एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी....तारीख चुकीची पडली.>>>>कोणाची???? तुमची का?? राहु देत हो मामा. चलता है!!!

अ‍ॅडमिनवर भलते सलते आरोप करू नका. अ‍ॅडमिननी एखादा धागा भांडणे होतात म्हणून वाहता केल्याचे मी कधीही पाहिलेले नाही. >>> तुम्ही जे पाहिलं नाही, ते काय कधी होतंच नाही, असं म्हण्णय काय तुमचं, मयेकर? किती छातीठोक विधानं करता? आणि इतरांना खोटं पाडता? आता रियाने सांगितल्यावर बोलती बंद झाली ना? म्हणूनच आधी खरं काय याची खात्री करुन घ्यावी...

मधुरा.... चुकीची तारीख पडली म्हणजे माझ्याकडून २४ आक्टोबर असे टंकले गेले होते मूळ प्रतिसादात. नंतर तुमचा धागा नजरेत आला तिथे १४ आक्टोबर होती....झी मराठीवरही हीच तारीख आल्याने मग लगबगीने इकडे येऊन तो प्रतिसादच काढून टाकला.

<भरतदादा, होणार सुन मी या घरची आधी नॉर्मल धागा होता, मग त्यावर भांडण / वाद झाले, मग तो धागा वाहता झाला ( मी कित्ती काही लिहिलेलं त्याच्यावर अरेरे ) आणि मग नंतर पुन्हा त्याला बांध घातला गेला स्मित>

यातला तो आधी नॉर्मल धागा होता या म्हणण्याला आठवणीशिवाय अन्य काही पुरावा आहे का? बरं- धाागाकर्तीचा ट्रॅक रेकॉर्ड काय सांगतो? त्या गप्पांची पाने उघडत सुटत नव्ह्त्या का?

भांडणाकडे आणि फक्त मालिका आवडल्याच्या पोस्ट्सकडे वळूया. होसूमीयाघ या धाग्यावरच्या वाहून गेलेल्या पोस्ट्सपैकी काही माझ्याही होत्या. एका अन्य आयडीने ही मालिका सध्यातरी बरी वाटतेय, असे म्हटले त्यावर मी अनुमोदन दिले होते. तेवढ्यावरून वाद सुरू झाले. की तुम्हाला ती अमकी तमकी मालिका आवडत नाही तर ही मालिका कशी आवडते. आता 'क्ष' मालिकेवर केलेली टीका आवडली नाही, तर त्याचा राग 'य' मालिकेच्या धाग्यावर काढायचा. ब्ररं. मी तो वाद सुरू झालाच आहे म्हणून योग्य जागी म्हणजे 'क्ष' मालिकेवर घेऊन गेलो, तर दुसर्‍या मालिकेच्या धाग्यावरचा वाद इथे आणला म्हणून मलाच बोल लावले.

आणखी गंमत म्हणजे या (तिसर्‍या गोष्टीच्या) धाग्यावर ग्गोड ग्गोड बोला म्हटल्यावर हुश्शार म्हणणारे आयडी होसूच्या, त्याच धाग्याकर्तीने काढलेल्या धाग्यावर मालिकेला आणि नायिकेला सुरुवातीला नावे ठेवीत होत्या. अगदी शीर्षकगीतातील ओळी देऊन, अशा मालिकेकडून काय अपेक्षा ठेवायची इ.इ.

यातला तो आधी नॉर्मल धागा होता या म्हणण्याला आठवणीशिवाय अन्य काही पुरावा आहे का?>>> प्रतिसाद ३० किंवा त्यापेक्षा कमी असणे आणि त्याहून एक पण जास्त प्रतिसाद आला तर ते वाहून जाणे, याला वाहता धागा म्हणतात. तसा तो नव्हता. त्या धाग्यावर भरपूर प्रतिसाद (३०+)आलेले होते. तिथे वाद झाल्यावरच अ‍ॅडमीननी त्याला वाहतं केलं आणि मग त्यांना विपुतून विनंती केल्यावर त्यांनी ते वाहणं बंद केलेलं आहे! याला आठवणीशिवाय अन्य पुरावा म्हणजे खुद्द अ‍ॅडमीननाच विचारुन खात्री करुन घेणे!!!

नायिकेला सुरुवातीला नावे ठेवीत होत्या. >> हे अर्थातच मला उद्देशून लिहिलेलं एक धादांत खोटं विधान आहे... मला पहिल्यापासूनच ती जाह्नवी आणि श्री पण आवडले होते. त्यांना मी कधीही नावं ठेवलेली नाहीत!!! त्यांचं मी भरभरुन कौतुक केलेलं आहे. धागा वाहून गेला याचा फायदा घेऊन खोटारडेपणा करु नका!

