिका
बायको बनुन संसार संभाळणारी सहचारीका
कधी बहिण बनुन दिशा दाखवणारी मार्गदर्शिका

स्त्री एकच पण प्रत्येक रुपात आहे विविधता
जसा आपला देश आहे विविधतेत एकता
त्या नारीशक्तीवरच आली आहे हतबलता
जेव्हा पुरुष तिच्यावर दाखवू पाहतो प्रबलता

बलात्कार करणारा स्वत: जितेपणी नरकात गेला
अनेक आयाबहीणिना काळजीत टाकुन गेला
अनेक मुलीना असुरक्षितेची जाणीव करून गेला पण प्रत्येक पुरुषाची मान खाली झुकवुन गेला

एवढा एकच विचार प्रत्येक पुरुषाने जर केला
स्त्री शिवाय तो येवू नसता या जगात जन्माला
क्षणिक मोहापायी त्याने जवळ केले क्रुरतेला
जन्मदात्री आईला त्याने मात्र कृतघ्नपणा दाखविला

---निलेश जोशी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users