मायबोली गणेशोत्सव २०१३ : उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. ६ (प्राची)

Submitted by संयोजक on 10 September, 2013 - 09:22

मायबोली आयडी : प्राची
पाल्याचे नाव : मिहिका
वय : नऊ वर्षे

MBupkram.jpg

गणेशोत्सव आला की मायबोलीवर यावर्षी कोणता उपक्रम असेल याची जाम उत्सुकता असते मिहिकाला. यावर्षी सहामाही चालू असल्याने उपक्रमात भाग घेता येईल का याविषयी मी जरा साशंकच होते. पण पत्र लिहायचे आहे म्हटल्यावर बाईसाहेब लगेच तयार झाल्या. शाळेतून आल्यावर जेवण झाल्याझाल्या चक्कचक्क पत्र लिहायला बसली. आधी कच्चा मसुदा, मग परत वाक्यरचना वगैरे दुरुस्त करून पत्र लिहिले आहे. तिला हिंदी लिहिता येते, पण मराठीत १ल्यांदाच लिहिले आहे. दंडाऐवजी पूर्णविराम द्यायचा, 'ळ' कसा लिहायचा, बरोबर मात्रा कश्या लिहायच्या याबाबत मी मार्गदर्शन केले आहे. बाकी काही मदत नाही. Happy

आम्हां महाराष्ट्राबाहेर राहणार्‍यांच्या मुलांना मराठीच्या अजून जवळ नेणारा हा उपक्रम खूप आवडला.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे की गं अक्षर. स्मित. एकदम सिन्सियर पत्र आहे.>>>>>>>>>>++१००..........:स्मित:
चांगली मुलगी बनायचं आहे हे खूप आवडलं.

हर्पेन, मायबोलीवर पत्र द्यायचे आहे म्हणून अगदी निगुतीने, मन लावून कोरून अक्षर काढले आहे हो. Lol

सगळ्या प्रतिसादकांना खूप खूप धन्यवाद.

मिहीका, तुझं अक्षर छान आहे गं! तू याचा प्रिंट आऊट घे आणि पुढच्या वेळी घरात कोणी अक्षरावरून बोललं की तो प्रिंट आउट दाखव बघू.
तुला गोष्टींचं पुस्तक नक्की मिळेल.

प्राची, मग 'मायबोलीवर टाकायसाठी अभ्यासातला कुठलाही भाग कधीही मागणारेत' असे सांग म्हणजे नेहेमीच असे अक्षर काढेल. Happy

Pages