आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

Submitted by डॉ अशोक on 10 September, 2013 - 12:23

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.

पैठणला असतांना एकदा रात्री अवेळीच कॉल आला. सर्वसाधारणपणे दवाखान्याचा चपराशी कॉल घेवून घरी येत असे. (तेंव्हा मला घरी सुद्धा टेलीफोन सुविधा नव्हती). या वेळी मात्र चपराशा बरोबर पोलीस हवालदार होता. मी विचारणा केली, पण तो हवालदार (नेहेमीचा असूनही) काही बोलेना. मामला गंभीर असावा! दवाखान्यात पोहोचलो, तो तिथं दहाबारा पोलीस, दोन तीन इन्स्पेक्टर असा मोठा लवाजमा जमलेला.माझ्या मनात विचार आला: "काय खूना बिनाची केस आहे की काय!"

आत गेल्यावर मी पेशंट कडे गेलो आणि आता मात्र खरंच आश्चर्यचकित झालो. चांगली उंचीपूरी देहयष्टी. वाढलेल्या दाढीमिशा आणि त्यामुळे दिसणारं उग्र रूप असा तो पेशंट. मी विचारपूस आणि तपासणी केली. पेशंटचं आणि माझं दोघांचही एकमत झालं. काहीही झालेलं नाही! एक गोष्ट मात्र मला अजिबात आवडलेली नव्हती कारण पेशंटला पलंगाशी बेड्यांनी जखडून ठेवलेलं होतं. आता असं करायला तो पेशंट म्हणजे काही खुनी किंवा दरोडेखोर नव्हता. तर ते होते प्रसिद्ध दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे! ते दिवस मराठवाडा नामांतर चळवळीचे होते. आणि कवाडे पोलीसांना गुंगारा देत अचानक कधी इथे तर कधी तिथे असे अचानक प्रगट व्हायचे! त्या दिवशी मात्र ते कसे कुणास ठावूक पण पोलीसांच्या हाती सांपडले होते. पोलीसांची काही अडचण होती, त्यामुळे दुस-या दिवशी न्यायालयापुढे त्यांना हजर करण्या आधी रात्र भर त्यांना दवाखान्यातच ठेवावं ही पोलीसांची विनंती होती. माझी ही काही हरकत नव्हती, मात्र प्रा. कवाडेंसारखा माणूस आपण प्रमुख असलेल्या दवाखान्यात पलंगाला बेडीनं जखडून ठेवलेला आहे हे काही मला पचनी पडत नव्हतं. मी पोलीसांना ते बोलूनही दाखवलं. पण ते ऐकेनात. बरीच हुज्जत घातल्यावर मी लेखी हमी घेतली तर बेडी काढायला पोलीस तयार झाले. आमच्या दवाखान्यात तेंव्हा एक्स-रे मशीन बसवण्यासाठी तीन खोल्यांचं बांधकाम नुकतंच झालं होतं. त्याला स्वतंत्र टॉयलेट होतं. मुख्य म्हणजे स्वतंत्र प्रवेशद्वार होतं, तिथं पाहिजे तर पोलीस ठेवता येतील हे मी पोलीसांच्या निदर्शनास आणून दिलं. माझी लेखी हमी घेवून आणि तरी ही पोलीसांची मोठी नाराजी स्विकारून आम्ही कवाडेंना त्या नव्या खोलीत शिफ्ट केलं आणि मी रात्री एक दीडला घरी आलो.

रात्रभर मला झोप आली नाही. पोलीसांच्या हातावर तूरी देवून आणि आमच्या नवीन बांधकाम केलेल्या खोलीची भिंत फोडून कवाडे पसार झाल्याची स्वप्न मला पडत होती. एकदा तर मीच मला पोलीसांनी बेड्या ठोकलेल्या अवस्थेत पाहिलं. मला दरदरून घाम फुटून जाग आली. घड्याळात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजलेले. काही वर्तमान घ्यावं म्हटलं तर त्याकाळी घरी सुद्धा फोन नव्हता. शेवटी मी सकाळी आठलाच दवाखान्यात पोहोचलो. वातावरण शांत दिसत होतं. मी तडक कवाडेंना ठेवलं होतं त्या खोलीकडे गेलो. ते उठलेले होते. त्यांनी हंसून माझ्याकडे पाहिलं. ते बेड्या प्रकरण त्यांच्या कानावर गेलं होतं. मी मोकळेपणानं माझं टेन्शन, रात्रीची माझी अवस्था त्यांना कथन केली. ते म्हणाले: "डॉक्टर, अहो मग मला सांगायचं. पण इन एनी केस मी दवाखान्यातून पळून जावून तुम्हाला कधीच अडचणीत आणलं नसतं".. आणि ते मोकळे पणाने हंसले. आता मात्र मी ही त्यांच्या हंसण्यात सामील झालो. प्रा. कवाडेंना हा प्रसंग आठवतो कां नाही मला माहित नाही, पण मी जेंव्हा केंव्हा त्यांचं नाव पेपर मधे वाचतो तेंव्हा तो प्रसंग मला आठवल्याखेरीज रहात नाही.

