तारपा नृत्य- वारली चित्रकला

Submitted by नलिनी on 30 August, 2013 - 04:41

चित्र काढण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न.

warli_tarpa.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख.
हे कश्यावर (कागद, कपडा, भिंत इइ.) आणि कोणते रंग वापरुन काढलंस हेही लिही ना. आणि हो चित्राचा साइझ पण लिही.

दिनेशदादा, दक्षिणा, अल्पना, धन्यवाद.

खरच! हा पहिलाच प्रयत्न आहे.

अल्पना, मी हे १४.५" x १०.५" आकाराच्या कागदावर पांढर्‍या लिक्वीड पोस्टर कलरने काढलेय. कागद मुळ ह्याच रंगाचा आहे.

हा फोटो चित्र फ्रेम करण्यापुर्वी काढायला हवा होता.

वॉव..सुपर्ब!!!!! ब्रश कोणत्या नंबरचा वापरलास इतक्या फाईन लाईन्स करता?आणी कोणते पेण्ट्स???

आधी ड्रॉकरून घेतलेस का?कशाने??

भारतात असशील्तर ब्रश आणी पेंट्स चे ब्रँड स सांग प्लीज...सोसॉरी फॉर ऑनलाईन धडे द्यायला सांगतेय !!!

वर्षू, चैत्राली, धन्यवाद.

colors.jpg

वर्षू, मी एक नंबरचा ब्रश वापरलाय. कॅमलचा पांढरा पोस्टर कलर वापरला आहे. अ‍ॅक्रेलिक कलर वापरून प्रयत्न करायचा विचार आहे.

साधारण गोलाकार आकार येण्यासाठी समांतर वर्तुळाकार २ रेषा पेन्सिलने काढल्या. फेर धरलेल्या व्यक्तींच्या शरीराचा फक्त मधला भाग पेन्सिलने काढला. बॉर्डरसाठी दोन चौकोन पेन्सिल ने आखले.

तारपा वादक, फेराबाहेरच्या व्यक्ती सरळ रंगानेच काढल्या.

मस्त.

Pages