जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)

Submitted by अभय आर्वीकर on 23 August, 2013 - 01:35

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१) 

                           अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांचा पुण्यामध्ये खून करण्यात आला. नागरिकांचे संरक्षण हे कोणत्याही सरकारचे आद्य कर्तव्य असते. दाभोळकरांच्या खुनाने सरकार नागरिकांचे रक्षण करू शकत नाही, हे अधोरेखीत झाले. सर्वत्र जनक्षोभ आणि संतापाची लाट उसळली, ज्यांनी कधी दाभोळकरांचे नाव देखील ऐकले नव्हते किंवा ज्यांना अनिसच्या कार्याची यत्किंचितही माहिती नव्हती, ते सुद्धा रस्त्यावर उतरले. जनक्षोभाचे विक्राळरूप बघून सरकार हादरले. भयमुक्त जीवन जगण्याचा नागरिकांचा अधिकार जोपासण्यात अपयशी ठरलेल्या सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी तडकाफडकी मंत्रिमंडळाच्या खास बैठकीत निर्णय घेऊन जादूटोणा-विरोधी अधिनियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 

                           जो अधिनियम लागू करायचा त्याचा मसुदा व प्रारूप जनतेसमोर यायला हवे होते पण; विरोधी पक्ष किंवा अन्य सामाजिक संघटनांना विश्वासात न घेताच सदर वटहुकूम स्वाक्षरीसाठी मा. राज्यपाल महोदयाकडे पाठवून देण्यात आला आहे. 

                    "प्रत्येक प्रश्नाची उकल केवळ नवा कायदा निर्माण केल्याने होते" अशी आधुनिक वेलक्वालिफ़ाईड प्रगाढ अंधश्रद्धा बाळगणार्‍या सरकारने कायद्याच्या घनदाट जंगलात आणखी एका नव्या कायद्याची भर घातली आहे. वस्तुतः: राज्यात आधीच इतके सक्षम कायदे आहेत की, कोणत्याही गुन्हेगाराला वठणीवर आणण्यास पुरेसे ठरावे. पण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लागणारी पुरेशी इच्छाशक्ती कायद्याच्या रक्षणकर्त्यांकडे नाही, हेच मोठे दुर्दैव आहे. कोणत्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीवर नियंत्रण नुसते नवेनवे कायदे केल्याने नव्हे तर कायद्याची पुरेपूर अंमलबजावणी केल्याने मिळवता येते, याचे भान कायद्याच्या रक्षणकर्त्यांना केव्हातरी यायला हवे. 

                           अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी तसेच अशी भेसळ करणाऱ्यांना कायद्याचा धाक बसावा यासाठी अस्तित्वात असलेल्या अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याऐवजी अन्न सुरक्षा व मानद कायदा (फूड सेफ्टी ऍक्‍ट) हा नवा कायदा काही वर्षापूर्वी आणण्यात आला व त्यात जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. मग थांबली का भेसळ? आळा तरी बसला का? किती लोकांना जन्मठेप सुनावण्यात आली? काहीच करायचे नव्हते तर मग आधीचा कायदा कुठे वाईट होता? आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे. 

                           जादूटोणा-विरोधी अधिनियम या प्रस्तावित कायद्याची सुद्धा तीच गत होईल, हे मसुद्याचे प्रारूप पाहून सहज लक्षात येते. एकंदरीत कुचकामी, निरुपयोगी पण उपद्रवी आणि पोलिसांना पैसे उकळण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध करून देणारा एक अनावश्यक कायदा, असे या प्रस्तावित कायद्याचे थोडक्यात वर्णन करता येईल.

                           जादूटोणा-विरोधी कायदा या नावाने येऊ घातलेल्या कायद्यामध्ये एक कलम असेही आहे की ते कलम आजवरच्या अनेक कायद्याप्रमाणे शेतकर्‍यांच्याच गच्चीवर बसेल असे दिसत आहे. कुत्रा, विंचू किंवा साप चावला तर डॉक्टरी इलाजा व्यतिरिक्त अन्य उपाय - उपचार करणे आता कायद्याने गुन्हा ठरणार आहे. कायद्याचे हे कलम अत्यंत अव्यवहार्य आहे, अनावश्यक आहे आणि शेतकरी वर्गाची गळचेपी करणारे आहे.

