एका लग्नाची तिसरी गोष्ट!!!

Submitted by मी मधुरा on 18 September, 2013 - 01:19

'एका लग्नाची दुसरी गोष्ट....' माझी सर्वात लाडकी आणि पहिली मराठी आवडलेली मालिका, जी मी पहिली आणि शेवटपर्यंत पाहत राहिले. ती मालिका मात्र २५ ऑगस्ट २०१२ ला संपली. Sad

आणि आता त्या मालिकेतले दोन कलाकार, उमेश कामत (अबीर-एका लग्नाची दुसरी गोष्ट) आणि स्पृहा जोशी (कुहू-एका लग्नाची दुसरी गोष्ट) हे दोघे पुन्हा पडद्यावर येत आहेत, तेही एकत्र....'एका लग्नाची तिसरी गोष्ट' घेऊन!!!! Happy

ए.ल.दु.गो. नंतर मालिकांमध्ये प्रेम कथा, Joint Family दाखवण सुरु झाल, मालिकेत नवीन म्हणजे,
खास मालिकेसाठी तयार केलेली गाणी दाखवण्याची सुरवात झाली...म्हणूनच ए.ल.ती.गो. पाहण्यास मी खूप उत्सुक आहे. Happy

सध्या मिळालेली माहिती:

कथा: श्रीरंग गोडबोले
पटकथा: चिन्मय मांडलेकर (आधीचे एपिसोड), संदेश कुलकर्णी (आत्ताचे एपिसोड्स)
दिग्दर्शक: विनोद लव्हेकर
संगीत: सलील कुलकर्णी
मालिका सुरु होण्याची तारीख: १४ ऑक्टोंबर २०१३!
ekalagnachi.jpgमहत्वाचे:

इथे भांडत बसू नये.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्ताच परफेक्ट शोभली असती.
उका बिचारा..... किती काळ तग धरणार मालिका त्याच्या जीवावर? >> रिया +१०००००००००००००००

स्पृहाचे ड्रेसेस ईतके ढगळे ,भडक रंगाचे आणि नवशिक्या टेलर ने शिवल्यासारखे का दिलेत?
तिची उंची (आणि वाढलेली जाडी ) बघून तरी वेषभूषा ठरवायची >>>>> एकदम बरोबर.......

स्पृहाला फक्त काकू टाईप भुमिकाच चांगल्या दिसतात. दिसायला चेहरा जरा जुन्या धाटणीचाच आहे.

गळ्यात ठुशी, नववारी अय्या, इश्श करणारी.. जराही मॉर्डन वळण नाहीये.
उमेश कामत पण ठिक आहे. (खूप बुटका आहे पण).

<<स्पृहाला फक्त काकू टाईप भुमिकाच चांगल्या दिसतात. दिसायला चेहरा जरा जुन्या धाटणीचाच आहे.>> अगदी अगदी. मी पहिले दोन तीन भागच बघितले. डोक्यात जाते अगदी. मालिका सुरु झाली कि ताबडतोब बंद Happy

स्पृहाचे ड्रेसेस ईतके ढगळे ,भडक रंगाचे आणि नवशिक्या टेलर ने शिवल्यासारखे का दिलेत?
तिची उंची (आणि वाढलेली जाडी ) बघून तरी वेषभूषा ठरवायची ........१०० दा अनुमोदन......

ती ईशा नाही कुहूच वाटतेय>>>>> हो ना, तिचं जे घर दाखवलंय (अत्यंत बोअर माणसांनी खच्चून भरलेलं) ते पण एलदुगो तलं काळ्यांचच घर आहे. त्यामुळे आता कुठल्याही क्षणी स्पृहा जोशी ए..मला कविता झालीए म्हणेलसं वाटत राहतं.

चनस आणि रीया,
ते डायलॉग्ज डोक्यात जातायत.... म्हणजे ते जेंव्हा पहिल्यांदा म्हटले तेंव्हाच कळलं की आता कायम हे यांचे असे नाही नाही नाही नाही हो हो हो चालू राहणार....

