सोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति

Submitted by प्रीति on 17 September, 2013 - 22:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सारण-
२ मक्याच्या कणसाचे दाणे
३ वाट्या बारीक किसलेले पनीर
(जेवढे पनीर तेवढेच मक्याचे दाणे)
मिरची बारीक चिरुन चवीनुसार
एक मध्यम कांदा बारीक चिरुन
जिरे, मोहरी, तेल, मीठ
पारी-
कणिक ४ वाट्या
अर्धी वाटी कोथिंबीर चिरुन
अर्धा चमचा ओवा
मिठ
अर्धा चमचा जवसाची पुड (माझ्या कणकेत घातलेलीच असते)

क्रमवार पाककृती: 

कणकेत, कोथिंबीर, ओवा, जवसाची पुड, मीठ घालुन मळुन घ्यावी.
कणसं पाण्यात उकडुन, त्याचे दाणे सुरीने काढुन घ्यावे. पनीर किसुन घ्यावे.
पॅनमधे तेल तापवावे, त्यात मोहरी, जिरे तडतडले की कांदा आणि मिरची चांगली परतुन घ्यावी. कांदा ब्राऊन झाला पाहिजे. मग त्यावर पनीर आणि मका, मीठ घालुन गॅस लगेच बंद करावा. मिश्रण चांगले एकत्र करावे.

गार झाल्यावर सारण भरुन बटर लाऊन पराठा खरपुस भाजुन, गरमा गरम वाढावा.

वाढणी/प्रमाण: 
८-१० पराठे
अधिक टिपा: 

पाहिजे असल्यास फोडणीत धने ठेचुन घालावे.
दही, शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्या सोबत मस्त लागतात.
ताज्या मकाचे दाणे फारच मस्त वाटतात.
मका बारीक न केल्याने खाताना मस्त वाटतं.
सगळे जिन्नस सहज पणे उपलब्ध होणारे आहेत Happy
सारण एक सारखे पसरण्यासाठी पराठ्यात सारण असे भरुन मग मोदकासारखा भाग वर ठेऊन लाटावा.

माहितीचा स्रोत: 
पनीर पराठ्याचे व्हेरीएशन
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त रंग आलाय पराठ्यांना. आतले स्टफिंगही कळून येतेय म्हणजे पातळ लाटला आहे का? भाजताना फुटला नाही?

लाटायला त्रास नाही का होत अख्खे मक्याचे दाणे घेतल्याने .. >>> मलाही हा प्रश्ण पडलाय.
मस्त रेसिपी, निवडक १० ठेवली आहे. लेकीच्या डब्यासाठी करुन बघेन.

आज करून बघितले पराठे. मस्त झाले. मी सारणात थोडा चाट मसाला पण घातला. प्रीती, पाकृसाठी धन्यवाद आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा!!

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

मी काल करून पाहिले. चवीला अतिशय सुंदर झाले होते. फक्त मक्याचे दाणे थोडे कमी उकडले गेल्यामुळे लाटताना थोडे बाहेर आले. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. बाकी सारण चवीला इतके छान झाले होते की उरलेले सारण पोळीबरोबर सहज संपले.

सशल, नाही होत त्रास लाटताना.
भरत मयेकर, न फुटण्यासाठी स्टेप बाय स्टेप फोटो दिलेत, असे केल्याने बिलकुल फुटत नाही.
सुनिधी, अनुश्री. , स्वाती आंजर्लेकर, माधुरी१०१, झंपी , कविता २ धन्यवाद!
नीलमपरी, वावे, अल्पना करुनही बघितल्याबद्दल खुप धन्यवाद Happy

Pages