                           या राज्यात बहुसंख्येने शेतकरी राहतात आणि साप व विंचू यांचा घनिष्ट संबंध सर्वात जास्त शेतकर्‍यांचा येतो. सर्पदंश होऊन मृत्यू पावणार्‍यांमध्ये शेतकरी समाजच जास्त असतो. मग या विषयी एखादा कायदा तयार करायचा असेल तर शेतकरी समाजाला विश्वासात घ्यायला नको काय? अंधश्रद्धा निर्मूलन समिती शेतकर्‍यांचे प्रश्न समजावून घेईन किंवा अशा कायद्याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यापूर्वी शेतकर्‍यांशी काही सल्लामसलत करेल, ही माझी अपेक्षा नव्हती आणि आजही नाही कारण; ही मंडळी स्वतः:च स्वतः:ला एवढी तज्ज्ञ आणि विद्वान समजतात की, त्यांना कुणाचेही म्हणणे समजावून घ्यायचे प्रयोजनच उरत नाही. पण सरकारचे काय? सरकारने तर संवाद साधायला हवा! संवाद साधला नाही तेही एकवेळ समजून घेता येईल पण निदान या प्रश्नाचा खोलवर अभ्यास तरी करायला हवा की नको? तेवढी विवेकशीलता जर सरकारमध्ये शिल्लक असती तर ते कलम या कायद्यात आलेच नसते.

                           साप आणि विंचू चावल्यानंतर त्यावर होणारे वैद्यकीय किंवा परंपरागत उपचारपद्धतीचा "जादू-टोणा" या प्रकाराशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. मात्र या विधेयकात निष्कारण हे कलम समाविष्ट करण्यात आले आहे. या विधेयकामुळे आता ही परंपरागत चालत आलेली उपचारपद्धती कायदेशीर अपराध ठरणार आहे. ज्या परंपरागत उपचार पद्धतीवर अनिसच्या दबावाखाली येऊन सरकार कायदा आणू पाहत आहे ती साप आणि विंचू चावल्यानंतर करण्यात येणारी उपचार पद्धती कशी असते, ते आपण पाहू.

१) विंचू (साधा) - साधा विंचू चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता नगण्य असते. चावल्यानंतर लगेच काही मिनिटातच अत्यंत असह्य वेदना सुरू होतात. पहिले साधारण दोन-तीन तासांपर्यंत असह्य वेदनांची तीव्रता चढत्याअंगाने आणखी वाढत जाते. त्यानंतर त्यापुढील दोन-तीन तास असह्य वेदनांची तीव्रता उतरत्याअंगाने कमी होत जातात. सर्वसाधारण पणे २४ तास विंचवाच्या विषाची परिणामता जाणवते. मात्र पहिले काही तास सोडले तर उर्वरित काळ वेदना सुसह्य असतात.

यावर करण्यात येणारे परंपरागत उपचार - काही मंत्र उच्चारून दंश झालेल्या शरीराच्या भागातील नसा-धमन्यांवर हातांच्या बोटांच्या साहाय्याने हलकासा उतरता दबाव दिला जातो. जखमेच्या ठिकाणी काही जंगली वनस्पतीची पाने बांधण्यात येतात. त्याला मानसिक आधार दिला जातो. याला ग्रामीण भागात विंचू उतरविणे म्हणतात. ज्यांना दंश झाला होता त्यांना या उपचारपद्धतीने आराम मिळाला होता आणि यामुळे वेदना सुसह्य झाल्या होत्या, असा त्यांचा अनुभव आहे, असे ते सांगतात. या उपचार पद्धतीत उपचार करणारा सेवाभावी मनोवृत्तीने कार्य करतो. पैसे दिले तरी घेत नाहीत या उलट त्याचीच मोलमजुरी कमी होऊन त्याचे आर्थिक नुकसान होते.

२) विंचू (इंगळी) - इंगळी चावल्याने मृत्यू ओढवण्याची शक्यता काही अंशी असते. उपचार पद्धती वरीलप्रमाणेच.