-अशोक

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रा.जोगेन्द्र कवाडे केवळ दलित चळवळीत असणार्‍यांनाच्याच चांगल्या परिचयाचे आहेत असे नव्हे तर शिक्षणक्षेत्रात होत असलेल्या कित्येक घडामोडीशी त्यांचा अगदी अ‍ॅक्टिव्ह सहभाग असतो. त्यांचे "...इन एनी केस मी दवाखान्यातून पळून जावून तुम्हाला कधीच अडचणीत आणलं नसतं".....हे वाक्य त्यांच्या स्वभावाचे द्योतकच आहे. त्यानाही तुमच्यावर ओढवलेल्या त्या अवघड प्रसंगाची नक्की जाण असणार, डॉक्टर.

मात्र तुमची त्या रात्री उडालेली झोप हा अनुभवही अगदी [तुमच्या दृष्टीने] अंगावर येणाराच होता.

आगळा वेगळा अनुभव. तुमच्या अशा अनुभवांची शिदोरी पुस्तकरूपाने प्रकाशित व्हावी. त्या त्या काळच्या घटनांचे संदर्भही तुमच्या कथनात छान येताहेत.

(हे आपलं सहजच . एका साधकाची चौकशी केली म्हणून धर्मावर संकट आला असं अरण्यरूदन करणा-या संघटनांनी त्यावेळी एका हिंदूला पोलीसांनी साखळदंडाने का जखडून ठेवलं म्हणून केव्हढा आक्रोश केला असेल नै ? )

धन्यवाद मंडळी !!

मुद्दाम हुसेन.....

"त्यावेळी एका हिंदूला पोलीसांनी साखळदंडाने का जखडून ठेवलं म्हणून केव्हढा आक्रोश केला असेल नै ?"

नाही, असं काही ही झालं नाही तेंव्हा !

मुद्दाम हसेन,

>> त्यावेळी एका हिंदूला पोलीसांनी साखळदंडाने का जखडून ठेवलं म्हणून केव्हढा आक्रोश केला असेल नै ?

मला नाही वाटत तसं. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीविरुद्ध जाऊन 'दलित मुस्लिम महासंघ' स्थापणार्‍या (तोही हाजी मस्तानला सोबत घेऊन!) माणसाची हिंदुत्ववाद्यांनी फारशी चिंता केली नसावी.

आ.न.,
-गा.पै.

अहो गापै
तुम्ही कॅलेंडर मागेपुढे का करताय ? आधी नामांतरवादी चळवळ झाली ना ? त्यावेळी साखळदंडाने बांधण्याची घटना झाली असेल कि नै ? तो तुमचा नावडता शब्द नंतर आला असेल, पण म्हणून आधीच भविष्यात पाहून डोळेझाक करून चिंता न करण्याची कला कशी काय जमली असेल हिंदुत्ववाद्यांना ?

वेगळा आणि भन्नाट अनुभव,
लिहिलायही छान, आणि लेखाचं नावही मस्त....

विस्मया,

>> तो तुमचा नावडता शब्द नंतर आला असेल, पण म्हणून आधीच भविष्यात पाहून डोळेझाक करून चिंता न
>> करण्याची कला कशी काय जमली असेल हिंदुत्ववाद्यांना ?

अहो, उत्तर एकदम सोप्पं आहे. मुद्दाम हसेन यांना जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी हिंदुत्ववादी बोंबलतांना दिसतात, तशाच आम्हाला भविष्यकाळातील घटना दिसतात. Proud मुद्दाम हसेन यांचा सत्संग लाभला की अंगी विविध शक्ती आपोआप जागृत होतात. प्रस्तुत सिद्धी त्यापैकीच एक आहे! Lol

आ.न.,
-गा.पै.

