विषय क्र. १. - राममंदिर निर्माण चळवळ

Submitted by limbutimbu on 24 August, 2013 - 07:24

विषय क्र. १. राममंदिर निर्माण चळवळ

पार्श्वभूमि:
जरी हल्ली असे म्हणत असले की सद्यस्थितीतील भारताचे लोकतांत्रिक एकछत्री रूप १९४७ नंतरच निर्माण झाले व तसे होण्यास बर्‍याच अंशी इंग्रजांची राजवट कारणीभूत झाली. त्याशिवाय असा गैरसमजही पसरवला जात असला की संवैधानिक राजवट ही केवळ इंग्रजांमूळेच इथे रुजली अन्यथा या देशाला स्वतःचे असे रूपडेच नव्हते, तरी असे म्हणणारे हे विसरू पहातात की आसेतू हिमाचल व गांधार प्रांत ते पुर्वेकडे ब्रह्मदेशापर्यंत या भूमिवर असंख्य लहानमोठ्या राजेरजवाडे/संस्थानिक यांचे राज्य असले तरी याच सर्व भूमिवर धार्मिक अधिसत्ता होती ती त्रिदेवांचीच! ब्रह्माविष्णुमहेश्वर व अन्य असंख्य हिंदू देवदेवतांचे पूजनामुळे असंख्य राज्ये/संस्थानांमध्ये विभागला गेलेला या भूमिवरील समाज तरीही एकच होता.
या सहिष्णु, अन म्हणूनच बेसावध बनलेल्या समाजावर तितकीच पराकोटीची बाह्यशक्तिंची/परकीयांची/परधर्मियांची क्रूर आक्रमणे झाली, व संख्याबळाच्या जोरावर कोणे एकेकाळचे हिंदू धार्मिक अधिसत्तेखालील गांधारप्रदेश/ब्रह्मदेश वगैरे बाबी इतिहास जमा होऊन आजचा भारत दृष्य स्वरुपात उभा राहीला.
गेल्या शतकातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात घडलेल्या अनेक घडामोडी/बदलांमुळे येथिल जनजीवन ढवळून निघालेच, शिवाय येथिल ग्रामव्यवस्थेची एकजूट अन जातीपातीतील सामंजस्य संपविण्याचे मागे इंग्रजांनी रुजविलेल्या व एतद्देशियान्नी उचलून धरलेल्या फूटीचे तंत्रदेखिल काम करुन गेले.
त्याचबरोबर, स्वातंत्र्योत्तर काळातील अपवाद वगळता तत्कालिक देशधुरीण "निधर्मवाद" की "अलिप्ततावाद", का अलिप्ततावाद जोपासण्याकरता व बाह्य शत्रू वाढू नयेत म्हणून धर्माचे आधारावर फाळणी झालेल्या या देशास "निधर्मी" ठरविण्याचे वैचारिक गोंधळात सापडलेला होता, ज्याचे पर्यवसन नंतर लोकशाहीतील संख्यात्मक एकगठ्ठा मतांचे बळावर सत्तेवर रहाण्याकरता (कम्युनिस्ट) निधर्मी ते सर्वधर्मसमभावी इथवर झाले.
या सर्वच काळात असंख्य घटना/निर्णय यामुळे येथिल हिंदू समाज त्यातिल जातीपातींमधे जास्तीत जास्त फूटून एकमेकांपासून दूर होऊन हिंदू म्हणून विस्कळीत कसा होईल याची कारस्थाने नित्य पहायला मिळाली.
गेल्या शतकातच नव्हे, तर गेल्या आख्ख्या सहस्रकात हिंदू म्हणून जगत असलेल्या या भूमिवरील व्यक्ति, राणाप्रताप/छ. शिवाजीराजे यासारखे अपवाद वगळता कधीही एकत्रितपणे हिंदू म्हणून खडबडून जागे झालेत/कृति केलीये असे झाले नाही. अर्थात सहिष्णुततेची परिसीमा गाठलेल्या या भूमिवासियांन्नी सगळेच अत्याचार मुकाट सोसले असेही झाले नाही. कित्येक धार्मिक आक्रमणान्नी येथिल त्रिदेवांवरील निष्ठा तसूभरही कमी झाली असेही झाले नाही. पण तरीही, अन्य धर्म/वंश/राष्ट्रांप्रमाणे येथिल समाज एकसमयावाच्छेदेकरुन शत्रूंच्या प्रतिकारास संघटीत पणे उभा राहिलाय असेही दिसले नाही.
होय, पानिपतावर लाखो मराठे मारले गेले तरीही हेच म्हणावे लागते कारण त्यावेळेस उत्तरभारतातील अन्य हिंदू राजेरजवाडे केवळ हातावर हात धरुन बसुन होते. कदाचित सत्ताकारणाचे त्यांच्या वैयक्तिक गणितामधे ते बसत नसेल.
येऊनजाऊन त्यानंतर १८५७ चे बंड हा एक मोठा प्रयत्न होता. तरीही दक्षिणेकडून पुरेशी साथ न मिळाल्याने व युद्धशास्त्रीय काही बाबींमधे कमजोर ठरल्याने हे बंड म्हणण्यापेक्षा मी युद्ध म्हणेन, फसले, हरले गेले.

