शब्द चपखल जुळवले तंत्रात सुध्दा बसवले

Submitted by वैवकु रीटर्न्स on 25 August, 2013 - 07:25

शेवटी माझा अहं नडलाच माजोरा मला
ना कधी आला तुझ्यावर टाकता डोरा मला

ह्या जगी त्यालाच अपुला मित्र मी मानेन , जो....
'आखरी का पेग' त्याचा पाजतो कोरा मला

पोक्तशी संवेदना बिलगायला बोलावते
घट्ट विळख्यावर म्हणे.. "निर्लज्ज तू पोरा !! " ..मला

बास कर हे रोजचे पाठीत गुद्दे घालणे
भ्याड दैवा एकदा बस येच सामोरा मला

जायचे आहे जिथेही जा चरायाला मना
कासरा सुटला तरी का ओढशी ढोरा मला

दु:ख वा आनंद असुदे थयथयाटच होतसे
शिकव ना नाचावयाला थुइथुई मोरा मला

छानसे सुविचार घेतो गोफ त्यांचा बनवतो
वाटते हल्ली अलामत रेशमी दोरा मला

शब्द चपखल जुळवले तंत्रात सुध्दा बसवले
पण कुठे जमलाय माझ्यासारखा तोरा मला

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावळेपण हे तुझे माझी चकाकी झाकते
विठ्ठला कर परत माझा रंग तो गोरा मला

(जमीनीची मजा येते आहे ! Happy डॉ. साहेबांचा शेरही मस्त एकदम .मस्त चिमटा काढलाय त्यांनी Wink )

धन्यवाद डॉ़़ सर् , वैवकु , भारतीताई

आपले दोघांचे शेर फार आवडले जमीनीची मजा आता मलाही येवू लागली अजून दोन शेर सुचलेत

दु:ख वा आनंद असुदे थयथयाटच होतसे
शिकव ना नाचावयाला थुइथुई मोरा मला

छानसे सुविचार घेतो गोफ त्यांचा बनवतो
वाटते हल्ली अलामत रेशमी दोरा मला

संपादित करीनच....
खूप खूप धन्यवाद Happy

@वैवकु : डॉक्टरांनी मला चिमटा काढला असे म्हणताय मग तो तुम्हाला कसा काय बसला ?? Uhoh Lol

वाटते हल्ली अलामत रेशमी दोरा मला<<< Proud

पोक्तशी संवेदना बिलगायला बोलावते
घट्ट विळख्यावर म्हणे.. "निर्लज्ज तू पोरा !! " ..मला

बास कर हे रोजचे पाठीत गुद्दे घालणे
भ्याड दैवा एकदा बस येच सामोरा मला

जायचे आहे जिथेही जा चरायाला मना
कासरा सुटला तरी का ओढशी ढोरा मला

शब्द चपखल जुळवले तंत्रात सुध्दा बसवले
पण कुठे जमलाय माझ्यासारखा तोरा मला<<<

छान शेर!

शेवटच्या शेराला देवपूरकर्करी पर्यायः

भक्त बक्कळ मिळवले, एकादशीला जमवले
विठ्ठलाच्यासारखा जमला कुठे तोरा मला!

धन्यवाद बेफीजी Happy

देवर्पुर्करी पर्याय देवर्पुर्करी न वाटता पंढर्पुर्करी वाटत आहे Proud (@वैवकु हलके घ्या Lol )
अर्थात ज्जामच आवडला
ह्या रचनेतील तब्बल चार शेर आपणास आवडले ह्याबद्दल स्वतःची पाठ थोपटून घेत आहे Happy पुनश्च धन्यवाद Happy

आपला नम्र
~नवाच एक कुणीतरी:)