३) साप - विषारी साप चावल्यावर वेळेच्या आत योग्य उपचार झाले नाही तर माणूस हमखास दगावतो. परंपरागत उपचार पद्धतीने जसे सर्प दंश झालेल्यास हमखास वाचवता येत नाही तसेच वैद्यकीय शास्त्राकडेसुद्धा यावर रामबाण औषध नाही. सर्पदंश झाल्यापासून एक तासाच्या आत जर त्याच्यावर दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू झाले तरच सर्प दंश झालेल्याचे प्राण वाचविण्यात वैद्यकीय शास्त्राला काही अंशी यश येते. एकदा जर विष शरीरभर पसरून रक्तात मिसळले तर यावर वैद्यकीय शास्त्राकडे आजतरी रामबाण उपचार नाही.

परंपरागत उपचार पद्धत : सर्प दंश झाला त्याठीकाणी चुना लावला जातो. जर विषारी साप चावला असेल तर चुना हिरवा होतो. सर्प दंश झालेल्यास दर काही मिनिटांनी कडुनिंबाचा पाला खायला दिला जातो. निंबाच्या झाडाच्या सालींचा अर्क काढून त्याला पाजण्यात येतो. मंत्रोच्चार करून सतत त्याचा नाकात, कानात आणि तोंडात फुंका मारल्या जातात. त्याला चार माणसांच्या आधाराने चालवत ठेवतात. त्याला झोप लागू देत नाही. त्यासोबतच नागदेवतेची आणि अन्य देवांची प्रार्थना व आराधना केली जाते. (दवाखान्यात उपचार करणार्‍या डॉक्टरचे सर्व पर्याय संपले आणि कोणताही रोगी शेवटच्या घटका मोजायला लागला की डॉक्टरमंडळी सुद्धा रोग्याची सलाईन सुद्धा काढून टाकतात आणि छातीवर जोरजोराने भार देऊन त्याचा श्वासोश्वास बंद पडू नये म्हणून कृत्रिमरीत्या प्रयत्न करतात. अर्थात ही उपचार पद्धती वैद्यकीय शास्त्रात सुद्धा वापरली जाते) मात्र ही पारंपरिक उपचार पद्धती अन्य पर्याय नसेल तरच वापरली जाते. ही रामबाण उपचार पद्धती नाही आणि तसा कोणी दावाही करत नाही

.......(अपूर्ण).........

                                                                                                                             - गंगाधर मुटे
------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहे हे तेच कायदे खूप आहेत पण प्रभावी अंमलबजावणी होत नाही, ही बोंब आहे.
>> +१००

आधी कायदा नीट बजावता येईल व गुन्हेगाराला योग्य आणि वेळेवर शिक्षा होईल, अशी व्यवस्था उभारा. किंवा आहे ती व्यवस्था दुरुस्त करा. नुसते कायदे जन्माला घालून काय उपयोग?

भारतात साप विंचु यांच्या विषाने जितकी माणस मरतात त्यापेक्षा त्यांच्या भिती ने जास्त मरतात...लोकांना साप चावला म्हणजे आपल्यात विष उतरलेच....या भिती ने जास्तच हानी होते त्यांची.......

मयेकर, मा.गो.वैद्यांच्या ब्लॉगची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. त्यातील शेवटचा परिच्छेद मायबोलीवर आणि ईतरत्र 'फक्त हिंदुच कां' असे प्रश्न उपस्थित करणार्‍यांना उत्तर आहे.

मुटेजी, आयुष्यात तुम्हाला स्वतःला कधी विंचू चावलाय का हो?मला चावलाय- त्या वेदनांची तुलना कशाहीसोबत करता येत नाही, त्यावेळेला आईने भर पावसांतून मला रत्नागिरी सीव्हील हॉस्पिटलला नेले होते. तिथे त्यांनी योग्य ते औषधोपचार केले आणि तीन चार तासांनी मला बरं वाटू लागलं होतं. त्यावेळी आईला "अमुक एकांकडे घेऊन जा, ते रामबाण विंचू उतरवून देतात" वगैरे सल्ले दिले होते. आईला पटले नाहीत. हे विधेयक जर आले तर अशा साप-विंचू-कावीळ उतरवनार्‍यांचे दुकान बंद होइल आणि मग असले फुकटफाकट सल्लेदेखील बंद होतीलच.

