किलांबा गार्डन, अंगोला

Submitted by दिनेश. on 5 September, 2013 - 06:05

मी मागे लिहिले होते कि आमच्या कॉलनीत एक मोठी बाग तयार करायला घेतलीय. गेल्या रविवारी गेलो तर तिथे भरभरुन फुले फुलली होती. खरं तर इथे सगळीकडे वाळवंटच आहे पण त्यामधे ज्या मेहनतीने
फुले फुलवली आहेत त्याला खरेच तोड नाही.

मी किती वेळ तिथे रमलो होतो, त्याचा पत्ताच लागला नाही. मन अगदी तृप्त झाले.
आणि मग माझी तृप्ती तुम्हा सर्वांना वाटून टाकावी म्हणतोय....

1

2

3

4

5

6

7

8

9

10

11

12

13

14

15

16

17

18

19

20

21

22

23

24

25

26

27

28

29

30

31

32

33

34

35

36

37

38

39

40

41

42

43

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! काय सुरेख रंग आहेत आणि आकारही वेगवेगळे. Happy
दिनेशेदा, खूप खूप धन्यवाद! Happy

फुलवणारा तो. तो काही हातचे राखत नाही, मग मी कोण ?>>>>>>>>>>>>>>>.दिनेशदा, खरंच मानलं तुम्हाला. अशी निगर्वी भावना क्वचितच पहायला मिळते. तुम्हाला ______________/\_______________. Happy

खुपच सुंदर प्रचि आहेत. खरच 'त्या' च्या सॄजनशीलते पुढे नतमस्तक होण्यातच धन्यता आहे. माणसाची शक्ती त्यापुढे अगदीच फिकी आहे. प्रत्येक फुलापानाचे सौंदर्य वेगळे. प्रत्येकाचा आकार वेगळा. किती वैविध्य.>>>>>>>>>+ १

मस्त.

दिनेश, आपण जेंव्हा पहिल्यांदा फुल काढायला शिकतो तेंव्हा जे आकार काढतो तशीच फुले आहेत बरीचशी.

तुम्ही लाजवताय मला !

हो माधव, सोपे आकार आणि अनवट रंग. खरे तर रंग तीनच. लाल / पिवळा / पांढरा.. पण त्यातूनच किती छटा
तयार केल्यात !

सुंदर

शांकली, खरेच. माझ्या कुठल्याच फोटोवर मी कधी वॉटरमार्क टाकत नाही. केवळ त्या क्षणी मी तिथे होतो आणि माझ्या हाती कॅमेरा होता, एवढेच माझे कर्तृत्व !>>> अगदी अगदी दिनेशदा. त्या नियंत्याच्या कर्तूत्वावर आपल्या नावाचं लेबल लावायला मनच धजावत नाही माझेपण.

फोटो अप्रतिम. आत्मा निवला अगदी.

दिनेशदा ह्यातले आणि स्वित्झर्लंडमधले काही फोटो सेव्ह करू का? (माझ्या कॉम्पुटरमध्ये वॉलपेपर म्हणून ठेवायला)

माझ्या कुठल्याच फोटोवर मी कधी वॉटरमार्क टाकत नाही. केवळ त्या क्षणी मी तिथे होतो आणि माझ्या हाती कॅमेरा होता, एवढेच माझे कर्तृत्व !>>> दिनेश मानल तुम्हाला. फोटो फुलांमुळे तर मस्त आहेतच पण ते काढलेही मस्तच आहेत. एकदम क्लीअर

अन्जू, अगदी अगदी. माझे इथे पोस्ट केलेले सर्व फोटो प्रताधिकार मुक्त आहेत.
आदिति, ती कॅमेराची करामत. माझी चित्रकला काही बरी नाही. पण काही काही फुलांत चक्क ब्रशचे स्ट्रोक्स जाणवतात.
अविनाश, शांकलीने लिहिल्याप्रमाणे या सर्व झिनियाच्या जाती आहेत.

साधना... मी पण तुम्हा लेह-लडाख पार्टीसाठी हेच म्हणतोय.

दिनेशदा धन्यवाद, तुम्ही ते आधीच लिहिले होते तरीपण मी कशासाठी फोटो वापरणार ते तुम्हाला सांगायला हवे असे वाटले.

Pages