मायबोली गणेशोत्सव २०१३ : पूर्णब्रह्म - पाककला स्पर्धा - प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत

Submitted by संयोजक on 28 August, 2013 - 09:46

purnbrahm 2.jpgमुख्य पदार्थ :-
चीज/पनीर + फळ
चीज/ पनीर +मका
चीज /पनीर+ फळ+ मका

या स्पर्धेचे नियमः
१) प्रमुख जिन्नसांमध्ये यापैकी एक समूह असणे गरजेचे आहे.
उरलेले उपपदार्थ आपल्या आवडीचे घेता येतील.
चीज किंवा पनीर मुख्य पदार्थ म्हणून घेतल्यास घ्यायचे असल्यास अनुक्रमे पनीर किंवा चीज उपपदार्थ म्हणून घेता येईल.
२) वरील समुहातील एखादी गोष्ट केवळ सजावटीकरिता वापरल्यास ग्राह्य धरली जाणार नाही.
३) वरील जिन्नस वापरून एकच गोड किंवा तिखट पदार्थ बनवू शकता.
४)पदार्थ शाकाहारीच असावा.. अंडं, मांस, मासे आणि इतर सीफूड यापैकी काही वापरू नका
५) तयार पदार्थाचं प्रकाशचित्र अनिवार्य आहे. कृतीची (पायर्‍यांसहित) प्रकाशचित्रे द्यायला हरकत नाही.
६) प्रवेशिका भरताना, पदार्थ गोड आहे का तिखट याचा स्पष्ट उल्लेख हवा.
७) एक सभासद दोन प्रवेशिका पाठवू शकेल मात्र त्यापैकी एक गोडाची व एक तिखटाची असायला हवी. एक सभासद दोन्ही गोडाच्या वा दोन्ही तिखटाच्या पाककृती पाठवू शकणार नाही.
८) एका प्रवेशिकेत एकच पाककृती असावी.
९) या स्पर्धेचा अंतिम विजेता मायबोलीचे सभासद मतदान पध्दतीने ठरवतील. या मतदानासाठीचा धागा अनंतचतुर्दशी नंतर उघडण्यात येईल.

प्रवेशिका कधी, कुठे व कशा पाठवाव्यात?

१. प्रवेशिका गणेश चतुर्थीपासून,९ सप्टेंबर २०१३ (भारतीय प्रमाणवेळ) ते अनंत चतुर्दशीपर्यंत, १८ सप्टेंबर २०१३ (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरची प्रमाणवेळ) स्वीकारण्यात येतील.
२.प्रवेशिका पाठवण्याकरता 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सदस्य असणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्य नोंदणीकरता 9 सप्टेंबरला खुला करण्यात येणार आहे.
३. 'मायबोली गणेशोत्सव २०१३ पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा. नंतर सामील व्हा या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१३' या ग्रूपचे सभासद झाला आहात.
४. याच ग्रूपमध्ये उजवीकडे 'नवीन पाककृती' या शब्दांवर टिचकी मारा. (गणेशोत्सव २०१३ ग्रूपमधले गप्पांचे पान, नवीन कार्यक्रम हे पर्याय वापरायचे नाहीत)
५. नवीन पाककृतीचा धागा उघडला जाईल. त्यात 'शीर्षक' या चौकटीमध्ये खालीलप्रमाणे विषय लिहावा :-
- तुमच्या पाककृतीचे नाव - गोड/तिखट - मायबोली आय डी.
तसेच साहित्यात तुम्ही मुख्य पदार्थ म्हणून कोणता गट घेतलाय आणि उपपदार्थ कुठले घेतलेत ते स्पष्ट आणि वेगवेगळे लिहा.
६. शब्दखुणा या चौकटीमध्ये मायबोली गणेशोत्सव २०१३ हे शब्द लिहा.
६. मजकुरात प्रकाशचित्र टाकण्यासाठी मजकुराच्या चौकटीखाली मजकुरात image किंवा link द्या. यातील image शब्दावर टिचकी मारा. एक नवीन खिडकी (विंडो) उघडेल. त्यात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'upload' हा पर्याय निवडा. मग 'browse' वर टिचकी मारुन तुमच्या संगणकावरून योग्य ती फाईल upload करा. फाईल अपलोड झाली की खालच्या करड्या चौकटी मध्ये त्याची पावती (मेसेज) दिसेल. मग ही फाईल सर्वात वरती दिलेल्या पर्यायांपैकी 'Send to text area' हा पर्याय वापरून तुमच्या मजकुरात समाविष्ट करा.
प्रकाशचित्र टाकण्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.
७. नवीन लेखनाच्या धाग्यावर सर्वांत खाली 'Save' या कळीच्या वर ग्रूप असा शब्द दिसेल, त्यावर टिचकी मारा. सार्वजनिक या शब्दाच्या आधी असलेल्या चौकटीवर टिचकी मारा. म्हणजे तुमची प्रवेशिका सर्वांना दिसू शकेल.
८. Save ची कळ दाबा.
९. जर काही मजकूर लिहायचा राहिला असेल/बदलायचा असेल तर सर्वांत वर दिसणारा 'संपादन' हा पर्याय वापरून प्रवेशिकेत बदल करू शकता.

