फोटोग्राफी स्पर्धा.. सप्टेंबर..."अँगल" "वैशिष्ट्यपुर्ण कोन" निकाल

Submitted by उदयन.. on 2 September, 2013 - 09:33

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " सप्टेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... "अँगल" "वैशिष्ट्येपुर्ण कोन"

निकालः-

पहिला क्रमांकः- अजय पडवळ

1st ajay padwal.JPGविषयाला अनुरुप, योग्य फ्रेम आणि महत्वाच म्हणजे डेप्थ ऑफ फिल्ड उत्तमरीत्या कॅप्चर केली आहे.

द्वितीय क्रमांकः- इन्ना

2nd inna.JPGयात सगळ्यात जास्त आवडली ती फ्रेम. नुसताच पाईप ऑर्गन कव्हर न करता वरील बाजुची लाकडी चौकट कॅप्चर केल्या मुळे फोटोला एक नॅचरल फ्रेम मिळाली आहे त्यातिल गोल आकार फोटोला आणखी उठावदार बनवतो.

तृतिय क्रमांक :- १) प्रसन्ना - दीपमाळ

3rd prasanna deep mal.jpg२) सौरभः- सुर्याचा बल्ब

3rd saurabh.jpgविषयाचा विचार केला तर आम्ही तो असा गृहित धरला होता.... "अश्या कोनातुन काढलेला फोटो जो कोन त्या वस्तु/व्यक्ती/प्रसंगा चा फोटो काढतांना विचारात घेतला जात नाही".... हे दोन्ही फोटो या कल्पनेत योग्य बसतातच पण त्या बरोबर ते एक वेगळा आकार/अनुभुती निर्माण करतात म्हणुन यांची निवड केली आहे.
सौरभ यांनी अचुक टायमिंग साधुन तो फोटो बनवला आहे.. हा सुध्दा एक मुद्दा लक्षात घेतलेला आहे

उत्तेजनार्थः-

१) झकासरावः-

uttejanarth zakas.JPGडोस्याचा मस्त अँगल घेउन घेतलेला फोटो.. त्यामुळे त्या खाद्यपदार्थाकडे बघण्याची वेगळीच दृष्टी मिळते

२) तृष्णा:-

uttejanarath trushna.JPGअँगल अ‍ॅडजेस्ट करुन घेतलेला फोटो आहे... टॉवर चे अगदी सुरवातीचे टोक सुध्दा पुर्ण येईल याची काळजी घेतली आहे...

अश्या पध्दतीचे एक वेगळ्याच फोटोंच्या दुनियेतुन घ्या फोटो.... नेहमी पाहणार्या वस्तुकडे आता वेगळ्याच कोनातुन पाहण्याचा प्रयत्न करा....

यावेळी आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध सांकेतिक स्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे दोन प्रचि माझ्याकडून...

बेडसे लेण्याकडे जाणार्‍या पायर्‍या

ताम्हिणी घाटात कुठेतरी

@ इब्लिस
डॉक, मला वाटते तुम्ही त्या तीन पुरुषांचा फोटो काढला आहे ज्यांचे डोक्यावरील केस कमी आहेत व ते नेमके एकाबाजुस एक असे तिरपे बसल्यासारखे वाटत आहेत खरे म्हणजे त्यातील एक पहिल्या रांगेत बसला आहे.


>>> या अँगल साधण्यातली गम्मत सांगा.
>>> फोटोमधले काहीही एडिटले नाहिये.
त्यात्त काय येवढ विशेष?
पुढे तिन गन्जे, मागे मात्र भरघोस केस मोकळे सोडलेले
अगदी पुढचा निळाशर्टवाला खाली मुन्डी घालून बहुतेक डुलकी काढतोय
डावीकडून टोकाची दुसरि व्यक्ति मागे वळून पहात्ये, (अन अर्थातच ती बा इब्लिसा, तू फोटो काढतोहेस म्हणून तुझ्याकडे बघते असा गैरसमज होऊ शकत नाही, सबब ती कुठे बघते? अन तू कुणाचा फोटू काढू पाहिलास Biggrin हे सर्वाधिक विशेष) Proud
4.gif

आर्या........... एकच प्रतिसादात दोन फोटो टाकावेत..........एक फोटो पहिल्या पानावर एक फोटो ४ थ्या पानावर असे करु नये......

जजेस कोणतेच फोटो ग्राह्य धरणार नाहीत............

१.
375662_607113999307400_1377923186_n.jpg

अल सवादी किल्ला - मस्कत.
किल्ला चढताना उन्च-सखल भागामध्ये असा काही "कोन" तयार झाला कि डोन्गरापल्याड्च्या समुद्रालापण डोकावल्याशिवाय रहावला नाही.....

२. नेकलेस point, भोर, पुणे.

एका ठराविक कोनातुन बघितले तरच असा नेकलेस दिसतो, नाहितर नुसताच नदीप्रवाह....

उजवीकडे धरण अन डावीकडे नदीप्रवाहाचा तयार होणारा ह सुन्दर नेकलेस..पावसाळ्यात तर अधिकच नयनरम्य दिसतो हा point...

1240099_437370959704575_83630812_n.jpg

इंद्राचा फोटू दिसला, वरल्या धाग्याच्या सुरवातीचे उदाहरणाचे फोटूही दिसले, धन्यवाद.
यावेळेस जजेसना अधिकच अवघड होणारे

हर्पेन दुसरा फोटो मस्त. इंद्रा Lol

आर्याचा अँगल पण भारी. एकाच वेळी चंद्रसुर्यदर्शनाचा योग.

deepaa_s यांच्या फोटोवर प्राची सोमण असा मार्क का आहे?
-----------------------------------------------------------------------------------------

....स्पर्धेच्या पानावर वानगीदाखल दिलेले फोटो पिकासामधुन असल्याने दिसत नसल्याने मायबोलीसुविधा न वापरता बाहेरून फोटो टाकल्याबद्दल निषेध !
हे आता लिंबूटींबू यांचे signature वाक्य झालेले आहे Lol

१) रांगोळी - गणेशोत्सवादरम्यान काढलेली ठिपक्यांची रांगोळी

Exif Data -
ISO 100
Exposure 1/200 sec
Aperture 7.1
Focal Length 135mm

Pages