वर्तमान वस्तुस्थिती:
या सर्व पार्श्वभूमिवर, गेल्या पन्नास वर्षात लोकतांत्रिक राजवटीमधे या देशाची भाषावार/प्रांतवार/जातीवार छकले उडू लागुन, तशीच ती उडावित असा जाणूनबुजून प्रयत्न सर्वथरांवर होऊ लागून, एकीकडे जातीपाती नष्टकरण्याचा धोषा लावत प्रत्यक्षात जातीपातींना अत्यंत विकृत पद्धतीने अधिक बळकटी देण्याचे कर्म सर्व स्तरांवर घडताना दिसले/दिसते.
या देशीच्या आराध्य त्रिदेवांना स्वतःलाच कसल्याही आशेला जागा असू नये/राहू नये असे हे दुर्दैवी चित्र उण्यापुर्‍या पन्नास/साठ वर्षात या देशाने अनुभवले, व इतिहासात कधीही न अनुभवलेल्या हिंदू धर्मांतर्गतचे "जातीय" द्वेष/तणावही अनुभवले.
इतकी सर्व दिशाहीन अवस्था असतानाच, एक चमत्कार घडला. होय, मी त्यास चमत्कारच म्हणेन.
व असा चमत्कार म्हणेन की गेल्या सहस्र वर्षात अशी घटना या भूभागाने वा जगानेही अनुभवली नाही.
स्वा. सावरकरांच्या सहा सोनेरी पानांनतर सातवे पान कुणास लिहावयाचे असल्यास याच घटनेवर ते लिहावे लागेल.
असे काय घडले होते?

घटनेचे विवरणः

वर वर पहाता उण्यापुर्‍या पाचसात वर्षांचे काळात एक चळवळ उभी राहिली व तिने ये भूमिवरील असंख्य क्रूर परकीय आक्रमकांपैकी एका आक्रमकाने येथिल मंदिर पाडून तेथे बांधलेली वास्तू सपशेल ध्वस्त केली.
हे करण्याकरता, परकीय आक्रमकांपासून व फाळणीतून उरल्यासुरल्या आसेतू हिमालयातील यच्चयावत प्रदेशातील यच्चयावत हिंदू सामान्यजन, हिंदूधर्मातील जातीद्वेषाच्या विषाची फिकीर न करता, किंबहूना जातीद्वेषाचे पेरलेले वीष पूर्णतया पचवून, "एक हिंदू" म्हणून उभा राहीला. त्यांच्या त्या एकत्र येण्यास तोडीचे असे उदाहरण जगात कुठेही नाही. हा समाज, जेव्हा जेव्हा "एक हिंदू" म्हणून एकत्रितपणे उभा रहातो, तेव्हा तेव्हा त्यांचेतील जातीपातींचे विभिनत्व एकतेने एकमेकांच्या गुणांचे सहकार्य घेत गुणांचा एकत्रित परमोच उत्कर्ष साधत एकत्रीतपणे वज्रमुठीप्रमाणे उभे रहाते व अशक्य ते शक्य करुन दाखवू शकते हा साक्षात्कार याच घटनेमुळे झाला.

