टिक्की..

Submitted by सुलेखा on 19 September, 2013 - 00:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१०० ग्रॅम पनीर,
२ वाटी ब्रेड क्रम्स,
१ वाटी मेथीची भाजी बारीक चिरुन किंवा थोडी वाफवुन घेतली तरी चालेल.
१/२ वाटी सिमला मिरची ,गाजर बारीक चिरलेले,
३ हिरव्या मिरच्या,१ इंच आले ,४ लसूण पाकळ्या,१/२ टी स्पून जिरे हे सर्व जाडसर वाटुन घ्यावे ,
अर्धा कांदा बारीक चिरलेला ,
चाट मसाला १ टी स्पून,
गरम मसाला १ टी स्पून,
ओवा १ टी स्पून,
लिंबाचा रस १ टी स्पून ,
१० /१२ पुदिना पाने,
मीठ चवीनुसार,
तेल अर्धी वाटी ,
तांदुळाचा रवा २ टेबलस्पून किंवा जाड रवा,

क्रमवार पाककृती: 

पनीर किसुन घ्या.
त्यात ब्रेड क्रम्स ,मेथी भाजी ,सिमला मिरची- गाजर,गरम मसाला,चाट मसाला,ओवा,आले-मिरची-लसूण -जीरे यांचे जाडसर वाटण,लिंबू रस, कांदा,पुदिना पाने हाताने तोडुन ,चवीनुसार मीठ व लागेल तसे अगदी थोडेसेच पाणी घालुन गोळा तयार करा.
आवडतील त्या आकाराची टिक्के तयार करा.
तांदुळाच्या /साध्या जाड रव्यात घोळवा .फ्राय पॅन मधे १-१ टी स्पून तेल सोडुन या टिक्की खमंग भाजा.
गरम टिक्की चा सॉस बरोबर आस्वाद घ्या.
Tikki 001.JPG

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणात १२ टिक्की तयार होतात...
माहितीचा स्रोत: 
माळवी खासियत.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वाटतेय रेसिपी.

मला एक प्रश्न पडतो नेहमी की, टिक्की, पॅटिस आणि कटलेट मध्ये काय फरक असतो?

प्राची, शब्दांचा फरक असतो.वेगवेगळे जिन्नस एकत्र करुन एक गोळा करतात.थोड्याशा तेलावर दोन्हीकडुन भाजतात/तळतात किंवा शॅलो फ्राय करतात.आकार-प्रकार-सारण ह्यात फरक असतो.प्रत्येक जागेच्या/स्थानाच्या ,लोकांच्या आवडीनुसार ज्या-त्या नावाने प्रचलित आहे.