मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १२ (मवा)

Submitted by संयोजक on 15 September, 2013 - 02:11

मायबोली आयडी - मवा
पाल्याचे वय - साडेचार वर्षे

mavaa letter.JPG1_.png

मुलीला मराठी लिहीता येत नाही. तिने मला मराठीतून मजकूर सांगितला. तो मी जसाच्या तसा तिला लिहून दिला. मग तिने त्यावर पेन्सिलने गिरवले. आणखी २-३ वाक्ये होती, पण ही पहिलीच वेळ असल्याने मला ती इतके गिरवेल याची खात्री नव्हती म्हणून मी ती गाळली.

मवा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा, धन्यवाद लोला, मृण्मयी, मामी, साती. Happy

संयोजक, हे पत्र माझ्या धाकट्या लेकीचे आहे. मोठीलाही लिहायला सांगितले होते, तिने लिहीले आहे, पण पूर्ण केले नाही, त्यामुळे मला ते पाठवायचे नव्हते. ते इथे प्रतिसादात दिले तर चालेल का ?

तुला काय हवंय ते सांग >>>>> खूपच गोड लिहिलंय ....
शेअरिंगची आयडिया पण खूप मस्तचे .....

मवा,
हा उपक्रम लहान मुलांना मराठीची गोडी लागावी याकरिता एक छोटासा प्रयत्न या भावनेतुन ठेवण्यात आला आहे. ते पत्र नव्या धाग्यावर अपलोड करायची इच्छा असेल तरी चालेल आणि इथे प्रतिसदात दिले तरी चालेल. कदाचित त्या पत्रावर येणारे प्रतिसाद ऐकुन पत्र पुर्ण करण्याची इच्छा होऊ शकेल. Happy

मस्तच.

मस्त Happy

बाप्पाला 'तुला काय हवय' विचारणारं हे पहिलच पत्रं असावं...!
एव्हड्या लहान वयात सुध्दा शेयर करयाची तयारी... कौतूकास्पद आहे!

भारी! Happy

आणखी २-३ वाक्ये होती, पण ही पहिलीच वेळ असल्याने मला ती इतके गिरवेल याची खात्री नव्हती म्हणून मी ती गाळली.

>> ती वाक्य कोणती हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे..

सगळ्यांचे खूप खूप आभार !!

धन्यवाद संयोजक. :). इथेच देते तिचे पत्र. खरेतर तिनेही मोठे पत्र बनवले होते, पण सगळे फ्रेंड्स बाहेर खेळायला बोलवत होते म्हणून मधे सोडून गेली व परत मुहूर्त लागला नाही.

हे तिचे पत्र. वय वर्षे ८ (आता ८ होईल लवकरच)

IMG_7348.JPG

हिचेही पत्र मोठे होते त्यात 'तू १० च दिवस का राहतोस ?' हा एक प्रश्न होता. पण मुख्य भर गणपतीला 'तू पण मला नक्की पत्र लिही' यावर होता. Happy तिला सध्या मराठी लिहायची अजिबात प्रॅक्टिस नाहीये.

अजून एक गंमत - ती पत्र लिहीत असतानाच फ्रेंड्स आल्यामुळे 'तू हे काय लिहीतेयस?' वगैरे बोलणे झाले, त्यानंतर तिच्या मित्राने मला सांगितले की माझा फेवरेट गॉड कृष्ण आहे तर मी कृष्णाला पत्र लिहीणार आहे आता. :). त्यावर लेकीने सांगितले की मराठीतूनच लिही नक्की. सो, मायबोलीचा हा उपक्रम अजून रोपटी लावत आहे.

ती वाक्य कोणती हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.. >> पियु परी, १-२ वाक्ये मला आठवताहेत ती म्हणजे 'तुझ्याकडे टॉईज आहेत का ? तू कोणाशी खेळतोस का ?' अश्या टाईपची होती.

ही "छोटी" वाटतंच नाहीये - कस्ली भारी एकेक विचारतेय ना - तू स्पेसमधे रहातोस का ? तू इन्विजिबल आहे का ? फ्युचरमधे काय होतं तुला माहिती आहे का ? ----- सर्वच गोड आहे अगदी .....

दुसरं पत्र पण कसलं भारीये Happy

त्यानंतर तिच्या मित्राने मला सांगितले की माझा फेवरेट गॉड कृष्ण आहे तर मी कृष्णाला पत्र लिहीणार आहे आता. त्यावर लेकीने सांगितले की मराठीतूनच लिही नक्की. सो, मायबोलीचा हा उपक्रम अजून रोपटी लावत आहे
>>>>>
Happy

Pages