सुधा मूर्तींच्या कादंबरीवर आधारित 'पितृऋण' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Submitted by माध्यम_प्रायोजक on 28 August, 2013 - 12:23

आयएमई मोशन पिक्चर्स निर्मित व नितीश भारद्वाज दिग्दर्शित 'पितृऋण' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

कृष्णाच्या भूमिकेमुळे घराघरांत पोहोचलेले व दोनदा खासदार असलेले श्री. नितीश भारद्वाज या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत.

विशेष म्हणजे हा चित्रपट ख्यातनाम लेखिका श्रीमती सुधा मूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित आहे.

pitrurun.jpg

अजून एक आनंदाची बाब म्हणजे तमाम चित्रपटरसिकांच्या लाडक्या अभिनेत्री तनुजा या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठीत झळकणार आहेत.

त्यांना साथ देणार आहेत सुहास जोशी व सचिन खेडेकर हे दिग्गज कलावंत.

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

PITRURUN END CREDIT SLATE copy.jpg
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त