ओलेती तू ....

Submitted by पुरंदरे शशांक on 3 September, 2013 - 03:01

ओलेती तू ....

ओलेती तू चिंब अशी ही
लाजलाजूनी बघशी खाली
वस्त्रे सारी भिजून जाता
जागोजागी तुला बिलगली

मधेच तिरपे पाहू नको तू
रोम रोम हा शहारलेला
बटा नको आवरु सखे गं
मी ही आतून आतुरलेला

धुंद असे हे क्षण ओलेते
पुन्हा कधी ना येतील गं
शंका आणू नकोच काही
जन्मभरीची सोबत गं ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली कविता शेवट जरा अजून छान करता आला असता

एक शेर आठवला माझाच्चय

समोर चिंब तू उभी तुला बघून चिंब मी
अजून पावसात मी भिजून का बघायचे ?

छान