गा पै......

"बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीविरुद्ध जाऊन 'दलित मुस्लिम महासंघ' स्थापणार्‍या (तोही हाजी मस्तानला सोबत घेऊन!)...."

प्रा. कवाडेंची ही बाजू, खरंच सांगतो, माहित नव्हती.... !!

डॉ अशोक,

>> प्रा. कवाडेंची ही बाजू, खरंच सांगतो, माहित नव्हती.... !!

दमुम हा प्रकार नामांतराच्या बराच नंतरचा आहे. तसंही पाहता हिंदुत्ववाद्यांचा उल्लेख इथे करायची गरज नव्हती.

रुग्ण कसाही असला तरी साखळदंडाने बांधूनबिंधून ठेवायचा नसतो. जर काहीच झालं नव्हतं तर रुग्णालयात भरती केलं कशाला? तर पोलिसांना प्राध्यापकमहाशयांना दडवून ठेवायचं होतं म्हणून. दवाखान्याचा असा उपयोग करणं चुकीचं आहे. एकदा का खाटेवर रुग्ण आला की डॉक्टर म्हणेल ती पूर्व दिशा व्हायला हवीच. इथे रुग्णाच्या पार्श्वभूमीचा काही संबंध नाही.

तरीपण मुद्दाम हसेन यांना यातून हिंदुत्ववादी लोकांवर शरसंधान करावंसं वाटलं. हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र त्या अनाठायी शेर्‍यांतून हिंदुत्वाची बदनामी होऊ नये एव्हढ्याचसाठी मी प्रतिवाद केला.

आ.न.,
-गा.पै.

मुद्दाम हसेन,

१.
>> कशाला तुमच्या घाणेरड्या राजकारणाचं समर्थन करताय ?

मी कधीही नामांतराच्या राजकारणात पडलेलो नाही. मला बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला देणं मान्य आहे. तुम्ही हिंदुत्ववाद्यांचा अनाठायी उल्लेख केलेला आहे. मी नाही.

२.
>> उलट म्हणता येइल मराठवाडा दंगली घडल्या म्हणून दलित मुस्लीम सुरक्षा महासंघाची स्थापना झाली..

हो का? मग त्यासाठी हाजी मस्तान बरा सापडला! सगळे पापभीरू स्वच्छ मुसलमान जणू सगळे संपले की काय!

३.
>> ... म्हणून तर कवाडेंनी दुसरीकडे घरोबा केला नसेल ना ?

हे प्राध्यापक कवाडेंना विचारायला पाहिजे.

४.
>> गापै बुद्धीभेद करण्यात निष्णात आहेत.

आहेच मुळी. प्रश्नच नाही.

तुम्ही कसं गंमतीत हिंदुत्ववाद्यांना फरपटत खेचून आणलंत या बाफवर विनाकारण. मग अशा अनाठायी बुद्धीचा गंमतीजंमतीने भेद केला तर काय बिघडलं?

आ.न.,
-गा.पै.

मुद्दाम हसेन,

१.
>> आसाराम बापूंसारख्या गुन्हेगाराला हिंदुत्ववाद्यांच्या नजरेतून डिफेंड करताय

आजून गुन्हा सिद्ध व्हायचाय!

२.
>> कुणाला निरुपयोगी म्हणताय म्हटल्यावर तुमचा हिंदुत्ववाद किती पोकळ आणि ढोंगी आहे हे
>> दाखवायला नको का ?

तुमचं जे काय असेल ते खुशाल जगाला दाखवा. पण या बाफवर विषयबाह्य पद्धतीने नको. भलत्या ठिकाणी सलत्या गोष्टी दाखवीत सुटला आहात तुम्ही.

३.
>> तुमच्या दॄष्टीने काही लोक हिंदू नाहीतच हे दाखवून द्यायला इथं हिंदुत्ववाद्यांना डिवचलं.

या बाफचा हिंदूंशी वा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही.

४.
>> त्या दंगलींबाबतची तुमची संवेदनशीलता समजली आणि विचार तर जगजाहीर आहेतच.