नि:ष्कर्षः

वर वर पहाता, ही घटना केवळ पाच/सात वर्षांच्या प्रयत्नाने झाली असे वाटू शकेल, पण प्रत्यक्षात या घटनेची बीजे येथिल यच्चयावत जातींत विभागलेल्या प्रत्येक हिंदूधर्मियात परकीय आक्रमकांच्या बर्बर क्रूर धार्मिक आक्रमणांच्या आठवणीन्नी शिल्लक होतीच. व परकीय आक्रमकाने मंदीर पाडून बांधलेली वास्तू ही त्यांचे मनात वसलेल्या ठुसठूसत्या पुवळलेल्या जखमेवरील खपली प्रमाणेच होती. त्या खपलीला धक्का लागण्याचा अवकाश, जखमेच्या आत्यंतिक वेदनेने आख्खे शरीर जसे थरकापुन उठावे, तसा हा समाज सरसरून जागा झाला, व एका आत्यंतिक उर्मिने जे कर्म गेल्या सहस्रकातील काही शे वर्षांपूर्वीच व्हायला हवे होते, गेला बाजार, निदान जे कर्म सरदार पटेलांन्नी घडवुन आणलेल्या सोरटीसोमनाथाच्या पुनरु:ज्जिवनानंतर तरी व्हायला हवे होते, ते स्वतःच करुन टाकले.
हे करताना त्यांना कसल्याही जातीभेदाची/ आर्थिक स्तराच्या भेदाची अडचण झाली नाही. त्यांना कसल्याही परकीय कम्युनिझमादिक विचारसरणींचा आधार घ्यावा लागला नाही.
हे करताना ते केवळ अन केवळ "एक हिंदू" म्हणून उभे राहिले होते.
पुरुषसुक्तातील सुदृढ हिंदू समाजपुरुषाचे दृष्य स्वरुप म्हणजे वास्तू ध्वस्त करण्यास उभा राहिलेला हिंदू समाज होता.
या हिंदू समाजपुरुषाचे असे संघटीत व एकीचे रूप पाहिल्यावर अनेकांच्या भुवया वक्र झाल्या, व हिंदू धर्मात जातींमधे फूट पडावी म्हणून त्यांचे प्रयत्न अधिकाधीक जोमाने सुरू झाले.
परंतू, गेल्या सहस्रकाच्या शेवटच्या शतकाच्या उत्तरार्धात एका दिवशी घडलेल्या या घटनेचे परीणाम हे आगामी सहस्रकावर दीर्घकालपर्यंत रहातील यात मला तरी तीळमात्रही शंका नाही.
सहसा कुणाच्या अध्यातमध्यात नसणार्‍या, आध्यात्मिक उन्नती करता भौतिक आयुष्यातिल कष्ट व अन्याय हसत हसत सहन करणार्‍या, बुद्धिमत्तेचे पूजक अन सहिष्णू अशा त्रिदेवांच्या पूजक हिंदुधर्मियांचे हे स्वरुप चकीत करणारे होते.
"भ्याड" अशी संभावना करुन, त्या हिंदूधर्मिय देशावर आक्रमण करावे असे विशेष त्यांच्यात उरलेच काय आहे अशी विचारणा करुन युद्धपिपासू हिटलरने ज्या देशावर आक्रमण करणे टाळले, त्याच देशात उण्यापुर्‍या पाचपन्नास वर्षात तेथिल हिंदू समाज स्वा. सावरकरांचे स्वप्नाप्रमाणे एकसमयावाच्छेदेकरुन संघटीत पणे उभा रहातो, व शतकानुशतकांच्या मंदीर नष्टकेल्याच्या अपमानाचा बदला, सहिष्णूपणे कसलीही मानवी हिंसा न करता, मात्र आक्रमकाची वास्तू ध्वस्त करुन घेतो हा गेल्या सहस्रकातील चमत्कारच म्हणावा लागेल.
जगातील सर्वात पुरातन, ज्याचा पूर्वकालखंडही अजुन निश्चित होत नाही, अशा हिंदू धर्माचे आता एका छोट्या एकमेव प्रदेशात एकवटलेले अनुयायी, आजवर गेली काही शतके झालेल्या परकीय विध्वंसक क्रूर आक्रमणांचे गर्तेतून/परिणामातून बाहेर पडून, एक हिंदू म्हणून, पुन्हा एकवार "कृण्वन्तो विश्वं आर्यं" हे प्रत्यक्षात उतरविण्यास सिद्ध होतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूळ धाग्याकडे येऊया. भारताची एकात्मता कोण टिकवून धरतो? विशिष्ट पंथ की राम?

Rofl

Biggrin

पैलवाना, रामामुळे जर तुमच्या देशात एकात्मता टिकून रहाते तर परदेशी बाबर भारतात रुजलाच कसा?