********
पाककलापटू माबोकरांच्या चविष्ट प्रवेशिकांची प्रतीक्षा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

धनश्री,
उपपदार्थ आणि सजावटीसाठी कोणतेही आणि कितीही पदार्थ चालतील फक्त ते अंडं,मांस,सीफूड यापैकी नसावे.

सीमा, अगदी बरोबर!

लोला,झंपी, दरवर्षी मांसाहार नको हा नियम नसतोच! या वर्षी काही तरी 'वेगळं' म्हणून संपुर्ण शाकाहार ट्राय करुन बघायला काय हरकत आहे?

एखाद्या पदार्थाला लावायला चटणी/एखादा स्प्रेड बनवला आणि तो मुख्य पदार्थाला लावला तर चालेल का? म्हणजे चटणी हा मुख्य पदार्थाचाच एक इन्ग्रेडियन्ट समजला जाईल का? का एकच पदार्थ बनवावा हा नियम मोडेल?

मानुषी
चालेल.
चटणी सॉस तत्सम चालेल. शेवटच्या पायरीत चटणी पदार्थाला लावलेली असली पाहिजे किंवा पदार्थात मिसळलेली पाहिजे.
वेगळी वाढली तर एंट्री बाद ठरेल.

मात्रं समजा तुम्ही दिलेले मुख्य घटक वापरून एक पदार्थं बनवला आणि तो अमुक एका चटणी, सॉस , पोळी, भात इ. बरोबर वाढा असं म्हटलं तर चालेल.

>>या वर्षी काही तरी 'वेगळं' म्हणून संपुर्ण शाकाहार ट्राय करुन बघायला काय हरकत आहे?
हे कारण तुमच्या ओरिजिनल कारणांत नव्हतं. 'ट्राय' करुन बघणं वेगळं आणि 'केलं जात नाही म्हणून नको' यात फरक आहे. असो. माझ्याकडून विषय संपला आहे.

पिढ्यान पिढ्या देवाला मांसाहारी नैवेद्य दिला जातो, अगदी गणपतीतसुद्धा- हे लोकांच्या गावीही नसतं. आपण करतो तेच जग करतं! झंपीनं अगाध ज्ञान की अज्ञान पाजळलेलंच आहे.

मला असं म्हणायचंय की मुख्य ग्रुपपैकी एक पदार्थ वापरून केलेली चटणी /सॉस वेगळी न ठेवता मुख्य पदार्थात वापरली तर चालेल का?
वेगळी वाढली तर एंट्री बाद ठरेल.>>>>>>>> बरोबर.

तसेही दूधाचे पदार्थ व फळ विरोधी आहार.. ज्यास्त करून बाहेरच्या देशाकडून आलेली पद्धत आहे.
<<
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण...
भाच्यांची नावे सांगू या,
मामा च्या (बाहेरच्या देशाला) जावू या..

कूऽक...65.gif

दूधाचे पदार्थ = दूधापासून बनलेले पदार्थ. दूध नाही म्हटलय. त्यामुळे तुमचे गाणं बाद. Proud

वरती पदार्थाच्या यादीत चीज/पनीर म्हटलय.. तेव्हा तुम्ही चीज व केळ खा एकत्र ना ह्याच गाण्याचा संदर्भ स्वतःला देत.. हा. का. ना. का. आ. त्या. का.

तुम्ही नक्की कुठले डॉक आहात? नाही म्हटले, गाण्याचा संदर्भ देत सुटलाय...

संयोजक -

फळं - एकाच प्रकारचं वापरायचं की वेगवेगळी फळं एकत्र वापरली तर चालतिल?

चीज - एकाच प्रकारचं वापरायचं की वेगवेगळी एकत्र वापरली तर चालतिल?

कॉर्न - ताजाच वापरायचा की फ्रोझन, टीन्ड कॉर्न, किंवा इतर फॉर्म मधे वापरता येइल?

धन्यवाद Happy

इन्ना, मामी, साती, अल्पना Happy जमल्यास नक्की Happy

फळं बेगवेगळ्या प्रकारचीही चालतील, चीझ वेगवेगळ्या प्रकारचीही चालतील.
कॉर्न्स फ्रोझन टीन्ड चालतील.
कॉरन चे पीठ चालेल.फळे सुद्धा पल्प/स्क्वॅश प्रकारात नकोत.
फ्रोझन/ टीन्ड तुकडे चालतील.