विचार आहेतंच मुळी जगजाहीर. त्याचसाठी तर इथे मायबोलीवर लिहितोय.

दंगलींविषयी म्हणाल तर त्या थांबल्या पाहिजेत एव्हढंच मला ठाऊक आहे. भले हेतू कितीही उच्च असला तरी त्यासाठी दंगली करू नयेत.

५.
>> त्यापेक्षा उघड भूमिका घेणारे कधीही परवडले.

हाजी मस्तानसोबत पाट लावायची ही जी भूमिका कवाडेंनी घेतलीये ना, ती किनई आंबेडकरांना घेता आली असती. का बरं घेतली नाही त्यांनी? ओळखा पाहू!

आ.न.,
-गा.पै.

मुद्दाम हसेन,

१.
>> पण तुमच्या असंबद्ध प्रतिसादांमुळे इथे हिंदुत्ववादी सक्रीय का नव्हते ही शंका उपस्थित झाली, ज्याला
>> तुम्हीच जबाबदार आहात.

हिंदूंचं नाव काढलंत कशाला? हिंदुत्व वा नामांतर चळवळ या विषयांशी या बाफ निगडीत नाही.

हे पहा तुमचेच शब्द :
>> एका हिंदूला पोलीसांनी साखळदंडाने का जखडून ठेवलं म्हणून केव्हढा आक्रोश केला असेल नै ?

असंबद्ध प्रतिसाद देऊन काड्या घालण्याचा उपद्व्याप तुम्ही केला आहे. आणि सोंग आणताय जणू जनतेवर उपकार केल्याचे.

२.
>> तुमच्या इतरत्र असलेल्या बडबडीतून इतकाच सारांश काढता येईल कि दलितांवरचे अत्याचार हा काही
>> हिंदुत्ववाद्यांचा अजेंडा नाही.

हिंदुत्ववादी कशाला दलितांवर अत्याचार करतील? आणि इतरत्र असलेल्या मजकुराचा या बाफशी काय संबंध?

असो.

हेमाशेपो नाही.

आ.न.,
-गा.पै.

अहो मुद्दाम हसेन,

का या चांगल्या धाग्याची मुद्दाम वाट लावताय.
जी काही गरळ ओकायची आहे ती दुसरीकडे जाऊन ओका.

या धाग्यावर प्रतिसादातून आलेले काही "मुद्दे"......
१. धर्मावर संकट आला असं अरण्यरूदन करणा-या संघटना......
२. 'दलित मुस्लिम महासंघ" स्थापणारा माणूस.....
३. ...जळी-स्थळी-काष्ठी -पाषाणी बोंबलणारे हिंदूत्ववादी .....
४. बॉम्ब स्फोट करणारे साधक ....
५. आम्हाला प्रात:स्मरणीय असलेले आंबेडकर....
६. गोध्रा घडलं म्हणून गुजरात घडलं.....
७. हाजी मस्तानचा पैसा फिल्म इंडस्ट्रीला आणि अनेकांना छुप्या मार्गाने चालत होताच....
८. लॉंग मार्च काढणारे कवाडे
९. मराठवाडा दंगली घडल्या म्हणून दलित मुस्लीम सुरक्षा महासंघाची स्थापना झाली..
१०. आसाराम बापूंसारख्या गुन्हेगाराला......
११. हाजी मस्तानसोबत पाट लावायची ही जी भूमिका कवाडेंनी घेतलीये ना.......

या प्रत्येक मुद्यावर एक स्वतंत्र धागा काढून चर्चा होवू शकते !!!!

मुद्दाम हसेन,

१.
>> हा बाफ त्यासाठी न्नाही हे मान्यच.

हे शहाणपण आधी नाही सुचलं आपल्याला?

२.
>> पण याच काळात इतर सर्व बाफ या विषयाकडे वळवताना ते आठवलं नाही का ?

मी कुठलाही बाफ वळवत नाही. मी केवळ प्रतिसाद देतो. इतर कोणी असे बाफ वळवले तर त्याचा राग या बाफवर काढू नये. कृपया विषयाला धरून बोलावे.

३.
>> ... उर्जा राखूण ठेवत आहे. मुद्द्यावर आलात को बोलू.

म्हणजे आतापर्यंत केली ती सगळी बडबड वायफळ होती तर! Lol

चालूद्या!

आ.न.,
-गा.पै.

Pages