आणि रामामुळे जर एकात्मता टिकते तर भाजपाच्या २०१४ च्या वचननाम्यातून राम का निघून गेला?

भाजपाचा तो जाहिरनामा हनुमानाकडे द्यायला हवा.. मोत्याच्या हारातील एकेक मोती फोडून त्यात राम नाही म्हणून ते त्याने टाकून दिले.

भाजपाच्या जाहिरनाम्याचे एकेक पान टराटरा फाडूनही त्यात कुठेच राम दिसत नाही म्हटल्यावर तो बिच्चारा हनुमंत किती दु:खी होईल. Biggrin

प्रश्न असा आहे की हिंदूंना एकत्र कसे आणावे, राम चालत नसेल तर काय? सगळे हिंदू एकत्र येणे कठीणच. आज कित्येक हिंदूंनाच जे चालले आहे त्यात अन्याय, गैर वाटतच नाही.

ज्यांना मुस्लिमांचे वर्चस्व अन्यायकारक वाटते त्यांनी काय करावे?

हिंदू वि. मुस्लिम इ. वाद करण्यापेक्षा जिथे अन्याय होतो आहे असे वाटते तिथे तो दूर कसा करता येईल? याचा विचार करावा.

महात्मा गांधींजींनी शिक्षित, अशिक्षित, गरीब श्रीमंत, हिंदू मुस्लिम असे सगळे लोक एकत्र आणले. तशी बुद्धि, कर्तबगारी आज कुणाच्यात आहे?

आज रामाचे नाव घेऊन हा प्रयत्न झाला, मान्य नसेल तर दुसरा काय मार्ग आहे?

हे प्रश्न महत्वाचे.

ज्यांना मुस्लिमांचे वर्चस्व अन्यायकारक वाटते त्यांनी काय करावे?

हिरवा घुमट बघवत नसेल तर हिरवे पत्र घेऊन अमेरिकेत आनंदाने रहावे.

>>>> यावर लेख लिहुन आता जनमत एकत्रीत करण्याची वेळ नाही असे लिंबुभाउ मला सुचवावेसे वाटते. <<<<
नितीनचंद्र, हा लेख स्पर्धेकरता गेल्या ऑगस्ट २०१३ मधे लिहीला होता. जनमत एकत्र करण्याकरता नक्कीच नाही.

आत्ता हा लेख लगो या आयडीने वर काढला आहे. २०१४च्या इलेक्शन निमित्ते राममन्दिर विरोधी मतपेटीचे जनमत एकत्र करण्याकरता त्यान्नी तसे केले असल्यास मला माहित नाही, ते काहीही करु शकतात. Wink

स्पर्धेकरता लेख लिहीला तेव्हा यावर एकही प्रतिक्रिया नव्हती.
आता इलेक्शन निमित्ते खुप प्रतिक्रिया आल्यात.
पण मी मूळातच मला जे लिहायचे ते लेखात लिहीलेले असल्याने प्रतिक्रियात सहभागी होणे टाळतोय. Happy
तुम्ही म्हणता तसेच, आत्ता हा विषय माझ्या अजेण्ड्यावर नाहीये. Proud

हिरवा घुमट बघवत नसेल तर हिरवे पत्र घेऊन अमेरिकेत आनंदाने रहावे.
थोडक्यात भारत सोडून जा!! नि भारतात रहायचे तर गप्प बसा नि जे जे होईल ते ते मुकाट्याने मान्य करा.
असेच सुचवायचे आहे ना?
मग स्पष्ट लिहा की, भिता कशाला?
पण तुमचे मत कळले, धन्यवाद.

लगो, ते भाजपबिजप बंद करा पाहू. मी ओळखत नाही त्यांना.
निवडणुका आटोपल्यावर बरेचदा त्यांची ओळख होण्याची शक्यता आहे असे म्हणतात! Wink

https://zeenews.india.com/india/huge-amount-of-money-withdrawn-fraudulen...

In a shocking development, a huge amount of money has been withdrawn fraudulently from the bank accounts of Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra. Sources told Zee Media that the money has been withdrawn from two banks using forged cheques.

It is learnt that when the fraudster tried to withdraw money for the third time then Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra General Secretary Champat Rai was informed about the withdrawal by phone.

वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही राम रे
दाम करी काम वेड्या दाम करी काम रे

Pages