सारण-
२ मक्याच्या कणसाचे दाणे
३ वाट्या बारीक किसलेले पनीर
(जेवढे पनीर तेवढेच मक्याचे दाणे)
मिरची बारीक चिरुन चवीनुसार
एक मध्यम कांदा बारीक चिरुन
जिरे, मोहरी, तेल, मीठ
पारी-
कणिक ४ वाट्या
अर्धी वाटी कोथिंबीर चिरुन
अर्धा चमचा ओवा
मिठ
अर्धा चमचा जवसाची पुड (माझ्या कणकेत घातलेलीच असते)
कणकेत, कोथिंबीर, ओवा, जवसाची पुड, मीठ घालुन मळुन घ्यावी.
कणसं पाण्यात उकडुन, त्याचे दाणे सुरीने काढुन घ्यावे. पनीर किसुन घ्यावे.
पॅनमधे तेल तापवावे, त्यात मोहरी, जिरे तडतडले की कांदा आणि मिरची चांगली परतुन घ्यावी. कांदा ब्राऊन झाला पाहिजे. मग त्यावर पनीर आणि मका, मीठ घालुन गॅस लगेच बंद करावा. मिश्रण चांगले एकत्र करावे.
गार झाल्यावर सारण भरुन बटर लाऊन पराठा खरपुस भाजुन, गरमा गरम वाढावा.
पाहिजे असल्यास फोडणीत धने ठेचुन घालावे.
दही, शेंगदाण्याची चटणी किंवा लोणच्या सोबत मस्त लागतात.
ताज्या मकाचे दाणे फारच मस्त वाटतात.
मका बारीक न केल्याने खाताना मस्त वाटतं.
सगळे जिन्नस सहज पणे उपलब्ध होणारे आहेत
सारण एक सारखे पसरण्यासाठी पराठ्यात सारण असे भरुन मग मोदकासारखा भाग वर ठेऊन लाटावा.
मस्त रंग आलाय पराठ्यांना.
मस्त रंग आलाय पराठ्यांना. आतले स्टफिंगही कळून येतेय म्हणजे पातळ लाटला आहे का? भाजताना फुटला नाही?
लाटायला त्रास नाही का होत
लाटायला त्रास नाही का होत अख्खे मक्याचे दाणे घेतल्याने .. >>> मलाही हा प्रश्ण पडलाय.
मस्त रेसिपी, निवडक १० ठेवली आहे. लेकीच्या डब्यासाठी करुन बघेन.
वॉव.... सहि !! ओन्ली पराठाज
वॉव.... सहि !! ओन्ली पराठाज चि आठवण झाली.
मुलांच्या डब्ब्या साठी मस्त
मुलांच्या डब्ब्या साठी मस्त ऑप्शन आहे
तव्या वरून ताटात मिळत असेल तर जबरीच लागणार !!!
आज करून बघितले पराठे. मस्त
आज करून बघितले पराठे. मस्त झाले. मी सारणात थोडा चाट मसाला पण घातला. प्रीती, पाकृसाठी धन्यवाद आणि स्पर्धेसाठी शुभेच्छा!!
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.
पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383
मी काल करून पाहिले. चवीला
मी काल करून पाहिले. चवीला अतिशय सुंदर झाले होते. फक्त मक्याचे दाणे थोडे कमी उकडले गेल्यामुळे लाटताना थोडे बाहेर आले. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन. बाकी सारण चवीला इतके छान झाले होते की उरलेले सारण पोळीबरोबर सहज संपले.
मी हे करणार उद्याला.
मी हे करणार उद्याला.
अतिशय सोपि आनि सुरेख, नक्कि
अतिशय सोपि आनि सुरेख, नक्कि करनार.धन्यवअद प्रिति.
करून बघितला. छान चव आहे.
करून बघितला. छान चव आहे. मुलाला खूप आवडला.
सशल, नाही होत त्रास
सशल, नाही होत त्रास लाटताना.
भरत मयेकर, न फुटण्यासाठी स्टेप बाय स्टेप फोटो दिलेत, असे केल्याने बिलकुल फुटत नाही.
सुनिधी, अनुश्री. , स्वाती आंजर्लेकर, माधुरी१०१, झंपी , कविता २ धन्यवाद!
नीलमपरी, वावे, अल्पना करुनही बघितल्याबद्दल खुप धन्यवाद
Pages