एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया काल बालक पालक नाही पाहिला का? त्याच्या मधे मधे किती वेळा एलतिगोची जाहीरात दाखवली.

उमेश आणि स्प्रुहा साठी बघणार.
एलदुगो चं ही तसंच होतं. स्वप्निल आणि मुक्ता साठी बघत होते. मग जाम बोर झाली. बालिशपणा नुसता. सो बघायची बंद केली होती मधेच. फक्त इथे अपडेट्स वाचायचे. बघु तिसरी गोष्ट कशी येतेय ती.

एलदुगो चे लेखक मांडलेकर होते ? अरेच्चा..मला माहित नव्हतं. हिरोहिरवीणीचं लग्न होईपर्यंत ही मालिका बर्यापैकी एन्जॉय केल्याचं आठवतंय....अर्थात कुहू, काका प्रकरणं, ऑफिसातले बॉस, मानव प्राणी हे फास्ट फॉरवर्ड करून. पण बरेच प्रसंग अगदी साधे कुणाच्याही घरात घडू शकणारे किंबहुना घडणारे छान होते. त्यामुळे मांडलेकरांना आणि दिग्दर्शकांना त्याचं क्रेडिट नक्की. कानाचे पडदे न फाटणारं संगीत (शीर्षकगीत व ' तुझ्याविना ' गाणं वगळता) आणि घरगुती व्हिलन बायकांचा अभाव या कारणांनी सुरुवातीला मस्त मजा होती ही मालिका. नंतर मात्र फारफार खेचली.

SAB TV var SAJAN RE JHOOTH MAT BOLO hi serial yahchi tyachi copy aahe watata.

Aai, baba, Aaji, bhau , bahin ani vahini sagale bhadyache hote tashich asavi hi serial

टकाटक येस्स्स्स

मधुरा तू कुठे Uhoh
आम्ही म्हणत होतोत असं Proud

बट जर ही स्टोरी असेल तर मला नाही इंटरेस्ट बघण्यात Sad

मला तर टायटल सॉंग आवडल.सचिन/महागुरु चा आवाज आहे .तो ही आवडला
फक्त स्पृहा जाडी वाटतीये.तिला अजुन वॉर्ड्ररोब वर मेहनत घ्यायला हवी.
उमेश कामत च पारदर्शी शर्ट पाहुन मला k3g मधल्या शाहरुख ची आठवण झाली. Proud

स्प्रुहा जाड झालीये. सलवार कमीज मधे नाही जाणवत पण त्या पांढर्‍या ड्रेस (शुभा खोटे वगैरे दाखव्लेत त्या गाण्यात) मधे एक्दम दंडोबा दिसते.

सुमित राघवनच्या 'सजन रे झूठ मत बोलो'ची कॉपी आहे असे मलापण प्रोमोजवरून वाटतेय, तसे असेल तर ती मालिका ज्यांनी बघितली आहे त्यांना कंटाळा येणार बघायला.

स्पृहा गोड दिसतेय .पण जाडी पण झालेय. आत्ता कुठेशी लग्न ठरलंय तीच. प्रत्यक्ष होईल तेव्हा किती जाड होईल. बुटकी पण आहे ती Happy

येस सुजा तरीच म्हटल कुणाला कळल कस नाही अजुन..... हा फोटो पण तिच्या साखरपुड्याचा आहे अस दिसतय.... कारण ओटीत असोल्या नारळ बहुदा तेव्हांच देतात.

मुग्धा आम्हाला केंव्हाच माहीत होतं हे Proud

सजन रे झुठ मत बोलो पण नंतर नंतर अतिच बोर झाली Sad
आणि ही सेम तशीच असेल तर मला बोअर होईल पाहिला Sad

(प्लिज प्लिज तशी नको)

स्पृहाच्या साखरपुड्याचाच फोटो आहे, मागे कोणीतरी fbवर शेअर केले होते. रियाला अनुमोदन, मीपण बघणार नाही हि सिरीयल जर सेम टू सेम 'सजन रे झुठ मत बोलो' ची कॉपी असेल तर.

कालच प्रोमो नि टायट्ल साँग बघितले.. ठीक वाटले

स्वप्नील-मुक्ताचा अजुन एक चित्रपट येतोय.. मंगलाष्ट्क वन्स मोअर..
ह्या पोस्टर्स मधेही तो झपाटलेला बाहुला सारखाच दिसतोय

स्वप्नील-मुक्ताचा अजुन एक चित्रपट येतोय.. मंगलाष्ट्क वन्स मोअर..>>>>येस.... Happy
मी त्या दोघांची पंखा आहे.. Wink

मला कळल्ये पूर्ण स्टोरी... एका पेपरच्या ऑनलाइन डिपार्टमेंटसाठी काम करत असल्याने मनोरंजन क्षेत्राशी पण संबंध येतो. सगळे पी. आर वाले आणि चॅनेल वाले पाठवत असतात मालिकेचे अपडेट्स आणि बरच काही... त्यात झी मराठीच्या पी. आर वाल्यांनीपण एलतिगोचे प्रेस रिलीज, फोटो पाठवले. त्यातून कळल्ये सगळी कथा आधीच...
कोणाला जाणायची असेल तर सांगा.. पण लोकांना उत्सुकता असेल, पहायची असेल मालिका म्हणून अजून भांडाफोड नको म्हणून काही बोलले नाही. जुनच दळण नव्याने दळणार असं दिसतय एकंदरीत चित्र.. फक्त कास्ट नवीन आणि लूक थोडा फ्रेश Happy

Pages