सापाबद्दलचा एक नुकताच आलेला अनुभव. आमच्या घराच्या परिसरामधे नुकत्याच एका अतिविषारी साप फिरत होता हे समजले. त्या सापाला मारण्यात देखील आले. त्यानंतर मी (साप मारायचा आधी फोटो काढला होता) इथल्या प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रामधे जाऊन असा सर्पदंश झाला तर तुमच्याकडे उपचार काय काय आहेत याची चौकशी केली. लेखी निवेदन दिले. सापाचा फोटो पाहिल्यावर त्यांनी त्वरित (म्हणजे पंधरा दिवसांत) त्यावरच्या लसी इथल्या आरोग्य केंद्रात उपलब्ध झाल्याची माहिती मला घरी येऊन दिली. याचा अर्थ जर तुम्ही पुढाकार घेतला तर सरकारी यंत्रणादेखील काम करू शकते. प्रश्न तुम्ही पुढाकार घेता की नाही हाच आहे.

मुटेजी,
तुमच्याबद्द्ल खूप आदर आहे.
असे काही अवैज्ञानिक लिहून त्याचा विचका करू नका.

मी ग्रामिण भागात प्रॅक्टिस करते आणि असे पेशंटस नेहमी बघते.
याचा विरोध करणारी शेकडो उदाहरणे तुम्हाला डीटेलवार देऊ शकते.
पण त्याची गरज नाही.
कारण बहुदा तुम्ही सोडून बाकी सगळ्याना तुम्ही वर लिहिलं त्यात किती चुकीचं हे माहित्येय.
अनिसवाल्यानी शेतकर्यांशी चर्चा केली नाही हे म्हणणे अतिहास्यास्पद.
तळागाळात अंधश्रद्धेने पिचलेले आणि जीव गमावलेले शेतकरी पाहूनच हा कायदा बनवण्याची प्रेरणा मिळालीय.

अगदी आत्ताही माझ्याकडे झाडपाला लावत तिन दिवस वेस्ट घालवून शेवटी किडनी फेल्युअर मध्ये गेलेला हिमोटॉक्सिक स्नेक बाईट अ‍ॅडमिट आहे.
सध्या वाचलाय. तीन दिवसांच्या आमच्या अथक शर्थीनंतर.
काल तुम्ही दुसर्‍या धाग्यावर जे बाविस्कर डॉक्टरांविषयी लिहिलं होतं ना त्या डॉक्तरांनी आमच्या सायनच्या हॉस्टेलमध्ये दोन दिवस राहून आमच्यातलेच एक होऊन आम्हाला सर्पदंशाची आणि विंचूदंशाची सगळी ट्रीटमेंट शिकवलीय.

प्लॉज असे धडधडित चुकीचे काही लिहू नका.

<याचा विरोध करणारी शेकडो उदा हरणे तुम्हाला डीटेलवार देऊ शकते.>

घाईत वाचलं आणि सातीचा हरणपालनउद्योग आहे की काय, असं वाटलं. Proud

शासनाने मसुद्याचा नीट विचार करुन कायदा केला तर ठीक. दाभोळकरांच्या खूनामुळे भावनाविवश होऊन वटहुकुम काढणे योग्य नाही.

जर उद्या अण्णा हजारेंना काही झाले(देव न करो असे होवो) तर मग लगेच लोकपाल बिल पास करणार का?

या नवीन दालनात काही मतप्रदर्शकांना व लेखकांना यायचे असल्यास स्वागतच आहे. येथील लेख वाचून त्या दालनात प्रवेश मिळवण्यासाठीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाय केल्याची खात्री पटलेली आहे.

बापरे! .... शेतकर्‍यांबद्दल खरंच कळवळ असेल तर या विधेयकाला पाठिंबा देणेच योग्य ठरेल. इतकंच नाही तर या बाबतीतला वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अशा विधेयकाची गरज आणि महत्त्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवलं तर ते त्यांच्या जास्त हिताचं ठरेल.