-संयोजक मंडळातर्फे.

संयोजक, एक पे रहना जी
< संयोजक | 3 September, 2013 - 12:24

मंजूडी, मका कोणत्याही स्वरुपात वापरू शकता. फळं मात्र ताज्या स्वरुपातच वापरली जावी. फळांचा रस चालेल पण डब्बाबंद पल्प, मुरांबे, मोरावळा ईत्यादी चालणार नाही.>

मंजूडींनी मक्याचे पीठ चालेल का असे विचारले होते.

यापुढे या स्पर्धेतील प्रवेशिका स्विकारणे बंद करत आहोत.
स्पर्धेसाठी खालील प्रवेशिका आलेल्या आहेत -
गोड -

फ्रुटी पोलेन्टो-गोड-सुलेखा. : http://www.maayboli.com/node/45275
चीज फ्रूट जेली -गोड- सावली : http://www.maayboli.com/node/45280
पनीर सफरचंद टिक्की विथ फ्रुट सॉस - गोड - माधवी. : http://www.maayboli.com/node/45251
पनीर अननस अपसाईड डाऊन केक- गोड- चारूता : http://www.maayboli.com/node/45292
कश्मिरी अंगूर- गोड- पौर्णिमा : http://www.maayboli.com/node/45232
सँडविच वड्या - गोड - मंजू : http://www.maayboli.com/node/45312
करंजी - गोड - मानुषी : http://www.maayboli.com/node/45265
चीझगोला फ्रुटवाला- गोड - लाजो : http://www.maayboli.com/node/45318
पनीर-सफरचंद हलवा - गोड - जागू : http://www.maayboli.com/node/45306

तिखट -
Avocado ठेपला - तिखट - लोला : http://www.maayboli.com/node/45285
सोप्पा पनीर मका पराठा - तिखट - प्रीति : www.maayboli.com/node/45298
मखमली धिरडी - तिखट - मंजूडी : http://www.maayboli.com/node/45252
क्विक अ‍ॅपेटायझर - पनीर मका पिनव्हिल - तिखट- चारूता :http://www.maayboli.com/node/45327
चेक-Maize - तिखट - लाजो : http://www.maayboli.com/node/45283
लेयर्ड हांडवो - तिखट - भरत मयेकर (पनीर+ मका) : http://www.maayboli.com/node/45300
क्रिस्पी ,चीज ,कॉर्न बॉल्स - तिखट - सुलेखा. : http://www.maayboli.com/node/45248
हिरव्या रश्श्यातील मकागोळे/कॉर्न बॉल्स इन ग्रीन ग्रेवी - तिखट - मंजू : http://www.maayboli.com/node/45314
ऑल इन वनः चटपटीत किन्वा पॅटीस/कटलेट- तिखट - देवीका : http://www.maayboli.com/node/45269
सॉफ्ट एन क्रिस्पी कटलेट्स - तिखट - मानुषी : http://www.maayboli.com/node/45270
मका-पनीर सार् -तिखट -जागू : http://www.maayboli.com/node/45273

_______________________________
नजरचुकीने एखादी प्रवेशिका इथे लिहायची राहुन गेली असल्यास आठवण करुन द्यावी ही विनंती.
मतदानाचा धागा लवकरच खुला करण्यात येईल.

संयोजक, मुख्य पदार्थ आणि उपपदार्थ ह्याबद्दल तुमचा काही कन्सेप्ट होता का? का दोन गट एवढेच अभिप्रेत होते?

पाककला स्पर्धेतील सर्व स्पर्धकांनी आपापले पदार्थ माझ्या घरी पाठवले तरच मतदान करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. पदार्थ ताजे असावेत -केल्या केल्या स्वत: आणून द्यावेत.

त.टी.
१. पाककृती टाकताना केलेल्या वेळचे पदार्थ पाठवल्यास राजेशाही अनुल्लेख करण्यात येईल.
२. कुरीयर केलेले पदार्थ भांडकुदळ शेजारणीला देण्यात येतील.
३. आपल्या जेवणाचा डबा सोबत घेऊन यावा.
४. आपापसात ठरवून ब्रेकफास्ट, लंच, मधल्या वेळचा नाश्ता आणि डिनर या वेळात एकएक पदार्थ पोहोचेल असे पहावे.
४. तीन माणसांच्या कुटुंबास व्यवस्थित पुरेल इतके आणावे. सत्यनारायणाचा प्रसाद वाटल्यासारखे करू नये.
५. गोड पदार्थ आणणार्‍यांनी एखादा तिखट उप-पदार्थ आणि तिखट पदार्थ आणणार्‍यांनी एखादा गोड उप-पदार्थ आवर्जून आणावा.

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

Pages