बाकी कुहू होती तिथेच आहे अजून .... डोक्यात बरी जाऊ देइइन Wink

स्पृहाचे ड्रेसेस ईतके ढगळे ,भडक रंगाचे आणि नवशिक्या टेलर ने शिवल्यासारखे का दिलेत? >> ड्रेसेस ची पॅटर्न् आऊटडेटेड आहे. दीड दोन वर्षांपुर्वी ही पॅटर्न् इन होती.

कालच ही मालिका पहिल्यान्दा बघितली. टायट्ल साँग पासून डोक्यात गेली.
सचिन च्या आवजातील टायट्ल साँग ऐकून सचिन बद्दलचा राग द्विगुणित झाला.
सचिन ला एक अक्कल नाही हे मान्य पण सलील कुलकर्णी नी कसं काय त्याला गायला दीलय देव जाणे.
पण काल स्पृहाचा काका की बाबा मोआ. जवळ बसून मल्हार मस्त आळवत होता. Happy Happy

सचिनचा टायटल साँगमधला आवाज कसला नाकातून आहे.... जुन्या चित्रपटात बायका जात्यावर पीठ दळत असत तेव्हा असल्या आवाजात गाणी असत.

कोणी बघतंय का मालिका? तो उमेश कामतच्या काकची भुमिका करणारा कलाकार कोण आहे? छान काम करतोय तो. काल खुप दिवसांनी मालिका बघितली आणि त्याचा पार्ट आवडला. त्याचे कालचे संवाद आणि बेअरिंग मस्त होते. स्पृहाच्या मैत्रिणीचं काम पण चांगलं होतं काल. स्पृहानी डिनरला जाताना घालायसाठी काढलेले ड्रेसेस एकापेक्षा एक याक होते!

उमेश कामतच्या काकांचे काम 'सागर तळाशिलकर' याने केले आहे, तो असतो बऱ्याच मालिकेत. मी नाही बघत ही मालिका पण एक-दोन एपिसोड बघितलेत त्यामुळे सांगते.

अच्छा, सागर तळाशिलकर का? थँक्स अंजू. मी हे नाव खुपदा ऐकलंय, त्यांचं कामही पाहिलंय, पण हेच ते माहिती नव्हतं. या मालिकेत वजन वाढलेलं आहे त्यांचं बरंच. पण रोल आणि अभिनय दोन्ही मस्तंय. उमेशसोबतचं टायमिंग पण छान होतं कालचं.

त्याचे नाव सागर तळाशिकर. असंभव, अवंतिका सारख्या मालिकांमध्ये आणि बर्‍याच चित्रपटांमध्ये काम केले आहे त्याने. चांगला अभिनेता आहे. अवंतिका मध्ये आणि गुंतता हृदय हे मध्ये फार चांगलं काम केलं होतं त्याने.

रच्याकने... ही मालिका पाहत नाही. त्यामुळे यातील काम माहीत नाही

हो, मोहन जोशींचा रोल भारीच आहे, तेही एंजॉय करताहेत हे अगदी दिसतंय Happy
काल त्या लाल शर्ट आणि काळ्या सुटमधे चांगले दिसत होते.

या मालिकेतील प्रॉपर्टीचे रंग एकवढे भडक का ठेवलेत? की येथेही कल्पनादारीद्र, प्रेक्षकांना गृहीत धरणे चालू आहे?

बऱ्याच साऱ्या गोष्टी खटकत असूनही ही मालिका सध्यातरी pleasant वाटते आहे! इशाच्या (स्पृहा ) आईचे काम कोण करत आहे? चेहरा माहितीचा आहे पण नाव माहिती नाही. त्यांचे काम आवडले. मला शुभांगी गोखले आवडतातच! सो त्यांचेही काम छान आहे! या मालिकेत काही काही विनोदी पंचेस छान जमून येतात ते पाहायला मजा येते!
बाकी स्पृहाचा वॉर्डरोब भ यं क र आहे! म्हणजे कुणाला तरी ते भडक कपडे शोभून दिसतीलही पण स्पृहाला ते आजिबात शोभत नाहीत!

Pages