मायबोली गणेशोत्सव २०१३: उपक्रम "बाप्पाला पत्र" प्रवेशिका क्र. १ (अल्पना)

Submitted by संयोजक on 8 September, 2013 - 06:03

मायबोली आयडी : अल्पना
पाल्याचे नाव : आयाम देपुरी
वय : सव्वापाच वर्षे

Aayam (Alpana)_letter to Bappa.JPG

या पत्रातले शब्द, वाक्य पुर्णपणे मुलाचे आहेत. त्याला पत्र नक्की काय असतं हे माहित नव्हतं. त्यासाठी मी त्याला गणेशोत्सवाची जाहिरात वाचून दाखवली होती. तसेच पत्राचे मायने काय काय असतात, शेवटी काय लिहितात हेही सांगितले होते. त्याने पत्राचा मजकुर मला सांगितल्यावर मी आधी पत्र लिहून काढले आणि मग त्याला डिक्टेट केले. त्यासाठी त्याला कुठे काना /मात्रा/ वेलांटी द्यायची हे सांगितले.
अजून तो देवनागरी मुळाक्षरे लिहायला शिकतोय. काना-मात्रा-वेलांट्या, जोडाक्षरं आणि स्वर अजून शिकवले नाहीत, त्यामूळे ते कसे देतात हे त्याला सांगावे लागले. या उपक्रमामूळे त्याचा काना, मात्रा, उकार आणि वेलांट्या कळाल्या.

धन्यवाद.
अल्पना

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"तुम्ही आईला डांटा " >>>>>>>>>>>>>>>कसलं गोड !! बहुतेक जगातलं प्रत्येक गोडुलं मनातल्या मनात देवाला हेच सांगत असेल.>>>>अगदी अगदी! मस्त लिहिलंय पत्र!...........:स्मित:

>>तुम्ही आईला डांटा.. खुप 'देर..'
हिंदी भाषिक शेजार व मित्र मंडळी असावेत... Happy छानच लिहीलय अक्षर ओळख नसून देखिल!
शिवाय प्रत्त्येक वाक्यात एक नविन गोष्ट आहे हे जाणवलं..

मस्तय Happy
परत एकदा वाचतेय मी सगळी पत्रं,
मलाच बाप्पा व्हावसं वाटतय!
बाप्पा व्हावं आणि या पिल्लांच्या इच्छा पुर्ण कराव्यात!
काश आपल्याक्डे सांटासारखं बाप्पा व्हायचा चान्स असला असता Happy

>>तुम्ही आईला डांटा.. खुप 'देर..'
हिंदी भाषिक शेजार व मित्र मंडळी असावेत.. >>> पंजाबी भाषिक वडील आणि इतर नातेवाईक आहेत. आणि घरी हिंदी, पंजाबी, मराठी, इंग्रजी या चारही भाषा बोलल्या जातात. शेजारी - आजूबाजूला फक्त हिंदी-पंजाबीच. खरंतर तो स्वतः खूप कमी मराठी बोलतो. दिवसातून थोडा वेळ आमच्या दोघांचा पूर्ण मराठी भाषा वेळ असतो आणि थोडा वेळ त्याच्या बाबा बरोबर पंजाबीचा वेळ. या दोन्ही भाषांची आवड आणि सवय व्हावी म्हणून.

संयोजकमामा -मावश्यांना मोठ्ठं थ्यँक्यू. आम्ही आज बघितलं प्रशस्तीपत्र.

Pages