बाकी साप, विंचू वगैरे शहरांतून सहसा वाट्याला येत नाहीत पण इतर अनेक अनिष्ट प्रथा आणि अघोरी उपाय शहरांतूनही सर्रास सुरू असतात. अशा प्रथांमध्ये अर्थात जास्त करून लहान मुलं आणि स्त्रियांचा बळी जातो.

विधेयकाला माझा पाठिंबा आणि यामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि जादुटोणा कमी होण्यास हातभार लागेल अशी आशा.

साती,वरदा आणि इतर, तुम्ही सगळेजण जेव्हा तुमच्या घरी भाजीला फोडणी देता तेदेखील तुम्ही शेतकर्‍यांविरोधात केलेले कटकारस्थान असते. तुम्हला काय कळणार शेतकर्‍यांची दु:खे. तुम्ही ,सरकार,अनिस सगळे बिंडोक लोक आहात. तुम्ही कधी हातात कुदळ धरलय का पेरणी केलीये?हा कायदा शेतकरी विरोधात आहे ह्यात तिळमात्र शंका नाही.एव्ह्दच काय मी तर म्हणेल देशी दारु दुकाने बंदी सुध्दा शेतकरी विरोधात आहे, मला वेळ मिळाला की मी सिद्ध करेल कसे ते.

आधी कायदा नीट बजावता येईल व गुन्हेगाराला योग्य आणि वेळेवर शिक्षा होईल, अशी व्यवस्था उभारा. किंवा आहे ती व्यवस्था दुरुस्त करा.
<<
तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद, राहूल.
मला जरा वेळ मिळाला, की तशी शिक्षा होईल अशी व्यवस्था उभारून टाकतो.
अधिक सूचना अस्तील तर जरूर कळवा.
Proud

आर्क,
अगदी अगदी.
"श्याम मानवांना मी ३० वर्षांपूर्वी विचारलेल्या प्रश्नांचे तर्कशुद्ध उत्तर त्यांना देता आले नव्हते" हे घालायचं राहिलंय तुमच्या प्रतिसादात, तेव्हडं अ‍ॅडून टाका.

अश्या मतांचे लोक शेतकर्‍यांचा कैवार घेतात हे पाहूनच विंचू आणि साप खवळून चावाचावी करत असतील. कुणाच काय सांगता येतंय?

It's better to keep your mouth shut and appear stupid than open it
and remove all doubt.

- Mark Twain

kathin ahe..
Ya kayadya sathi eka vichar vant manasala jeev gamavava lagala? Sad Ha kayda analya baddal sarkar che abhinandan.

लेखकाने सर्व क्रेडिबिलिटी गमावलेली आहे. कुठले काँप्लेक्स घेउन वावरता हो? जरा बाहेर पडा आणि विचारकक्षा रुंदवा.

वरदा +१

मांत्रिक आणि त्यांच्या गुप्तधनाच्या मागे आजही ग्रामीण भागातील तरुण पिढी वाया जात आहे ( यामध्ये सुशिक्षित लोक सुद्धा आहेत), अशा मुर्ख लोकांना अद्दल घडविणारा कडक कायदा होणे ही गरज आहे, नरबळीसारख्या घटना ऐकल्या तर चीड येते माणूसकीला काळीमा फासणा-या या गोष्टी आहेत,

मला २ वेळा विंचू चावला आहे. मी त्यावेळी गावाकडे असल्याने डॉक्टर ऐवजी गावातल्या एका माणसाकडे नेंण्यात आले, गावाकडे साधारण असे समज आहेत- मूल पोटात असताना आईला विंचू चावल्यास मुलाला विंचू चढत नाही असे इतर बरेच काही,

मुटेजी आपल्या लेखातील काही बाबीत तथ्य असेल कारण भारतात आढळणा-या सापांपैकी फक्त ६ ते ७ विषारी आहेत त्यामुळे तशी साप चावल्यानंतर मृत्यू होण्याची शक्यता कमी असते याचाच फायदा भोंदूगिरी करणा-यांना होतो. अजूनही आपले लोक बंगाली किंवा काला जादू याला मानतात आणि त्याच्या आहारी जातात,

कायदा करुन सर्व प्रश्न सूटतील असे नाही पण किमान अशी कृत्ये करणा-यांना थोडा धाक बसेल अस नक्कीच वाटते .