अगदी शीर्षकगीतातील ओळी देऊन, अशा मालिकेकडून काय अपेक्षा ठेवायची इ.इ.>> हे मात्र मी म्हणाले होते!!! मला ही मालिका सुरुवातीला अजिबत कॅची वाटली नव्हती. यावरुन मी ते लिहिले होते..शीर्षक गीताच्या ओळी आवडल्या नाही म्हणतांनाच त्याचं संगीत, गाणं म्हणण्याची पद्धत मात्र छान आहे आणि म्हणून पाहीले तर अवघड आहे, हे ही मी लिहिले होते तिथे!!

एका लग्नाची तिसरी गोष्ट चे शीर्षकगीत महागुरुंनी 'गायले' आहे ना ?
स्वप्नील बांदोडकर सारखा कुणीतरी तरूण गायक घ्यायचा ना .
संगीतकार सलील कुलकर्णी कुठल्याशा चॅनेलवर सांगत होते की शीर्षकगीत म्हणून नव्हे तर एक स्वतंत्र गाणं म्हणून हे गीत केलं आहे.

काय रे तुम्ही लोक?

भांडत बसु नये, अस लिहुन सुद्धा पुन्हा तेच!!!

---------------------------------------------------

@ सानी: Happy

@अशोकः ठीक आहे. त्यात सॉरी वगैरे म्हणण्याची गरज नाही.

एलतिगो च्या प्रोमोज वरुन वाटतय की उकाचं कॅरेक्टर अनाथ दाखवतील बहुदा

टायटल साँग मी अजुनही ऐकलेलं नाहीये

प्रिया बापट असती तर नवा गडी नव राज्यच टी व्ही वर्जन बघायला मिळाल असतं ना Lol

प्रोमोज तरी चांगले वाटताहेत मालिकेचे Happy

प्रिया बापटला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारले कि उमेशबरोबरच काम करणार का? तिने सांगितले असे नाही.वेगळ्या जोडीबरोबर काम करायचे आहे, त्यामुळे कदाचित नसेल ती उमेशबरोबर.

ते दोघेही चांगले कलाकार आहेत. पण,मला नाही वाटत हि मालिका 'ए.ल.दु.गो.'ची जागा घेऊ शकेल...प्रोमोज बरे आहेत. पण तरीहि, 'इस्ट ऑर वेस्,, ELDG इझं द बेस्ट!!!!'

मधुरा, बास की आता

इथला एलदुगो चा धागा वाचलास का?
आम्ही खुप धमाल केलेली त्या धाग्यावर....

मी तर अजूनही पहातीये ती सिरीयल.......काही एपिसोड्स डाऊनलोड केलेलेत.....मी अजूनही चर्चा करायला तयार आहे!!! Proud

मधुरा, असं काही बोलू नकोस..किती कौतुक करतेयस त्या एलदुगोचं! पूरे आता.. Happy

माझ्या मते, एलदुगो छान होती, पण सुरुवातीलाच. नंतर त्यात अती बोअर प्रकार सुरु केला होता. तरीही बघायचे बंद करावे, असे कधीच वाटले नाही, हे त्याचे यश आहे अर्थात...

मला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेली सिरियल म्हणजे असंभव. मात्र ती मी झी मराठीच्या युट्युब चॅनेलवर आली, तेंव्हाच पहिल्यापासून नीट पाहिली. त्यातही शेवटचे बरेच भाग नव्हतेच.

एलतिगोत उमेश कामत असल्याने आणि तो माझा खुप्पच आवडता असल्याने ही पण सिरियल आवडेल, असं वाटतंय.. शिवाय स्पृहाही माझी आवडती.. पण प्रिया बापटने अ‍ॅक्सेप्ट करायला हवा होता हा रोल. शुभंकरोतीत दोघांची जोडी मस्त दिसत होती आणि रियल लाईफ मध्ये तर आहेच मस्त.

कोणीतरी म्हणल होत...कि आधी आवडलेली गोष्ट नंतर आवडलेली नाही हे सांगायलाहि हिम्मत लागते!

म्हणून स्पष्ट खर मत मांडलं.

@ सानी, अग खरतर माझी आवडती जोडी स्वप्नील-मुक्ता आहे म्हणून कदाचित मला हि मालिका पाहताना थोडं कठीण जाईल. उमेश कामत आणि स्पृहा सुद्धा आवडतात ग मला...पण जोडी म्हणून प्रिया बापटच असायला हवी होती उमेश बरोबर.....छान दिसते त्यांची जोडी. असो.....मालिका सुरु झाल्यावर गप्पा मारूच आपण. Happy

पण जोडी म्हणून प्रिया बापटच असायला हवी होती उमेश बरोबर.....छान दिसते त्यांची जोडी. >>> येस्स्स्स!!! Happy
पण बघूया आता, कशी केमिस्ट्री आहे उका आणि स्पृहाची. आवडेलही आपल्याला कदाचित.. Happy

मधुरा , चर्चा काय करायची त्या शेवटी पांचट झालेल्या मालिकेवर आता? Uhoh

आम्ही बरच एंजॉय केलय त्या मालिकेला... आता इच्छा नाही Proud

पांचट >>> पाणचट???? ए...... माझी आवड्ती मालिका आहे ती!!! ऐसा वैसा कुछ बोलने का नै!!! Proud

Pages