मुटेंनी लेख लिहिताना लेखांक - १ असे लिहिलेय आणि शेवटी अपूर्णही..... म्हणजे अजून काही येणार आहे मंडळी ते ह्याच्यापेक्षा हास्यास्पद असेल किंवा नसेल ह्यावर एक क्विझ ठेवू

वन.....

टू.......

थ्री........

गो................................................

१ नरबळी हा खून च असल्यामुळे त्याच्या साठी वेगळा कायदा असायची गरज नाही. नरबळी साठी शिक्षा देण्यास सध्याचा कायदा सक्षम आहे

२ जे कोणी साप विंचू चावल्या वर वैद्यकिय उपचार न घेता तंत्र मंत्र करत असतील त्यांच्या वर कोणी जबरदस्ती केली नाहीये. त्यांनी घ्यावेत वैद्यकीय उपचार कोणी आडवले आहे.

माझ्या मते तर आयुर्वेद आणि होमिओपाथी ला पण खरे तर ह्यात घातले पाहीजे जर रोगी बरा व्हावा अशी सरकार ची इत्छा असेल तर. ती पण मोठी ढोन्ग आहेत असे माझे मत आहे.

पण कोणाकडुन उपचार करुन घ्यायचा हे ज्या त्या व्यक्तीने ठरवावे, सरकार ने मधे पडु नये.

सरकार ने असले कायदे करण्यापेक्षा काहीतरी खरे उपाय करावेत. गावो गावी वैद्यकीय सुविधा पोचवाव्यात, लोक आपोआपच मंत्र तंत्र करणे बंद करतील.

मलाही आधी उपरोधाने लिहीले असावे असे वाटले पण :(.

विधेयकाला माझा पाठिंबा आणि यामुळे समाजातील अंधश्रद्धा आणि जादुटोणा कमी होण्यास हातभार लागेल अशी आशा.>+१
लहानपणी पुस्तकात वाचलेले समाजसुधारकांचा `आधी समाजसुधारणा मग स्वातंत्र' हा आग्रह जास्त योग्य होता असं वाटायला लागलं आहे .

हे राम !

सरकार ने असले कायदे करण्यापेक्षा काहीतरी खरे उपाय करावेत. गावो गावी वैद्यकीय सुविधा पोचवाव्यात, लोक आपोआपच मंत्र तंत्र करणे बंद करतील.

>>
कितीही सुविधा दिल्या, शिक्षण दिले तरी लोक बुवाबाजीकडे जातात, हेच दुर्दैव आहे हो!!

लहानपणी मी मुंबईत असताना मला कावीळ झाली होती, तेव्हा देखील अनेकांनी मंत्राने कावीळ उतरवायला सांगितली होती. मुंबईत काय वैद्यकीय सुविधा नाहीत होय?

तिच गोष्ट कुत्रा चावल्याची. मला दोनदा कुत्रा चावला होता, तेव्हादेखील असे मंत्रोपचार करण्याचे सल्ले दिले होते. यामागचे लॉजिक काय तर पोटात रेबिजची १४ इंजेक्शने घेण्यापेक्षा मंत्रोपचार सोपा!!

सुविधा वगैरे पुरविण्याच्या अपेक्षा जरा जास्त होतील आपल्या पोकळ सरकारकडून

म्हणजे,
गुटखा ,तंबाकूमूळे कर्करोग होतो ही जाहिरात करण्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे मात्र त्यावर बंदी आणायची नाही ,तसेच मदिरेचेही

प्रश्न सुविधा पोहचविण्याचा नाही तो लोकांना सुशिक्षित ( केवळ शैक्षणिक नव्हे) करण्याचा आहे त्यासाठी प्रबोधनात्मक आणि कायमस्वरुपी कार्यक्रम आवश्यक

Pages